Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिन कविता तिन ठिगळे

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 10/08/2013 - 12:39

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298&quot; title="प्रलय">प्रलय</a>

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

ढळतो संयम मातेचाही
बाबांची ती जागा घेई
हलाहल ते पचवित सांगा
पोळीवरती तुपही नाही

दुसरे ठिगळ पल्लवी मिंड यांच्या <a href="http://www.misalpav.com/node/25753&quot; title="आज पुन्हा उडावेसे वाटले">आज पुन्हा उडावेसे वाटले</a> ला

आज मला कपडे बदलावेसे वाटले
मोजेही जरा धुवावेसे वाटले
अंगावरची जीन्स रोजचीच
बर्‍याच दिवसानी तीला काढावेसे वाटले

घोटभर चहासाठी
कप विसळावेसे वाटले
चहाचे भांडेही धुवावेसे वाटले
झुरळांचा खडु फिरवावेसे वाटले

बेडवरच्या मळलेल्या चादरीला
अलगद ओढावेसे वाटले
उशांचे अभ्रेही बदलावेसे वाटले
भिंतीवरची जळमटेही काढावेसे वाटले

दारा मागचे तसले फोटो
फाडुन टाकावेसे वाटले ( पण खरच फाडले नाही हं.... फक्त वाटले :) )
त्या जागी देवादिकांचे फोटो
लावावेसे वाटले

टेरेस वरुन रोजच तुला पहातो
आज तुझ्या समोर येउन
एकदाच काय तो फैसला
करावेसे वाटले

फार झाले आता एकाकी जगणं
तुझ्या सारखे गोडपाखरु
आयुष्यात यावे असे वाटले......

त्याचमुळे कि काय.....

आज मला कपडे बदलावेसे वाटले

ठिगळ तिसरे अज्ञातकुल यांच्या <a href="http://www.misalpav.com/node/25756&quot; title="अविचल">अविचल</a> ला

पुसू पाहतो पुसू शके ना गालावरचे चुंबन खास
उचंबळे मन आठवणींने तव स्पर्शाचा होई भास
फुटे बिंग सापडती हीस माझ्या शर्टावरती केस
पटवा पटवी घरात चाले, दिवस चार जाणार उदास

तिकडे टाकल्या होत्या पण फारच डचमळायला लागल म्हणुन शेवटी नवा धागाच काढला


प्रतिक्रिया द्या
6200 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रचेतस Tue, 10/08/2013 - 13:31 नवीन
काय पैजारबुवा, आज भरपूर मोकळा वेळ दिसतोय.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/08/2013 - 13:46 नवीन
नुकतीच ए जी एम झाल्या मुळे तुमड्या लावण्याचे काम सिरीयसली घेतले आहे
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 10/09/2013 - 09:41 नवीन
माझा बॉस नुकताच ए जी एम झालाय...................... तुम्ही आणी मी एकाच डिपार्ट्मेंटला तर नाहीत ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/09/2013 - 09:47 नवीन
"नुकतीच ए जी एम" वरून हे ज्ञानोबांना "अन्युअल जनरल मिटींग"चे संक्षिप्त रूप अपेक्षित असावे असे वाटते... तुम्हाला बहुतेक "आसिस्टंट जनरल मॅनेजर" असं म्हणायचं आहे... चूकभूल देणे घेणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
इ
इरसाल Wed, 10/09/2013 - 10:49 नवीन
व्हय जी तसचं बोललु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मुक्त विहारि Tue, 10/08/2013 - 20:23 नवीन
हसून हसून लोळत आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 10/08/2013 - 23:53 नवीन
ब्येस्ट्च ओ माऊली :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 10/09/2013 - 00:18 नवीन
अगागा! पार बाजार उठिवलाय कवितांचा. त्या अज्ञात्कुलच्या कवितांना हात घालण्याएव्हढे कूल झालात तुम्ही पैजारबुवा. मस्त! येक कडक षॅल्युट!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 10/09/2013 - 08:37 नवीन
दंडवत स्विकारा!! __/\__!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 10/09/2013 - 09:16 नवीन
कसले कसले रस भरलेत ओ पैजारबुवा जिलब्यांमधे ? कोडाईकॅनाल, भूछत्री, आई, बाबा अन काय काय.. कॉकटेल भारी जमलंय !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/09/2013 - 09:20 नवीन
मस्तय हो बुवा. एजीएम झाल्याबद्दल हाबिणंदण... सर!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 10/09/2013 - 09:26 नवीन
प्यारेकाका, एजीएम झालो नाही एजीएम (अ‍ॅन्युअल जनरल मिटिंग)झाली पण हबिणंदणा बद्दल आभार. हित हापिसात एजीएम वेळेत झाल्याची कोणालाच किंम्मत नाही. एकदा लेट करुन दावतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
विटेकर Wed, 10/09/2013 - 09:21 नवीन
उत्तम विडंबन ! सहसा कवितांच्या वाटेस जात नाही. पण हा क्लिक वाया गेला नाही ! लगे रहो !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/09/2013 - 11:15 नवीन
जबरदस्त झालीत विडंबनं!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा