Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आजकाल हे असे आहे...

न — निमिष सोनार, Mon, 10/21/2013 - 21:16
आजकाल असे आहे... खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग) खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत) आजकाल हे असे आहे... अभिनेते राजकारणात शिरत आहेत अभिनेते "राजकारण" करत आहेत आजकाल हे असे आहे... राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत आजकाल हे असे आहे... बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स) आजकाल हे असे आहे... माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे! माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे! आजकाल हे असे आहे... गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे गरीबी श्रीमंती यातली दरी खोल झाली आहे आजकाल हे असे आहे... दहशत हाच सुसंवाद झाला आहे संवाद विसंवादाच्या गर्तेत हरवला आहे आजकाल हे सगळे असे आहे...कारण पैशाने सत्ता मिळवली आहे. आणि सत्तेने पैसा गिळला आहे. सुख पैशाला चिकटले आहे आणि पैसा सुखाला चटावला आहे. हे सगळे घडत आहे.. आणि आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात डोक्यातले जागृतीचे विचार आहेत! आपल्या हातात डोळ्यातला सकारात्मक दृष्टीकोन आहे! आणि त्याद्वारे जागा भुललेल्या सर्वांना आपापली "जागा" दाखवायचा निर्धार आहे! तर हे सगळे असे आहे!.... पण काय ते आपल्याला बदलायचे आहे!?

प्रतिक्रिया द्या
1148 वाचन

💬 प्रतिसाद (2)
व
विजुभाऊ Wed, 10/23/2013 - 09:54 नवीन
आजकाल हे असे आहे कवी गद्य लिहीत आहे. ( जशी ही कविता) गद्य काव्य बनत आहे( प्रतिसाद) गंभीर इनोदी वाटतय( मोकलाया दाही दिश्य.) इनोदी वाचून रडावेसे वाटते. ( अनासपुरेचे इनोद) आजकाल हे असे होत आहे
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Wed, 10/23/2013 - 14:36 नवीन
विजुभाऊ शी पुर्णपणे सहमत !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा