Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(चल परत नव्याने सुरू करू सारे)

ध — धन्या, Mon, 10/14/2013 - 14:56
चल परत नव्याने सुरू करू सारे नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु पाटाला येईलच पाणी वरच्या त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून राबू जरासे भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू

प्रतिक्रिया द्या
20974 वाचन

💬 प्रतिसाद (71)
प
पैसा Mon, 10/14/2013 - 14:58 नवीन
अश्लील! अश्लील!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 10/14/2013 - 14:59 नवीन
अश्लील काय आहे तेव्हढं सांगा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 10/14/2013 - 15:06 नवीन
यावर उतारा म्हणून एक मारुतीस्तोत्र लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 15:12 नवीन
हे आले अश्लीलतामार्तंड लगेच ओरडत! काय अश्लीलतेचे फ्यासिनेशन असते नै लोकांना ;) =)) शेतकर्‍याच्या कष्टमय जीवनाचे जोमाने भरलेले आशावादी वर्णन अतिशय आवडले. उंचसखल भाग सपाट करण्याची मेहनत हे एक प्रतीक मात्र आहे. जीवनातील अडचणींवर प्रयत्नाचा रोलर फिरवण्याचा दुर्दम्य आशावाद आहे तो. बाकी रगेलपणाची चव चाखण्याचे वर्णन केशवसुतांनीही काही अंशी "काठोकाठ भरू द्या पेला, फेस उसळू द्या" इ.इ. सांगितले आहेच. नियोजनापोटी सहजप्रेरणा दाबून टाकण्याऐवजी दोहोंचा संगम करू असा उदात्त विचार धनाजीराव मांडताहेत आणि तुम्ही अश्लील म्हणताय! नव्या पिढीचे काही काही कौतुक म्हणून नाही तुम्हाला. अशा वृत्तीमुळेच देश मागे पडलाय. (चल परत नव्याने अर्थ लावू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 10/14/2013 - 15:30 नवीन
आम्ही मारे नव्या पिढीने दादा कोंडक्यांच्या वाटेने जाऊ नये म्हणून रक्त आटवतो आहोत आणि यांना त्याचं काहीच नाही? हे राम!
काय अश्लीलतेचे फ्यासिनेशन असते नै लोकांना
चोरासारखा विचार केल्याशिवाय चोरी कशी झाली हे कळत नाही हे आता काय मी परत सांगायला पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सोत्रि Mon, 10/14/2013 - 16:28 नवीन
एकतर मला कवितेतले काही कळत नाही. ही कविता जरा सोपी होती आणि समजायलाही साधी सरळ होती म्हणून जरा मन लावून वाचायचा प्रयत्न केला तोच हे संपादक आले अश्लील अश्लील करत. आता काय जो अर्थ लागला होता तो पण बोंबलला. शॅ... - (काय अर्थ लावावा ह्या विचारात पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मालोजीराव Tue, 10/15/2013 - 08:15 नवीन
लावलेला अर्थ बोंबलला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 16:48 नवीन
रक्त आटवू नका. दूध आटवा, चांगला खवा तयार होईल, तो पेढ्यासाठी वापरता येईल किंवा असाच सुद्धा खाता येईल. (विटा डेअरी मिरज इथल्या खव्याचा अन नरसोबावाडीतल्या यच्चयावत हलवायांघरच्या पेढ्यांचा फ्यान) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मदनबाण Tue, 10/15/2013 - 08:12 नवीन
खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू हॅहॅहॅ... ;) (विटा डेअरी मिरज इथल्या खव्याचा अन नरसोबावाडीतल्या यच्चयावत हलवायांघरच्या पेढ्यांचा फ्यान) बॅट्या कुरुंदवाडचे फिक्के पेठे खाउन बघ एकदा ! लयं भारी लागतात. :) {चांगल्या पीक "घेण्यासाठी" कठोर परिश्रमास सदैव तप्तर असलेला. } ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 09:32 नवीन
येस्सार! नक्कीच ट्राय औट करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विजुभाऊ Mon, 10/14/2013 - 15:00 नवीन
पाण्या समवेत बीयाणं पेरणार? शेतकरी हैसा का कोन हैसा तुमी ................
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/15/2013 - 07:57 नवीन
ते जल्शेतीचं नविन प्रकर्ण ऐक्लं नाय व्हय तुमी ? त्येच आसलं भौतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मुक्त विहारि Mon, 10/14/2013 - 15:02 नवीन
जबरा....
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 10/14/2013 - 15:06 नवीन
या शेतकरी गीताची प्रेरणा चल परत नव्याने सुरू करू सारे हे काव्य आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 10/14/2013 - 15:10 नवीन
शुद्ध भाषेमुळे ही 'प्रायोगिक तत्त्वावर केलेली शेती' वाटत आहे . गावच्या मातीचा तो घमघमाट धन्यारावांना उपरोक्त शेतीमध्ये गवसलेला दिसत नाही असं खेदानं नमूद करतो. अतिशहरीकरणाचा परिणाम असावा. धन्याशेठने आपलेच जुने शेतीचे प्रयोग उघडून पुन्हा एकदा पाहून शहरी तण काढून पुनश्च नांगर हाती धरुन नांगरट करावी अशी विनंती ह्याठिकाणी आम्ही करत आहोत. पुन्हा शेतीसाठी शुभेच्चहा. ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 15:14 नवीन
"शुभेच्चहा" वाचून प्यारेकाकांनी टंकण्याआधी "कुकूऽचकू" ऐकले होते असे वाटले. "शुभेऽच्चहा"!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Mon, 10/14/2013 - 15:28 नवीन
बरोब्बर ओळखलंत... जुन्या चित्रपटातल्या संवादाप्रमाणे वाचावे > ह्या शहरीकरणात; धनाजीरावांची प्रतिभा; ज्याप्रमाणे आपल्या शक्तीचा मारुतीला विसर पडला होता; त्याप्रमाणे; विसरली गेली आहे; झोपली गेली आहे; तिला खडबडून जागं करण्यासाठी; आपल्या शुभेच्चांबरोबर 'चहा' ची गरज नाही का बरे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 15:31 नवीन
आपल्या शुभेच्चांबरोबर 'चहा' ची गरज नाही का बरे?
बरे च्या जागी चुकून गडे वाचलं आणि हसून डोळे अंमळ पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
व
विजुभाऊ Mon, 10/14/2013 - 16:23 नवीन
ज्याप्रमाणे आपल्या शक्तीचा मारुतीला विसर पडला होता; त्याप्रमाणे; विसरली गेली आहे; झोपली गेली आहे; तिला खडबडून जागं करण्यासाठी; आपल्या शुभेच्चांबरोबर 'चहा' ची गरज नाही का
आमच्या "मनमिळाऊ मारुतीला" चहासोबत एक धूम्रशलाका लागते तरच त्याला जागृत अवस्था प्राप्त होते
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 10/14/2013 - 17:14 नवीन
शेतकर्‍यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धनाजीरावांना शतःश धन्यवाद. आता धनाजीरावांना लहानपणी गुरे वळताना आलेल्या 'हुर्र हुर्र' करणार्‍या अनुभवांबद्दल पण त्यांनी येथे लेखन करावे अशी त्यांना नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/14/2013 - 19:17 नवीन
@धनाजीरावांना लहानपणी गुरे वळताना आलेल्या 'हुर्र हुर्र' करणार्‍या >>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
किसन शिंदे Tue, 10/15/2013 - 06:03 नवीन
+१०० टू वल्ली. =)) धन्याच्या गुरं वळण्याच्या अनुभवांवर ऐकण्यास म्या पण लय उत्सूक हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
इ
इरसाल Tue, 10/15/2013 - 12:58 नवीन
वाती वळण्यासारखे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
श
शैलेन्द्र Mon, 10/14/2013 - 17:30 नवीन
आहा !!!! लय्यीचं भारी... पीक, पाणी आणि बियाणं याचं अद्वैत जमलं की शेती हे काम न राहता साधना होते.. फक्त ही अशी शेती रब्बीच्या हंगामात, हिवाळ्यात करावी, म्हणजे थकवा कमी येतो.. वा वा..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/14/2013 - 19:23 नवीन
@भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू>>> =)) पोहोचली.... जिथे पोहोचायची तिथे कविता पोहोचली! =)) कष्टाळू-घामगाळकर श्रमिक कवी धनाजी राव (हवा तो)शीन दे! :-D यांचा इजय असो!!! =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 19:43 नवीन
कविता बघून रसिक खूष, मिळालेला प्रतिसाद पाहून धनाजीराव खूष, तर शेवटी भांडे अखेरीस लपलेले पाहून बुवाही खूष!!! क्या बात है. कविता करावी तर अशी. मान गये धनाजीराव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 10/14/2013 - 19:45 नवीन
Image removed.Image removed.Image removed. बाकी ते लपायचा प्रयत्न करत असलेले भांडे तुम्ही पुन्हा पुन्हा हुडकून बाहेर काढ्त असता त्याचे काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 10/14/2013 - 19:50 नवीन
फक्त आम्हीच नाही, त्या इतिहाससंशोधनात तुमचाही "म्हशीचा" वाटा आहे हे विसरू नका ;) (पळा आता हल्क येतंय मागे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 10/15/2013 - 04:55 नवीन
हाहाहा. बाकी तुमची म्हैस पण यादवकालीन मराठीत व्यायली होतीच की. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पैसा Tue, 10/15/2013 - 05:20 नवीन
त्यानंतर बॅटम्यानने त्याच्याकडच्या विश्वकोषातून "अग अग म्हशी, मला कुठे नेशी" ही म्हण खोडून टाकल्याचे कानावर आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:41 नवीन
कशी हो? कशी हो? कशी व्यायली यादवकालिन मराठीत. बा द वे वल्लीजी आप पिछले भाग में वो कही घाट मे हुइ चर्चा के बारे मे बाते कर रहे थे। कही ये वो तो नही? आय मिन बाते। समझे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 10/15/2013 - 07:43 नवीन
=)) वोहींच वोहींच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:47 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 08:10 नवीन
ही ह्ही! ही ह्ही!! ही ह्ही!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:39 नवीन
म्हशीचा? (असामी असामी मधल्या गोरं?? च्या तालावर वाचावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/14/2013 - 20:15 नवीन
आगोबा आग लावे काडिकर! :-\ णिसेध! llllllllluuuuuuuu :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ल
लौंगी मिरची Mon, 10/14/2013 - 19:44 नवीन
भयानक प्रकार आहे विडंबनाचा .
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 10/15/2013 - 06:32 नवीन
भयानक कसं काय? एका प्रेमगीतावर आधारीत हे शेतकरी गीत आहे. त्यात भयानक काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:37 नवीन
धन्याऽऽ ! आता रसग्रहणपण तुम्हीच टाका राव. त्याशिवाय हा ताकाला नेलेला हंडा लपायचा नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:38 नवीन
सुधारणा पुरता लपायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पैसा Tue, 10/15/2013 - 07:48 नवीन
वारंवार ताक आणि भांडं यांची आठवण करून देता आहात ते! आता आणि हंडा? बिचारे अत्रुप्तबुवा गरीब सापडले म्झणून त्यांना चिडवता काय? त्यांना राग आला तर घंगाळ्यावर पण कविता लिहितील. समजलेत क्काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 07:56 नवीन
घंगाळ्यावर? :)) नको!! नको आत्मुस! नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 08:14 नवीन
घंगाळ्यावर लिहिल्यास २१व्या शतकातील ताम्रपटाची एक वेगळी व्हर्जन म्हणून हा पुरावा खपूनही जाईल. अन इ.स. ४००० च्या वेळचा वल्ली "बुवाकालीन" इतिहासावर पीएचडी करेल त्याला हे उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
व
विजुभाऊ Tue, 10/15/2013 - 08:02 नवीन
वारंवार ताक आणि भांडं यांची आठवण करून देता आहात ते! ते ताक आणि ते भांडं...... घोर अन्याय. फक्त "ते" बद्दल बोलुन तो आणि ती वाचक शब्दांवर अन्याय करणेत आलेला आहे. तो हंडा , ती कढी हे " तो आणि ती " वाचक शब्द देखील वापरणेत यावेत. सम्पादक इकडे लक्ष्य देतील काय?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 08:11 नवीन
अहो संपादकच मुदपाकखान्यात उतरलेत तर सांगावे काणास? ओ वल्ली, जरा यादवकालीन मराठीत लिहा वरील वाक्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 10:43 नवीन
इये मिपाचेया संस्थळी: तयाते संपादकु आणिक सदस्यु: सदस्यु हुंदाडोनि वात आणिती: तर्‍हीं संपादके ऐसे केलें: कवणासि वदों:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ध
धन्या Tue, 10/15/2013 - 10:47 नवीन
ही महानुभाव पंथाच्या ग्रंथांमधील भाषा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 11:19 नवीन
ते ग्रंथ यादवकालीनच आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
व
विजुभाऊ Tue, 10/15/2013 - 08:20 नवीन
जरा यादवकालीन मराठीत लिहा वरील वाक्य! संपादकादी मुत्सद्दीच जर हरप्रकारे मुदपाकखान्यात लाडू वळणेस आणिक जिलबीया तळणेस खासे उतरले करौन इतरेजनांस आता कवणास मुद्दा विदा द्यावा ऐसे प्रश्न पडों लागले. तयास णाविलाज ऐसी अवस्था प्राप्त होतात्सी झाली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/15/2013 - 08:37 नवीन
अहो विजुभौ, तुम्ही ते वाक्य शिवकालीन्/पेशवेकालीन मराठीत लिहिलंय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा