Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खंत

प
पद्मश्री चित्रे
Sun, 10/27/2013 - 03:22
💬 18 प्रतिसाद
मैफिली सजल्या तुझ्या पण मी तिथे वळलोच नाही चांदणे खुणवीत होते चंद्र मी झालोच नाही वेदना त्या जीवघेण्या क्षीण ना कण्हलो कधी वार तू केले जिव्हारी मी तरी हरलोच नाही भोवताली गाव सारे मी तरीही एकटा तुटलो तुजसाठी असा की मी पुन्हा वसलोच नाही सागराच्या मी किनारी दूर तू क्षितिजाकडे हरवूनी बसलो तुला अन मी मला दिसलोच नाही उध्वस्त मी झालो तरीही दु:ख ना त्याचे मला खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही

प्रतिक्रिया द्या
7607 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 11/01/2013 - 10:37 नवीन
एक एक शेर जीवघेणा... संपूर्ण रचना भन्नाट.. फुलवातै __/\__!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/01/2013 - 18:24 नवीन
केवळ सुंदर ! बस !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/01/2013 - 20:29 नवीन
फारच छान रचना!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/02/2013 - 04:47 नवीन
"उध्वस्त मी झालो तरीही दु:ख ना त्याचे मला खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही" हे तर निव्वळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 11/02/2013 - 08:20 नवीन
>>खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही<< उत्तुंग..!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/02/2013 - 13:44 नवीन
टोपी काढलेली आहे. सलाम.
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर Sun, 11/03/2013 - 14:22 नवीन
थोड्या शब्दांत इतके थेट व्यक्त होणं.......भिडलं मनाला!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 11/03/2013 - 14:55 नवीन
फारच सुंदर रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 11/04/2013 - 13:02 नवीन
इतकी सुंदर रचना, वाचायची कशी काय राहिली!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Wed, 11/06/2013 - 01:21 नवीन
उत्कृष्ट रचना .... फार आवडली. क्रान्ति यांच्या कवितांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 11/11/2013 - 02:15 नवीन
___/\___!!
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 11/12/2013 - 19:27 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
च
चित्रगुप्त Sun, 11/17/2013 - 08:55 नवीन
मस्त सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
म
मिनेश Tue, 11/19/2013 - 09:37 नवीन
अप्रतिम कविता.......
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 12/02/2013 - 18:55 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Fri, 05/29/2015 - 17:45 नवीन
अतिशय उत्कट रचना! अप्रतीम! :-)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 05/29/2015 - 22:38 नवीन
बरेच वाचायचे राहून गेलेले चांगले लेख/ कविता वरती येताहेत, धन्यवाद! ही कविताही आवडली. अवांतरः 'पद्मश्री चित्रे' म्हणजेच 'फुलवा' हे आताच कळतंय. तसं असेल तर 'फुलवा' यांच्या कविता आधीही आवडल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उत्खनक
न
नूतन सावंत Sun, 05/31/2015 - 11:46 नवीन
सुर्रेखच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा