अर्थ
नेहमीच असा प्रश्न पडतो मला की मी का नक्की का जगतोय?
असं कोणतं काम करायचंय ज्याची आतुरतेने वाट बघतोय?
हजारो अपेक्षा होत्या माझ्याकडून त्यांना मी जागलो का?
ज्यांना जसे हवे होते तसाच त्यांच्याशी वागलो का?
आजपर्यंतच्या आयुष्यात किती जला णांच्या उपयोगी पडलो?
माझी मदत हवी होती अश्या किती घरांच्या पायऱ्या चढलो?
कितीतरी मनं मी दुखावली असतील… कितीतरीजण मला दुरावले असतील….
माझ्या अश्या वागण्याला तेच लोक काळाच्या ओघात सरावले असतील
आपल्याच धुंदीत जगलो … हवा तसाच वागलो....
कोणी कधी काही समजावले तर त्यालाच टाळू लागलो .....
ते सगळेजण गप्प राहिले म्हणजे मीच बरोबर असा अर्थ नाही…
आता कुठे मला कळतंय की मी जगायला अजूनही समर्थ नाही ….
वेळ हातून गेलेली नाही …खूप काही करता येईल........
ह्याच प्रयत्नात कदाचित …. जगण्याचा खरा अर्थ समजून जाईल .....
खोल पाण्यात बुडताना हाती लागलेली एखादी गोष्ट ज्यामुळे तरंगत राहून किनारा गाठायची आशा तरी निर्माण होते … कधी लाकडी ओंडका सापडतो किंवा मग नुसताच हवेचा पोकळ बुडबुडा !!सही, आवडलं!