Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरत चालली रात

आ — आनंदमयी, Wed, 10/23/2013 - 09:50
'अमर प्रेम' या चित्रपटामधील 'रैना बीती जाए'या हिंदी भावगीताला मराठीमध्ये साकारण्याचा हा प्रयत्न... काही चुकलं असेलतर सांभाळून घ्या.. अजून जागी दोन लोचने नाव तुझे अधरांत सख्या रे सरत चालली रात कुठे राहिला श्याम सावळा लागे न डोळ्यासी डोळा का मजला वचनात बांधुनी उगा फिरविसी पाठ सख्या रे सरत चालली रात झुरते कधिची रात्र बोचरी दुःस्वप्ने घेतात भरारी कुठली वैरीण सांग मुकुंदा तुझी अडविते वाट सख्या रे सरत चालली रात बावरलेली प्रीत दिवाणी अन राधेच्या डोळा पाणी गेला सोडून श्याम सखा तिज लोटुनीया विरहात सख्या रे सरत चालली रात © अदिती शरद जोशी http://unaadpaus.blogspot.com

प्रतिक्रिया द्या
1306 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ध
धन्या Wed, 10/23/2013 - 09:53 नवीन
छान कविता. मात्र पहिल्याच ओळीतील लोचने शब्द पहिल्याच घासाला खडा लागावा तसा वाटला.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Wed, 10/23/2013 - 13:36 नवीन
अजुन येउद्या...!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 10/23/2013 - 17:27 नवीन
कवितेतली मध्यवर्ती कल्पना अर्थातच मूळ (सुंदर!) हिंदी गीतावर बेतलेली असली तरीही on its own ही जवळजवळ नवीनच आणि चांगली कविता आहे असं वाटलं: मूळ गीतातली पहिली दोन कडवी अशी आहेतः "रैना बीती जाए शाम ना आए निंदीया ना आए शाम को भूला, शाम का वादा रे संग दिए के जागे राधा निंदीया ना आए रैना बीती जाए" तुम्ही केलेल्या रुपांतरात बर्‍याच वेगळ्या -पण तरीही भावार्थाशी चपखल बसणार्‍या :-) - ओळी आल्या आहेत, त्यांचा मूळ गीतपंक्तिंशी फारसा संबंध नाहीये असं जाणवलं (अशा ओळी ठळक करून दिल्या आहेत) अजून जागी दोन लोचने नाव तुझे अधरांत सख्या रे सरत चालली रात कुठे राहिला श्याम सावळा लागे न डोळ्यासी डोळा का मजला वचनात बांधुनी उगा फिरविसी पाठ सख्या रे सरत चालली रात "कुठली वैरीण सांग मुकुंदा तुझी अडविते वाट" या ओळी खास आवडल्या! आणखी येउ द्यात. [अवांतरः पहिल्या त्या "अजून जागी दोन लोचने" ओळी वाचून दुसर्‍या एका अप्रतिम गाण्याची आठवण झाली: 'खुशबू' चित्रपटातलं "दो नैनोंमे आंसू भरे हैं, निंदिया कैसे समाये"]
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Wed, 10/23/2013 - 18:24 नवीन
मनापासून आभार!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा