Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा नव्याने..

आ — आनंदमयी, Sun, 10/20/2013 - 09:54
पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने पुन्हा नव्या उलगडती वाटा पुन्हा नवी अधरांवर लिहिली नाविन्याची लोभस गाथा अस्तित्वाचा नवा अर्थ अन् जगणे सारे नवेच झाले बुरसटलेले पाश तोडुनी नवे पाखरू नभी उडाले... नव्या नव्याची नवलाई ही व्यापुन घेते सारे जीवन नव्या नभीची नवीन बिजली छेदून जाते जुने कृष्ण घन नव्या सुरांची नवी भुपाळी नवी सुगंधी पहाट गाते अधीर राधा पुन्हा नव्याने श्यामनिळ्याची होऊन जाते!! © अदिती जोशी 11.6.13

प्रतिक्रिया द्या
2941 वाचन

💬 प्रतिसाद (17)
च
चाणक्य Sun, 10/20/2013 - 12:19 नवीन
छान झालीये कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 10/20/2013 - 12:25 नवीन
परत एकदा जयदेव कवीचे कौतुक वाटून गेले.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 10/20/2013 - 16:23 नवीन
सुरेख रचना... पुलेशु
  • Log in or register to post comments
B
BONGALE SANTOS… Sun, 10/20/2013 - 16:31 नवीन
खुप छन
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 10/20/2013 - 18:09 नवीन
माझी ही इथे पोस्ट केलेली पहिलीच कविता ...तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून आनंद झाला! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/20/2013 - 18:59 नवीन
@पुन्हा नवी अधरांवर लिहिली नाविन्याची लोभस गाथा>>> जबरदस्त...! :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Sun, 10/20/2013 - 20:10 नवीन
मनापासून आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्पंदना Mon, 10/21/2013 - 00:49 नवीन
फारच उत्कट! मस्त!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 10/21/2013 - 05:20 नवीन
आवडली. तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Mon, 10/21/2013 - 06:39 नवीन
आपणास माझी कविता आवडली हे वाचून आनंद झाला!! माझ्या आणखी कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला http://unaadpaus.blogspot.com अवश्य भेट द्या अदिती जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
र
रुमानी Mon, 10/21/2013 - 08:36 नवीन
सुरेख.....!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 10/21/2013 - 14:59 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 10/21/2013 - 17:33 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/22/2013 - 06:47 नवीन
अतिशय आवडली. नवी स्वप्ने जुनी झाली की पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायची हा क्रम अव्याहत सुरु ठेवायचा न संपणार्‍या गोष्टी सारखा न थकता,न कंटाळता,न वैतागता जो पर्यंत कुडीत प्राण आहे तो पर्यंत
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 10/22/2013 - 11:28 नवीन
आह्हा! सकस काव्य. :)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 10/22/2013 - 13:49 नवीन
वा! सुरेख!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Tue, 10/22/2013 - 13:55 नवीन
_/\_ मनापासून आभार...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा