लागले वेड मज |
चौकार आणि षटकार
चेंडू तो तडीपार।
धावांचा डोंगर ।
शतक रचण्याचे ।
लागले वेड मज।
सचिन म्हणे || १ ||
फायलींचा डोंगर । कामाचा बट्याबोळ । लाच खोरी, भ्रष्टाचार । कितीतरी पैसे खायचे लागले वेड मज |मंत्री म्हणे ||२||
दिंडी पताका भजन। रंगले कीर्तन । भान हरपून । वाट चाले पंढरी | भेट द्या हो माउली | लागले वेड मज |वारकरी म्हणे ||३||
उभे पीक गेले जळून । सगळे माळ वैराण । चढे कर्ज डोक्यावर । झाकू कसे नागडेपण | करितो आत्माहत्या | लागले वेड मज |शेतकरी म्हणे ||४||
💬 प्रतिसाद
(2)
आ
आंबट चिंच
गुरुवार, 11/21/2013 - 05:15
नवीन
वा खुप छान! शेवटची ओळ चटका लावुन गेली. बाकी वेल्लाशेटच्या म्हाणतो त्या प्रमाणे "काही
गोष्टींचे वेडच अस्सावे लागते".
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Sat, 11/23/2013 - 02:26
नवीन
दर्दु काका ... कवितेमे एक दर्द छुपा है
लय भारी
- Log in or register to post comments