Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरावा

स — सार्थबोध, Wed, 10/09/2013 - 07:54
काही बोलू कशाला, झालेत शब्द आसू आयुष्य ओघळून गेले, आणि कितीक सोसू ll १ ll त्यांचे रक्तही बदलले, वागणे असे बेताल आम्ही तुमच्यातले नाही, आम्हा रंग नका फासू ll २ ll तुमच्याच दोर हाती, केले विषण्ण जगणे आमचेच नशीब होते, आम्ही कोणास कोसू ll ३ ll भरवसा होताच आमचा, शब्दावर माणुसकीच्या चुकलो; सापडलो आम्ही, नका दुसऱ्यास नासू ll ४ ll मारून आम्हास तरीही, उजळ तुमचा माथा नाही बदलणार दुनिया, असे लागले भासू ll ५ ll आहे ठाऊक काहींना, चांगुलपणा आमचा तो जगू दिलेत न तुम्ही, मरणोत्तर पुतळ्यात वसू ll ६ ll येईल तुमचाही अंत, तो दूत फटकारेल तुम्हा दावण्या पुरावा माणुसकीचा, आम्ही तुमच्यात नसू ll ७ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
930 वाचन

💬 प्रतिसाद (2)
स
स्पंदना Wed, 10/09/2013 - 08:10 नवीन
खरच छान रचना. आणखी एकदा हात फिरवता का रचनेवर? बघा तुमची तुम्ही दोन तिनदा वाचुन, काही बदलायचे असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध गुरुवार, 10/10/2013 - 05:27 नवीन
नोंद घेतली आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा