शब्द चिमुकले सांडत होते ...
त्या इवलुश्या पानावरती
शब्द चिमुकले सांडत होते
फुलपाखरापरी फडफडणारे
कवितेचे मन भासत होते
अलगद कागद हातावरती
हाताच्याही बोटावरती
मन बोटासंगे बोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते
मी न माझी, माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते
ओळी ओळीवर अक्षरांचे
पुंजकेच जणु साठत होते
शब्द म्हणुनी शब्दासंगे
कवितेचे मन डोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते...
💬 प्रतिसाद
(32)
म
मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 20:29
नवीन
पण
अनुभवली होती....
तिच्या सहवासात
माझ्या मुखातून
शब्द बाहेर पडत होते
ती ते पाळत ही होती...
असा रमणीय काळ होता बघा..
आज काल मात्र
तिच्या मुखातुन शब्द गोळे फेकल्या जात होते.
ते टाळतांना धोतर पण माझे सुटत होते.
असा काळ आला आहे बघा....
जावु दे
गेले ते दिन गेले.....
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Wed, 10/16/2013 - 20:51
नवीन
धन्यवाद !
माफ करा हं ! मी इथे नविन आहे , कवितेत काहि चुका असतिल तर मला नक्की नक्की
सांगा हं ! मी नक्कीच ऐकेन ...:)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 10/17/2013 - 05:43
नवीन
असो,
तुमचा भाबडेपणा आणि निरागसपणा आवडला...
अद्याप रांगता मिपाकर मुवि....
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 10/24/2013 - 04:54
नवीन
चार च्या जागी आठ पेग झाले कि अशीच अवस्था होते...
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 10/16/2013 - 21:16
नवीन
अरे बापरे. अजून किती काळ नवीन म्हणून मिरवणार...... असो दोन वर्षामागच्या वर्षातील नवीन म्हणून की कसे ?
पती वनस्पती?????/? तेरा पती उचापती........ चायकी पत्ती ,,,
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 10/16/2013 - 21:26
नवीन
@मी न माझी , माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते. >>> वा वा वा! किति मत्त मत्त लिवते ही बालिका! :)
अवांतर- म्हणेल... म्हणेल कुणी ही बालिका एव्हढि ढालगज आहे म्हणुन! ;-)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/16/2013 - 21:40
नवीन
'त्या एव्ढ्याश्या जालावारती सदस्य मिपाचे भाण्डत होते'
असे विडंबन किंवा सुडम्बन पाडावे काय? ;-)
जौद्या, इरेशिरेने विडंबन कविता पाडायला आपल्याला जमणार नाय. त्याला ढिग्भर खरडफ़ळी प्रतिसाद मिळय्ण्यासाठि आपला एखादा कम्पू पण नाय :-(
.
.
असो. तुमी लिव्हा पुजाबै. चांगले लिवताव. :)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 10/16/2013 - 21:59
नवीन
क्या बात!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 10/17/2013 - 01:27
नवीन
ओ नव्या पूजाबै! तुमच नव्यान स्वागत,
हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख. म्हणजे माणुस तेच उपाधी वेगळी.
तरीही या सगळ्याच्या पलिकडे......कवितेशी प्रामाणिकपणा राखुन...कविता चांगली म्हणजे चांगलीच आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/17/2013 - 03:29
नवीन
@हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख>>> खिक्क...! :-D
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 10/17/2013 - 09:05
नवीन
हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख.
लोकं नावं नाही का ठेवणार ? अजुन कायदा झाला तरी लोकांनी अॅक्सेप्ट कुठ केलय ?
- Log in or register to post comments
फ
फुंटी
गुरुवार, 10/17/2013 - 04:18
नवीन
कविता कळली...चांगल लिहिता...
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 10/17/2013 - 04:18
नवीन
कविता जमलिये पण शुद्धलेखनाचं तेवढं बघा ना...,!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 10/17/2013 - 05:46
नवीन
आँ....
आमच्या बाबांच्या भाषेत नो कॉमेंटस....
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/17/2013 - 06:31
नवीन
बरेच दिवसांनी कविता का? असो. थोडेसे सूद्दलेखन दुरुस्त केले आहे.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 10/17/2013 - 10:50
नवीन
घुसलीस का? घुसलीस का तिच्या लेकनात?
आग आता ल्येक गेला हातातन, तर लेकनात कशापाई जीव आडकवतियास?
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 10/17/2013 - 18:49
नवीन
थँक्स हं सासुबै !
बाकि माझी नविन वाली प्रतिक्रिया एकट्या अप्पुला कळली .... बाकिचे सगळे म्ट्ठ्चेत
नुसते :-/
- Log in or register to post comments
क
कोमल
गुरुवार, 10/17/2013 - 06:53
नवीन
:!

- Log in or register to post comments
न
नक्शत्त्रा
गुरुवार, 10/17/2013 - 08:19
नवीन
पूजा चे हे नवीन रूप चं अहे….मनाला हि भावले !!!चिमुकले…. !!!चिमुकले!!!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 10/17/2013 - 08:32
नवीन
संपूर्ण कविता मनापासून आवडली.
हे खासचं!
छान लिहीतेस गं.. नियमीतपणे लिहीत जा.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 10/17/2013 - 13:39
नवीन
मला आवडली पण सासूबाईंना आवडली का ........ ?
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 10/17/2013 - 18:50
नवीन
सगळ्यांचे आभार !
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/17/2013 - 20:33
नवीन
खूप आवडली कविता.
अजून एक कर. :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 10/17/2013 - 22:29
नवीन
नाहि, म्हणजे म्हणजे कविता एकदमच सट्ल् का काय म्हणतात तशी झाली आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 10/17/2013 - 23:49
नवीन
चित्रपटात दाखवतात तसं वार्यावर विहरणारं पिस आठवलं कविता वाचून....
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sat, 10/19/2013 - 08:05
नवीन
इ लिकेद थिस पोएम वेर्य मुच. इफ योउ चोन्तिनुए सुच व्रित्तिन्ग्स ओने दय योउ विल ल्बे रेचोग्निसेद अस शेल्लेय ओफ मिसळ्पाव संस्थळ.
कीप इत उप . ई अम सुरे थत ओने दय योउ विल्ल एक्ष्चेल इन व्र्रित्तिन्ग पोएम्स.
एवेर्य पोएम ब्य्योउ विल्ल बे इन्स्पिरतिओनल फोर अल्ल्ल ओथेर्स इन थे वोर्ल्द.
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Sat, 10/19/2013 - 21:49
नवीन
- Log in or register to post comments
म
मीनल
Sun, 10/20/2013 - 00:50
नवीन
कविता आवडली. रिदमिक आहे. भवनापूर्ण आहे.
शूध्द लेखन सबकूछ माफ!!!!
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Wed, 10/23/2013 - 11:31
नवीन
शब्द चिमुकले सांडत होते , अपुले मनातील मांडत होते,
अपुल्या स्वप्नांतील अपुरी गम्मत जम्मत, शब्दांद्वारे सांगत होते....
एखाद्या कवितेची निर्मिती कशी होते हे सहज सोप्या शब्दात सांगितले आहे.....
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/23/2013 - 11:47
नवीन
लिहित रहा.....वाचत आहे....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/23/2013 - 12:15
नवीन
कविता चांगली जमलीय. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 10/24/2013 - 04:58
नवीन
चिमुकले वरून आठवलं. नेटवर एक लेख वाचला, त्यात कुणाच्यातरी बोबड्या बोलांविषयी किस्सा आहे.
मास्तर शिकवतात
पंख चिमुकले निळे जांभळे
गण्याचं लक्ष नाही म्हणून त्याला विचारतात, सांग मी काय शिकवलं ?
गण्या बोबडं बोबडं बोलत सांगतो
पंतचि मुतले निळे जांभळे
- Log in or register to post comments