सुखाच्या शोधात.....
सुखाच्या शोधात.....
चालताना वाटेत
लागतो विसावा
आयुष्याच्या संघर्षातही
लागतो ओलावा,
नात्यांच्या या गर्दीत
कोण आपला नि कोण परका
मुखवट्या मागील जेव्हा
कळतो खरा चेहरा,
स्वतःचा शोध घेताना
संपते आयुष्यही
जगायचेच राहून जाते
सुखाच्या शोधापरी
नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा,मुखवट्या मागील खरा चेहरा जेव्हा कळतो तेव्हा या नात्यांच्या गर्दीत कोण आपला नी कोण परका हे समजते / जाणवते/ कळते असा अर्थ मी घेतला....