Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रागावणे – समजावणे

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 10/14/2013 - 07:50
........................१............................. रागवलेली ती, समजूत काढणारा मी रागवलेला मी, समजूत काढणारी ती या दोन विरुद्ध गोष्टी आहेत . ती रागावली कि तिची समजूत काढणे सोपे आहे ते जमते आजकाल मला पण तिच्यावर रागावून ती समजूत काढत असतांना रागावलेलेच राहणे फार अवघड असते ते अजूनही जमलेले नाही मला . कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला? ........................२............................. रागावलेली ती लगेच लक्षात येते रागावलेला मी तिला कळतोच असे नाही कां कळूनही वळत नाही? . आपल्या माणसावर रागावणे हा आपला हक्क जरूर आहे . पण आपलं माणूस आपल्यावर रागावले आहे हे कळायला तर हवे ना? नेमकी इथेच गडबड होते ........................३............................. रागवायला काही कारण लागतेच असे नाही पण समजूत काढायला एकच कारण पुरते . "ती रागावली आहे" ........................४............................. बर्‍याच वेळा माझी समजूत असायची मी तिची समजूत काढली आहे . हो, पण बर्‍याच वेळा ........................५............................. मी तिची समजूत काढतो तेव्हा मी खूप बोलतो अगदी मनापासून बोलतो मन लावून ती ऐकते देखिल . ती समजूत काढते तेव्हा फक्त एकदा मनापासून डोळ्याला डोळा भिडवून डोळ्यांनीच सग्गळं सांगून टाकते . मग मी पत्करतो त्याला म्हणतात, "संपूर्ण शरणागती" |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (कधीतरी असंच सुचलेलं)

प्रतिक्रिया द्या
7128 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 10/14/2013 - 08:06 नवीन
अगदी मस्त लिहिले आहेस, बरोबर भावना पकडुन
समजूत काढायला एकच कारण पुरते . "ती रागावली आहे"
आणि शेवटच्या ओळी तर खासच.
मग मी पत्करतो त्याला म्हणतात, "संपूर्ण शरणागती"
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 10/14/2013 - 08:24 नवीन
आवडली....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/14/2013 - 08:35 नवीन
मस्तच ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 10/14/2013 - 08:59 नवीन
वाह मिका वाह!!!!!!!!!! सुरेख
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 10/14/2013 - 09:20 नवीन
छान
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 10/14/2013 - 09:25 नवीन
सुरेख. स्वगतः आता 'ती'ला विचारलं पाहिजे :-)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 10/14/2013 - 09:36 नवीन
'गोड' कविता!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/14/2013 - 09:42 नवीन
रागा'वलेली कविता अवडली. :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 10/14/2013 - 10:14 नवीन
एक अन एक पैलू अचूक ! पकडलंयत बरोब्ब्बर. क्या बात है! अर्थातच सुरेख लेखन. ग्रेट.
  • Log in or register to post comments
क
कोमल Mon, 10/14/2013 - 10:33 नवीन
असचं काहीसं होत असावं, मी रागावलेली असतांना अन् तो समजूत काढतांना Image removed. कविते समोर "संपूर्ण शरणागती" Image removed.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 10/14/2013 - 11:33 नवीन
हे-
कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला?
हे-
समजूत काढायला एकच कारण पुरते . "ती रागावली आहे"
आणि हे भारीच-
बर्‍याच वेळा माझी समजूत असायची मी तिची समजूत काढली आहे . हो, पण बर्‍याच वेळा
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/14/2013 - 13:49 नवीन
आणखी एक मिका स्पेशल!
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 10/14/2013 - 15:24 नवीन
कातिल, चाबुक हो मिका , मला फक्त तुझ्याच कविता कळतात. शेवटची तर अगदी मार डाला होती.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 10/15/2013 - 08:43 नवीन
मी रागावतो तेंव्हा लगेच कळतं... स्वतःवरच रागवायचं?..कशाला? आणि आकाश लगेच मोकळं होतं. पण ती रुसते तेंव्हा जो दुभंग माझ्यात होतो त्याला उत्तर नसतं . पण आताशा तो दुभंग ओढवायचा कमी झालायं, ती समजूतदार झालीये, की सारं आकाश एक झालंय? कुणाला कल्पना नाही, आणि... कुणाला त्याचं उत्तर ही नकोय.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 10/15/2013 - 09:46 नवीन
मस्त संक्षी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 10/15/2013 - 11:34 नवीन
काव्यविषय जीवघेणा आहे म्हटल्यावर काही तरी सुचणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ल
लौंगी मिरची Sat, 10/19/2013 - 18:28 नवीन
वा , सुंदर ओळी संजय क्षिरसागर . काही माझ्याहि , तो रागवलाय हे लवकर उमगत नाहि रागात आहे असहि न्हनवत नाही माझ्या रागाचं मात्र त्याला कौतुक समजुत काढल्याविना तो काय राहात नाहि ! हल्ली मीच जास्त रागवत नाहि त्याला वाटतं मी अबोल झालीय "तु हल्ली समजुत घालायचा चांसच देत नाहि " यावरच बर्याचदा वादावादि झालिय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 09:57 नवीन
मस्त हो मिका!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/15/2013 - 12:13 नवीन
आवडली. आम्ही फक्त मिका हे नाव बघून काव्य विभागात येतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/16/2013 - 11:32 नवीन
ह्यालाच आम्ही कंपू बाजी म्हणतो... एका वाक्यात हजारो प्रश्न उभे राहीले त्यातले निवडक.... १. आम्ही = किती जण २. प्रतिसाद देणारा स्वतःला इतका मोठा का समजतो? ३. म्हणजेच प्रतिसाद कर्ता पुण्याचा असावा काय? ४. फक्त मिका = इतर कुणी कविता पाडतच नाही का? ५. "मोकलाया ...." ही कविता वाचली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हरवलेला Tue, 10/15/2013 - 13:51 नवीन
शब्दात पकडलेल्या भावनांना दाद देऊ की भावनांना पकडणाऱ्या शब्दांना !
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 10/15/2013 - 15:45 नवीन
कविता छान लिहिली आहेस रे बाळा. जुने दिवस आठवले. हम्म, आता कुणी रागावत नाही आणि कुणी समजुतही काढत नाही. फक्त एकमेकांचे दुखरे सांधे मोजायचे दिवस आलेत रे!
  • Log in or register to post comments
प
पेस्तन काका Tue, 10/15/2013 - 15:52 नवीन
ती समजूत काढते तेव्हा फक्त एकदा मनापासून डोळ्याला डोळा भिडवून डोळ्यांनीच सग्गळं सांगून टाकते . मग मी पत्करतो त्याला म्हणतात, "संपूर्ण शरणागती"
तोडच नाहि... आपली पण संपूर्ण शरणागती!!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 10/15/2013 - 16:02 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 10/15/2013 - 16:15 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 17:50 नवीन
मस्त लिहिलीये. शेवटी "संपूर्ण शरणागती">>>अगदी असेच म्हणतो!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/15/2013 - 20:18 नवीन
अगदी गोड कविता आहे.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 10/16/2013 - 05:56 नवीन
'त्या'च्या भावना अगदी नेमक्या शब्दात. मस्तच रे मिका!! :)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 10/16/2013 - 11:21 नवीन
खूपच आवडली ही रचना. :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 10/16/2013 - 11:36 नवीन
नेहमीपर्माणेच रे मिका. एक नंबर कविता. ब्याडप्याच संपवून आता आलायस तर येऊ देत तुझ्या कविता.
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिन्कर गुरुवार, 10/17/2013 - 16:17 नवीन

छान!

  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा