Welcome to misalpav.com
लेखक: हर्षद खुस्पे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वॉव! काय भारी गोष्ट!! - (मळखाऊ ताग्यातले कापड वापरणारा) सोकाजी

गोष्टीचा शेवट काय झाला भाऊ? शर्ट नीट झाला का नाही? की गेला परत टेलरकडे?

मस्त. मला असे अनुभव तयार कपड्यांच्या दुकानात येतात. ती लोक मला सदरा पायघोळ कफनीसारखा आला तरी कापड धुतल्यावर आकसल्यामुळे एकदम व्यवस्थीत बसेल म्हणतात तर एखादा सदरा अंगाला तट्ट बसला तर धुतल्यानंतर कापड सैल होतं असं म्हणतात.

क्रमशः राहिला आहे .. तो शर्ट मग खुपच आकसला .. मग त्यांच्या लहान मुलाने / भावाने वापरला.. मग तो फाटला...त्याचे रुमाल केले ... मग ते खराब झाले त्याची पुसायला फडकी केली.. फडकी खराब झाली मग त्याच्या वाती केल्या.. वाती जळाल्या त्याच्या राखेने भांडी घासली .. तर भांड्यांचा काय झाल ते नंतर ....

तिने परत एक नविन शर्ट दिला... (आजकाल भांडी देवून पण शर्ट मिळतात.मी पुण्यात तशी पाटी बघीतली आहे. "इथे भांडी देवून शर्ट्,रुमाल,मोजे,चहा,दूध आणि व्यवस्थित पत्ता पण सांगीतला जाईल." अशी,,, )

तुम्ही पहिल्यांदा शिंप्याकडे गेला होता तेव्हा त्याने तुमची मापं काढली सॉरी घेतली नव्हती का?

सखोल चिंतनीय धागा "मला एक लिनेन चा शर्ट चा कापड भेट म्हणुन मिळाले. देणाऱ्याने काहीतरी १५०० - २००० रु. चे कापड आहे हे सांगून, चांगल्या शिप्याकडे शिवायला टाक असा सल्लाही दिला. अर्थात असे महागडे कपडे भेट म्हणुन मिळाल्यावरच घालायला बरं वाटतं हा भाग निराळा. अर्थात मध्यमवर्गीय विचारसरणी मुळे ही असं वाटत असेल." लेखक मध्यमवर्गीय आहे.पण भेटी स्वीकारायला तयार आहे..आता मध्यमवर्गीय की अधली मधली पोस्ट असणारा? बघू या पुढे काही तरी क्ल्यु मिळेलच.लेखक हुषार आहे. "असो, तर मी काय सांगत होतो. कापड घेऊन मित्रा ने सुचविलेल्या नारायण पेठ पुणे येथील शिंप्याकडे गेलो. गडबड असल्याने ट्रायल न घेता मस्त पैकी शर्ट शिवून आणला, ज्या कार्यक्रमासाठी शर्ट लागणार होता त्या दिवशी शर्ट घातला तर तो बऱ्यापैकी मोठा झाला. अर्थात मी बारिक झाल्यामुळे शर्ट मोठा झाला की शिंप्याचे माप चुकले हा मोठा प्रश्न आहे." हे असे उफराटे काम कोण करते? तर एखादी अनागोंदी कारभार असणारी कं. "परत शिंप्याकडे जाणे आले. तर तो म्हणाला आता दसरा आहे खूप लोड आहे तुम्ही परत या. मी हाटुन बसल्यावर मग म्हणाला की शर्ट घालून दाखवा , मग आपण बघू. शर्ट घातल्यावर म्हणाला हम्म. . . हे लिनेन चा कापड ना ? . . . मी मनामध्ये " अरे बाबा तूच शिवलासं ना ? . . . " पण वरकरणी हो म्हणुन टाकलं… त्या बरोबर त्याने " आता कसा सापडला" अश्या अर्थाने बघितले व म्हणाला ह्या लिनेन च्या कापडाचे असेच असते बघा साहेब, धुतला की आकसतो . . . तुम्ही धुवून आणला असेलच ना? मी म्हणालो नाही. . . अहो 'न' घातलेल्या शर्ट कसा धुणार? पुन्हा हे मनातच. . . आम्ही कायम मनामध्येच बोलणार. . वरकरणी मात्र 'नाही हो. . . नाही धुतला'. . . मग पुढचा सल्ला मिळाला 'तुम्ही असं करा. हा शर्ट तुम्ही ड्रायक्लिनिंग ला टाका, तुम्ही नेहमी कुठे टाकता?' पुन्हा प्रश्नार्थक चेहरा करून म्हणालो अहो, मी पाषाण ला राहतो, तिथे टाकतो. काय बावळट प्राणी आहे हा, अश्या अर्थाने बघून, साहेब, इथे 'सुपर' तर नाहितर ' डायमंड' ला टाका ना? माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुन्हा तो म्हणाला, इथेच आहे बाहेर पडला की डाव्या हाताला बघा. ९९% नीट होईल, नाहितर आहोतच नं. " म्हणजे इथे क्लायंटने घोळ घातला आहे की अधली मधली सेवा देणार्‍याने की कंत्राट्दाराने...बहुदा कंत्राटदार असावा. आता हे शेवटचे वाक्य नीट वाचा..... "काय माझ्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य आहे माहित नाही पण शिंपी व माझी बायको ह्यांचा मझ्या बावळटपणाबद्द्लच मत मात्र एकदम सारख निघेल असं वाटलं न्हवत, कदाचित योगायोग असावा. बघु, मी मात्र शर्ट दुरुस्त करून आणायला गेलेलो, कारण नसताना ड्रायक्लिनिंग ला टाकुन वर ड्रायक्लिनिंग चे ६० रु. देऊन आलोय." "काय मग लागला की नाही क्ल्यु?बघा बघा इथे बायकोचा उल्लेख आहे.माझ्या एका लेखात पण बायको आणि साहेब सारख्याच स्वभावधर्माचे असतात असे लिहून ठेवले आहे.आयला हे म्हणजे गुरुची विद्या गुरुला. साधे सोपे सरळ वाक्य आहे. "एका कर्मचार्‍याने जास्तीचे पैसे घेतले.पण ते त्याच्या कंत्राटदाराला आणि त्याच्या साहेबांना समजले.त्या दोघांनी समजून उमजून ह्या कर्मचार्‍याला फसवले आणि त्याच्या अखत्यारीतल्या कामात घोळ घालून ठेवला.कर्मचार्‍याला दंड भरावा लागला." आता अशा एकोळी धाग्यांचे मिपावर काय होते हे लेखकाला माहीत आहे,म्हणून त्यांनी कथा जरा फुलवली आहे. बाय द वे "मी अजिबात एकोळी धागे काढणार नाही.जरा कुठे मी असे एकोळी धागे काढायचे मनांत आणले की लगेच असे क्ल्यु वाले धागे येतात.सालं आमचे नशीबच फुटके..."

कापड घेऊन मित्रा ने सुचविलेल्या नारायण पेठ पुणे येथील शिंप्याकडे गेलो
शिंपी कुठला आहे हे कोणीच पाह्यले नाही बहुतेक!

नारायण आणि सदाशिव या दोन्ही पेठा सख्ख्या शेजारीणी. वान नाही पण गुण लागले असतीलच की. दोन्ही पेठात एक साम्य आहे म्हणजे दोन्हीना पेशवाईचा वसा मिळालेला आहे. ( हा वसा त्यांच्याच शेजारी असलेल्या शुक्रवार / भवानी / सेनादत्त या पेठाना का नाही मिळाला? ही एक शंका ?)

नानासाहेब पेशव्यांनी सदाशिव पेठ भाऊच्या नावाने वसवली. मग गोपिकाबाई रुसल्याने नारायणरावाच्या नावे अजून एक पेठ वसवली असे कुठेसे वाचल्याचे स्मरते. बाकीच्या पूर्वेकडील पेठा अजून जुन्या आहेत-पार शहाजीराजांच्या वेळेपासूनच्या आहेत. त्यामुळे पेशवाई-स्पेसिफिक गुणधर्म हे नारायण-सदाशिव इथेच जास्त सापडतात.

आणि शनिवार पेठ विसरू नका - शनिवारवाड्याची प्रोप्रायटरी पेठ! सदाशिव, नारायण आणि शनिवार यांचा पिनकोड एकच आहे ४११०३०. त्यामुळे हे गुणधर्म पुणे-३० चे असं म्हणायला हरकत नाही.

पण शिंपी व माझी बायको ह्यांचा मझ्या बावळटपणाबद्द्लच मत मात्र एकदम सारख निघेल असं वाटलं न्हवत, कदाचित योगायोग असावा
प्रांजळपणाची, कोणताही खवचटपणा मनात न धरता , दाद देतो. मी ही प्रांजळ आहे पण अगदी तसा आहे हे आवर्जून सांगण्याइतका समर्थ नाही.