Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(चल परत नव्याने सुरू करू सारे)

ध — धन्या, Mon, 10/14/2013 - 14:56
चल परत नव्याने सुरू करू सारे नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु पाटाला येईलच पाणी वरच्या त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून राबू जरासे भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू

प्रतिक्रिया द्या
20974 वाचन

💬 प्रतिसाद (71)
स
स्पंदना Tue, 10/15/2013 - 08:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 09:33 नवीन
आयला, थोरची कुर्‍हाड म्हणायची का काय ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/15/2013 - 10:51 नवीन
कृहाड "थोर"ची असो किंवा नसो (बादवे, कोण हा थोर?) पण थोरली नक्कीच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 11:23 नवीन
थोर हा स्कँडिनेव्हियन पुराणांतील इंद्र. त्याचा हातोडा खरेतर फेमस आहे. त्याच्यावर पिच्चरही बनले आहेत. अ‍ॅव्हेञ्जर्स नामक पिच्चरमध्ये त्याचाही रोल आहे. http://en.wikipedia.org/wiki/Thor
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Tue, 10/15/2013 - 11:36 नवीन
फारच थोर दिसतोय तुमचा हा थोर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/15/2013 - 12:08 नवीन
थोर अन थोरलाही आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ध
धन्या Tue, 10/15/2013 - 12:14 नवीन
"व्यासोच्छिष्टं जगत सर्वम" ही ओळ बदलायची वेळ आलीय असं वाटतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 10/16/2013 - 13:54 नवीन
असं कसं... आर्य तर स्कँडेनेव्हियाचे रहिवासी (फक्त तिकडून इकडे आले की इकडून तिकडे गेले एवढाच काय तो घोळ आहे ;) )... आत्ता इंद्र म्हणजे देवांचा राजा. आता मग तो 'थोर'च नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
सूड Tue, 10/15/2013 - 11:09 नवीन
कवीला शेतीबद्दल असलेली आत्मियता आणि शेती सुरु करण्याबद्दलची ओढ शब्दाशब्दातून दिसली. एक रम्य शेतकरीगीत !!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 10/15/2013 - 12:23 नवीन
कवि हा परकायाप्रवेशाचा आशीर्वाद लाभलेला असतो. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी देखील तो अलौकिक काव्यसंपदा निर्मू शकतो. या कवितेचे कवि बहुदा सोळावं ओलांडून गेले असावेत. त्यांच्या या काव्यात अनेक दृष्टांत आहेत.वा वा ! पण परकाया प्रवेशाचा आशीर्वाद मिळाला म्हणून काय अगदी अंकूरापर्यंत पोहोचायची काय गरज आहे. आपल्याला देण घेणं असतं ते नागरण्याशी व पीक हाती लागण्याशी ! बाकी अनेक निसर्ग कवि मराठीत वाचले. बा भ बोरकर, ना धो महानोर, बालकवि . पण धन्या यांचे निसर्ग कविचे घराणे यांच्या पासूनच चालू होते. हे घराणे फार अभिजात वाटले नाही तरी प्रत्ययकारी नक्कीच आहे !
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 10/15/2013 - 12:24 नवीन
श्रमाचे महत्व पटवुन देणारी उत्तम कविता. कामकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिवसरात्र श्रम करुन घाम गाळुन आलेले चैतन्य पदोपदी जाणवते आहे. उषेच्या गर्भात आदित्याने त्याची किरणे सोडल्यावर नव्या नव्हाळीचा जो उन्मेष जाणवतो तोच या गीतातुन प्रतीत होतो आहे. चला सगळे जण कामात स्वतःला झोकुन देउयात आणि या गीताला एक उन्नत सलामी देउयात.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 10/15/2013 - 12:29 नवीन
सलामी देण्यात आली आहे! ( झैरात करणारा ;) ) मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/16/2013 - 09:26 नवीन
जसा गणपती नंतर पितृपंधरवडा असतो , तसा नवरात्री नंतर अश्लीलपंधरवडा असतो काय ??
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 10/16/2013 - 13:48 नवीन
तुमची अश्लील शब्दाची व्याख्या काय आहे तसेच या विडंबनात अश्लील काय आहे ते सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड Wed, 10/16/2013 - 14:38 नवीन
आपल्याला कावीळ झाली की जग पिवळं दिसतं म्हणतात. अश्लील काय दिसलं ते आता जरा सांगाच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sun, 10/20/2013 - 10:01 नवीन
कावीळ झाल्याचे कबुल करत आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मारवा Sat, 10/19/2013 - 20:23 नवीन
या कवितेत काहीही अश्लील नाही असे माझे प्रांजल मत आहे. जर ही कविता अश्लील वाटत असेल तर मग या संत एकनाथांच्या भारुड ला ही अश्लील च म्हणावे लागेल परंतु ते तसे नाही आहे. सद्‌गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥ अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥ परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥ भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥ वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥ जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥ अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥ एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/19/2013 - 20:42 नवीन
खि: खि: खि: खि: खि: जोरदार +१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ख
खटपट्या Sat, 10/19/2013 - 23:40 नवीन
मस्त आहे की. हे भारुड तर एकदम आरपार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्यारे१ Sun, 10/20/2013 - 09:14 नवीन
वाह! अप्रतिम. सुंदर भारुड. आता 'असं' काही वाचनात्/बघण्यात आलं की पटकन हे भारुड आठवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/20/2013 - 09:58 नवीन
अश्लील अश्लील! काय हे दिवस आलेत. आदुगर अश्लिल लिवायच आन नंतर जीवशिवा ची भानगड आणून त्याला अध्यात्मिक टच द्यायचा! ही संतांची जुनी खोड आहे. अहो साहित्यात जरा चावट रस पाहिजेच ना? पण अशा साहित्याला प्रतिष्ठा नसल्याने संत तरी काय करनार बिचारे! मंग ओढून तानुन अध्यात्मावर गाड आनून सोडायच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा