Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भांडणानंतर...

च — चाणक्य, Fri, 10/25/2013 - 14:50
खोटेच आहे रागावणे, तुझेही अन् माझेही तोंड फिरवून झोपणे, तुझेही अन् माझेही अबोला जरी धरून, आसमंत आज सारा अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही कोण चुकले कोठे, जाणतो मनी दोघेही माघार परी न घेणे, तुझेही अन् माझेही घन बरसत आला होता, त्या कोणी ना पाहीले सांग कसे हे वागणे, तुझेही अन् माझेही अंगार निवता जरा, स्वत:शीच हासून मग ते विषय बोलण्या शोधणे, तुझेही अन् माझेही - चाणक्य २०/१०/२०१३

प्रतिक्रिया द्या
5099 वाचन

💬 प्रतिसाद (23)
म
मदनबाण Fri, 10/25/2013 - 16:45 नवीन
वा... सुरेख ! :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/25/2013 - 17:00 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/25/2013 - 17:26 नवीन
क्या बात...! क्या बात...! क्या बात...! सलाम! :)
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Sat, 10/26/2013 - 11:17 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 10/26/2013 - 12:05 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 10/26/2013 - 12:48 नवीन
फारच छान. :)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 10/26/2013 - 17:45 नवीन
किमान शब्दांत कमाल आशय.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 10/27/2013 - 04:21 नवीन
रचना खूप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/27/2013 - 06:22 नवीन
नि:शब्द संभाषण. भावनांचा कल्लोळ. मोजकेच शब्द परंतु डोंगराएवढा, वस्तुनिष्ठ, आशय. आवडली कविता. मला तर माझीच भावना कोणीतरी व्यक्त केल्यासारखी वाटली. घरोघर मातीच्या चुली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 10/27/2013 - 10:15 नवीन
+१ मोजकेच शब्द परंतु डोंगराएवढा, वस्तुनिष्ठ, आशय. एकदम जबरदस्त काव्य. चाण्यक्या तू जिंकलास!! हा चंद्रगुप्त तुझ्यावर खुष आहे. काय मागायचे ते मागून घे. संकोच नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चाणक्य Sun, 10/27/2013 - 12:57 नवीन
पायधूळ झाडलीत, अजून काय पाहिजे पाभे. :-) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/27/2013 - 12:04 नवीन
सुरेख. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 10/27/2013 - 13:06 नवीन
सुंदर रचना :) खुप आवडली
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/28/2013 - 00:12 नवीन
जियो! हा आमचा चाणक्य मधूनच कधीतरी लिहून जातो, पण काय सुंदर लिहितो पठ्ठ्या. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 10/28/2013 - 04:25 नवीन
अबोला जरी धरून, आसमंत आज सारा अस्वस्थ मनाशी बोलणे, तुझेही अन् माझेही
यासाठी तुला एक मस्तानी लागू...
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 10/28/2013 - 05:45 नवीन
सुंदर! आवाडली कविता.
  • Log in or register to post comments
र
रुमानी Mon, 10/28/2013 - 06:19 नवीन
आवडली. :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिज Mon, 10/28/2013 - 07:04 नवीन
मस्तच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 10/28/2013 - 08:45 नवीन
भन्नाटच. चाणक्यरावांना एक पार्टी लागू!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/29/2013 - 06:22 नवीन
आहाहाहाहाहा! क्या बात है ! सुरेखच! सुरेख!
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Tue, 10/29/2013 - 06:47 नवीन
सुरेख कविता...
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Tue, 10/29/2013 - 06:51 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला गुरुवार, 10/31/2013 - 15:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा