Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन म्हणते आहे

P
psajid
Sat, 10/26/2013 - 05:12
💬 6 प्रतिसाद
काळाच्या घावाने फरफटत जावे, धडपडून उठावे मन म्हणते आहे !! ती सोनेरी क्षणे जिवास ओलावे, डोळ्यात गुंतावे मन म्हणते आहे !! जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! तुला शौक सुगंधाचा विश्व गंधाळुनी यावे, चंदनासवे झिजावे मन म्हणते आहे !! भ्रमराचे ओठ अन कळीने खुलावे, गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !! रात्रीस धास्तावले ते तुझ्या नजरेचे काजवे, पहाट बनून जावे मन म्हणते आहे !! - साजीद यासीन पठाण (९९७०५७५७६६) मु : दह्यारी. तालुका : पलूस, जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )

प्रतिक्रिया द्या
3408 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पैसा Fri, 11/01/2013 - 20:43 नवीन
खूपच छान लिहिता आहात!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 11/02/2013 - 00:22 नवीन
मला आवडली कविता . फार बरे वाटले वाचून . पहाटच्या प्रहरी बोचरी असे थंडी उब साजिद्च्या कवितेची मन म्हणते आहे !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/02/2013 - 16:29 नवीन
गीत होऊन जगावे मन म्हणते आहे !!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/02/2013 - 19:02 नवीन
मस्त कविता. अवांतरः कराड कुंडल रस्त्यावरची ही भन्नाट नावांची गावं गावांची नावं दुधारी, दह्यारी, ताकारी, लोण्यारी, तुपारी... (ताकारीला काका असतात, कुंडलला दुसरे काका. वडलांचे मावसभाऊ)
  • Log in or register to post comments
P
psajid गुरुवार, 11/07/2013 - 07:34 नवीन
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! प्यारे जी यांच्या अवांतरवर - तुमचं अगदी खरं आहे सांगली जिल्ह्यात कराड - तासगाव रोड वरती ह्या दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव आणि लागुनच दुधोंडी या नावाची गावे आहेत. मला माझ्या आजी ने त्याविषयी एक इतिहास सांगितला होता तो साधारण असा आहे कि, आमच्या गावाच्या उत्तरेला महादेवाचे अर्थात सागरेश्वराचे तीर्थस्थान आहे पूर्वी इथे एक योगपुरुष साधू राहत होते त्या साधू महाराजांना वरील गावातील लोकांनी कुणी दुधाचा कुणी तुपाचा कुणी दह्याचा कुणी ताकाचा अभिषेक घातला त्यामुळे त्या गावांची नावे अशी वैशिष्टपूर्ण पडली आहेत.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 11/10/2013 - 22:54 नवीन
आवडली कविता. जे राहिले चित्र कोरे काही रंग भरावे, कुंचल्यास उचलावे मन म्हणते आहे !! हे सर्वात आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा