Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेबी कॉर्न सिगार्स

द
दिपक.कुवेत
Sat, 10/26/2013 - 06:12
💬 20 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्याची, सुख-समृद्धीची जावो हिच ईश्वर चरणी प्राथर्ना. तर मंडळी दिवाळीचं खाउन तोंड गोग्गोड झालं कि ही चटपटीत डिश बनवा आणि घरच्या सगळ्यांना खाण्यात जरा वैविध्य द्या.  साहित्यः १. बेबी कॉर्न - ५ ते ६ २. पिझ्झा सिझनींग - १ चमचा (हे रेडिमेड मिळतं) ३. तिखट - १/२ चमचा ४. लसूण पेस्ट - १/२ चमचा ५. साधं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल - १ चमचा ६. लिंबाचा रस - १ चमचा ७. चवीनुसार मीठ डिपिंग सॉस साठी: १. मेयॉनीज - ५ मोठे चमचे (फ्लेवर्ड मेयॉनीज मिळालं तर उत्तम उदा. चिली, गार्लिक, लेमन इ.). मी लेमन फ्लेवरचं घेतलयं २. बारीक चिरलेला कांदा/लाल-हिरवी सिमला मिरची - प्रत्येकी १/२ मध्यम ३. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २ ते ३ (आवडीनुसार कमी/जास्त) ४. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे ५. साखर - १/२ चमचा ६. चवीनुसार मीठ आवरणासाठी: १. उकडलेले बटाटे - ३ मध्यम (गुठळी न ठेवता नीट मळुन घेणे) २. आलं-मिरची पेस्ट - १ चमचा ३. बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे ४. कॉर्न फ्लोअर - गरजेप्रमाणे ५. चवीनुसार मीठ इतरः १. तळण्यासाठी तेल २. ब्रेड क्रम्स ३. चाट मसाला (ऑप्शनल) कॄती: १. बेबी कॉर्न स्वःच्छ धुवुन उकळत्या पाण्यात एक ३-४ मि. ठेवून लगेच थंड पाण्यात घाला म्हणजे अती शिजणार नाहित २. डिपिंग सॉससाठी दिलेलं सर्व साहित्य एकत्र करुन फ्रिज मधे थंड होण्यास ठेवा ३. ब्लांच झालेल्या बेबी कॉर्न चे दोन समान भाग करा आणि त्यात पिझ्झा सिझनींग, तिखट, लसुण पेस्ट, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून बेबी कॉर्नना मॅरीनेट करा ४. अगदी ३ ते ४ मि. मॅरीनेटेड बेबी कॉर्नना एका नॉनस्टिक पॅन मधे शॅलो फ्राय करा (ह्याने लसुणाचा कच्चा वास जाईल) ५. तळण्यासाठी तेल तापत ठेवा ६. एका बाउल मधे आवरणासाठी दिलेलं सर्व साहित्य एकत्र करा. नीट मळलं की तळहातावर थोडासा भाग घेउन चपटा करा (लंबगोलाकार) आणि शॅलो फ्राय केलेलं एक बेबी कॉर्न मधोमध ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन सिगारचा शेप द्या. शक्य होईल तितकं अतिरिक्त बटाटयाचं आवरण बाजुला काढा ७. आता हे सिगार्स ब्रेड क्रम्स मधे घोळवुन गरम तेलात गोल्डन ब्राउन होईस्त तळुन घ्या. जर ब्रेड क्रम्स चिकटले नाही तर आवरणाला बाहेरुन हलकासा तेलाचा हात लावा ८. सिगार्स गरम असतानाच आवडत असल्यास वरुन चाट मसाला भुरभुरा ९. हलके गरम सिगार्स चिल्ड डिपिंग सॉस बरोबर सर्व करा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा

प्रतिक्रिया द्या
8095 वाचन

💬 प्रतिसाद (20)
म
मुक्त विहारि Fri, 11/01/2013 - 10:20 नवीन
करणार...
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/01/2013 - 12:28 नवीन
भारी डिश असतात या मनुष्याच्या. करायलाच लागणार. वाचूनच इतक्या आवडतात... मग करणार तरी काय नं? :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/01/2013 - 13:44 नवीन
अगदी फॅन्सी प्रकार दिसतोय. मस्तच!
  • Log in or register to post comments
स
साती Fri, 11/01/2013 - 13:51 नवीन
सही आहे!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/01/2013 - 19:00 नवीन
तोंपासु. नाविन्यपूर्ण प्रकार !
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 11/01/2013 - 21:41 नवीन
अतिशय निगुतीने केलेली अशी पाककृती… सिगार मस्तचं दिसताहेत.… चकना म्हणुन जबरदस्त लागतील. ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/02/2013 - 01:40 नवीन
अफलातून आहेत!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 11/02/2013 - 09:05 नवीन
ब्लांच झालेल्या बेबी कॉर्न चे दोन समान भाग करा
दोन भाग कशाकरता करायचे?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 11/02/2013 - 12:27 नवीन
कि त्याने मॅरीनेट केलेले बेबी कॉर्न व्यवस्थीत शॅलो फ्राय होतील. त्याशीवाय रोल्स करताना अती फुगीर दिसणार नाहित.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 11/02/2013 - 12:29 नवीन
हि पाकॄ आवश्यक ते सोपस्कार करुन संपादक मंडळा पर्यंत पोचवल्याबद्दल गणपाचे खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/02/2013 - 13:46 नवीन
अरे म्हणजे हे सोने पे सुहागा झालं की. बाकी, गणपा बरा हाये ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
अ
अनन्न्या Sat, 11/02/2013 - 17:43 नवीन
दिवाळीचा फराळ खाऊन सगळे कंटाळले की हा मस्त चवदार प्रकार आहे! सिगारला दुसरे पर्यायी नाव नाही? त्याने चव बदलत नाही म्हणा, पण उगाच!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 11/02/2013 - 21:27 नवीन
सिगारला दुसरे पर्यायी नाव नाही?
बाल-मक्याची कडबोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
त
त्रिवेणी Sat, 11/09/2013 - 13:07 नवीन
ही ही ही अशक्य भारी नाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
द
दिपक.कुवेत Sun, 11/03/2013 - 07:34 नवीन
बाल-मक्याचे दांडे!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 11/03/2013 - 14:45 नवीन
जबरीच.... :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 11/04/2013 - 04:53 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 11/11/2013 - 08:39 नवीन
हा! काहीतरी वेगळ अन खतरनाक चविष्ट दिसतय. करुन पाहणार.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 11/12/2013 - 19:21 नवीन
वर ज्यांनी ज्यांनी करून पाहणार म्हटलंय त्यांचे त्यांचे बेबी कॉर्न सिगार्स चाखून बघणार ;)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 11/18/2013 - 05:27 नवीन
आधुनिक सिगार आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा