खाली-वर, खाली-वर
💬 प्रतिसाद
(21)
ब
बेसनलाडू
गुरुवार, 07/17/2008 - 08:37
नवीन
पण अस्पष्टसे काहीतरी रूपक बोटाला लागले.त्यावर विचार करतो आहे फिंगर चिप्स खात खात :)
(विचारमग्न)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 08:44
नवीन
म्हणजे विडंबन येणार तर वाट बघते
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 07/17/2008 - 08:51
नवीन
पण सॉल्लिड 'विद्रोही' वगैरे ठरेल. 'बोट' आणि 'खाली-वर,खाली-वर' यासाठी सुचलेले व योजलेले पर्यायी शब्द,रूपके वादळी असून ती चपखल बसतात की नाही यावर चर्चा झडेल.सगळे तुटून पडतील.ढसाळ ढसाढसा हसतील.त्यापेक्षा ही विडंबनाची अपेक्षा (कोणाकडेतरी) पास् केलेली बरी :)
(विद्रोही)बेसनलाडू
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/17/2008 - 12:50
नवीन
तुमच्या मनात हळूच 'दादा कोंडके' डोकावून गेले काहो? आम्हाला दिसल्यासारखे वाटले. ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 09:07
नवीन
कविता वाचून प्रतिसाद दिलात :)
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
गुरुवार, 07/17/2008 - 09:24
नवीन
मला खरोखर कळली नाही कविता. कृपया रसग्रहण कराल का ह्या कवितेचं?
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 10:27
नवीन
उसळणार्या लाटांत
सोडून दिली एक बोट
एक (कोणतिही) कृती केली आहे
जस की लहान मुलाला पहील्यांदाच शाळेत सोडण
अलगद
हळूवार पणे/ सांभाळुन
सोडवून घेतले बोट
वर-खाली, वर-खाली
हेंदकाळतंय पाणी
त्याच वेळेला मनात खूप चल बिचल होत आहे.
भिती ,काळजी, ताटातूट .. अश्या संमिश्र भावनांनी मन हळव झालय.
बोट...............
आता दिसतही नाही
तो क्षण ,ती कृती आता घडून गेली आहे.
आता हातात काहीच उरलेले नाही
मी
तिथेच.............
बोटाकडे बघत
हळव्या झालेल्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत.
आपण केलेली कृती चूक की बरोबर या संभ्रमात पडून ती कृती करणार्या बोटा कडे बघत मी तिथेच थांबून आहे.
खाली-वर, खाली-वर
अगदी बोटीत असल्या प्रमाणे
लाटांसोबत्/बोटीसोबत हेंदकाळत
====================
स्वाती फडणीस............२९-०१-२००८
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 07/17/2008 - 10:36
नवीन
मस्त अर्थ समजावुन दिला आहे.
सुंदर
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 07/17/2008 - 10:54
नवीन
स्वातीताई चांगली कविता
आवडली
अवांतरः कवितेचे असे उघड विशलेषण करू नये असे वाटते . निदान स्वतः कविने तरी.. एखाद्या वाचकाला समजली नसेल कविता तर व्यनिचा मार्ग आहे..
प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..
(सपष्ट वाचक)केशवसुमार
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/17/2008 - 11:01
नवीन
प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 11:02
नवीन
हा असा उपदव्याप मी पहील्यांदाच केला :D
पुन्हा करणार नाही :)
(स्वगतः एव्हडी सोपी कविता कुणाला का समजू नये )
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
गुरुवार, 07/17/2008 - 11:38
नवीन
रसग्रहणाबद्दल धन्यवाद.
कविता कळली नाही म्हणून विचारलं. ह्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही.
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 12:04
नवीन
ह्यात काही वावग नाही
पण कविता रसीकांन पर्यंत स्वतः हून पोहचावी असे वाटले .
आणि ती तशी पोहचवण्यात मी कमी पडले असे मला म्हणायचे होते
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
गुरुवार, 07/17/2008 - 12:09
नवीन
गैरसमज नसावा.
कवितेतला मी फारसा जाणकार नाही तरीही आपल्या आधीच्या कविता मला समजल्या होत्या. ही कविता वाचुन काहीच समजलं नाही म्हणुन अर्थ म्हणून अर्थ विचारला.
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
गुरुवार, 07/17/2008 - 11:44
नवीन
आणि हो..........
मला तरी ती एवढी सोपी वाटली नाही.
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
व
वरदा
गुरुवार, 07/17/2008 - 20:04
नवीन
मलाही कविता वाचून नव्हती कळली..रसग्रहण वाचूनच समजली...
छान कविता...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 07/17/2008 - 12:07
नवीन
चांगला इफेक्ट साधला आहे.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/17/2008 - 12:55
नवीन
कविता छान आहे. आपण वर अर्थ दिला आहे त्याही पेक्षा वेगळ्या छटा दिसल्या.
चतुरंग
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 15:58
नवीन
आपणाला आढळलेल्या छटा जाणून घ्यायला आवडतील :)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 07/17/2008 - 21:03
नवीन
कविता समजली नाही!
असो, पुलेशु...
आपला,
(साध्या, सोप्या व गेय कविता अधिकतर आवडणारा) तात्या.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 07/17/2008 - 21:20
नवीन
अधिक आवडली.
शब्दांच्या आकृतीचे सौष्ठव उत्तम आणि बांधणीत नाजूक गुंतागुंत दिसते.
(अर्थ येथे समजावून द्यायला नको होता - व्यनि किंवा खरडीत द्यायला हवा होता हे अन्य रसिकांचे मत पटते.)
कविताच्या कागदाची
प्रवाहात ठेवलीस बोट
अलगद
बोट सोडवून घे.
तिला हेंदकाळू दे
स्वतंत्र.
बोटात गुंतून
:
ती
तरणार नाही
बुडेल अडकून
- Log in or register to post comments