चावडीवरच्या गप्पा – मोदी विरुद्ध राहुल गांधी (दिवाळी धमाका)
“काय हो, कर्तृत्व काय ह्या शिंच्याचे? त्या नेहरू घराण्याची सून असलेल्या इटालियन बाईच्या पोटी जन्म घेतला, एवढेच ना?” घारुअण्णा चकलीचा तुकडा काडकन तोडत, दिवाळीच्या फराळासाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.
“अरे, पण ह्या नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीने राष्ट्राची वाट लागते आहे ना! मागच्या साठ-पासष्ट वर्षात देशाचा नुसता रौरवनरक करून टाकला आहे ह्यांनी. अराजक माजले आहे नुसते अराजक, त्यात आता हे युवराज, पप्पू कुठचा. काही नाही, हे थांबले पाहिजे आणि त्यासाठी मोदींना पर्याय नाही.” घारुअण्णा उद्विग्नतेने आता बेसनलाडूचा चुरा करत.
“काय हो, ७७मध्ये ही घराणेशाही मोडून काढली होती ना? काय झाले त्याचे? जनसंघाचे किती तुकडे झाले?” नारुतात्या आता चकलीवर ताव मारत.
“अहो, त्या वेळी नाही जमले, पण अटलबिहारींच्या राज्यात सर्व काही आलबेल केले होते की नाही? ‘फील गुड फॅक्टर’ कसा होता तेव्हा? होती का ही असली जीवघेणी महागाई?” चिंतोपंत शांतपणे फराळ संपवून हात झटकत.
“होsss? मग का नाही जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिलं? का तशी सुज्ञ जनता फक्त गुजराथेतच आहे?”, बारामतीकर मिश्कीलपणे शंकरपाळी चघळत.
“अहो चावडीकर, जरा माझे ऐकता शांतपणे सर्व जण? का उगा एवढे वातावरण तापवत आहात? आणि काय ह्या शाब्दिक आणि वैचारिक फटाक्यांच्या माळा? दिवाळीची एक सकाळ जरा शांत घालवा, फराळ संपवा!” इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“सोकाजीनाना, तुम्हीच बघा बुवा काय ते आता.” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.
💬 प्रतिसाद
(16)
क
कर्ण
Fri, 11/01/2013 - 10:18
नवीन
भिक नको पण कुत्रा आवर .. अशी अवस्था होइल मोदी आल्या नन्तर
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 11/01/2013 - 10:18
नवीन
" तुमच्या मतदारसंघात कोणी लायक उमेदवार उभा केला आहे का, ते बघा. नसला तर आता सरकार तसे कळवायची सोय करतेय म्हणे, त्याचा वापर करा. त्याचा प्रभावी वापर केलात तर मोदी आणि राहुल दोघेही सोडा - कोणीच पंतप्रधान होऊ शकणार नाही."
१००% सत्य....
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 11/01/2013 - 10:32
नवीन
चर्चा छान रंगली असताना, मधेच बोलुन नुकती कुठे रंगु लागलेल्या खमंग चर्चेत, समजुतीच्या चार गोष्टी सांगून आमच्यासारख्या फुकटचे भांडण वाचायला जमलेल्या बघ्यांचा आनंद हिरावून घेणार्या सोकाजीनानांचा निषेध असो ;)
बाकी सगळ्या चावडीकरांना व सोकाजीनानांनाही दिवाळीच्या शुभेच्छा आहेतच :)
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Fri, 11/01/2013 - 10:57
नवीन
चकली-अनारश्यासारखे खुसखुशीत लेखन.
"हा सुकळीचा" असे म्हणायचे असेल ना ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 11/01/2013 - 10:59
नवीन
>>>बासुंदी घ्या आणि तोंड गोड करा!
हे आवडलं. :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 11/01/2013 - 11:31
नवीन
एकदम झक्कास! मजा आली. डांबरी फटाक्यांची माळ लागल्यासारखं वाटलं!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 11/01/2013 - 11:57
नवीन
नेहमी प्रमाणेच खुसखुशीत. सर्व टोकाची विधाने करून/ऐकवून शेवटी निर्णय वाचकांच्याच विचारक्षमतेवर सोडून चर्चा आवरती घेतली आहे. चांगला सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न स्तुत्य आहे.
- Log in or register to post comments
च
चिगो
Fri, 11/01/2013 - 12:19
नवीन
ताड ताड ताड तत्तऽऽडऽऽ.. जबरा फोडलेत फटाके, सोत्रि. चावडीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.. आणि चेंज म्हणून बासुंदी आवडली.. :-)
- Log in or register to post comments
व
वसईचे किल्लेदार
Fri, 11/01/2013 - 12:49
नवीन
लय भारी ... मजा आली.
- Log in or register to post comments
च
चाफा
Fri, 11/01/2013 - 18:35
नवीन
सोकाजी नानांची गँग हवीच होती दिवाळीत, आता दिवाळी सार्थ झाली :)
:))
सोकाजीनाना, आणि चावडीकरांसहीत सर्व भारतवासीयांना दिपावलीच्या शुभेच्छा :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 11/01/2013 - 20:21
नवीन
छान! मोदीबाबा आले तर काय? आणि पप्पूसाहेब आले तर काय? याबद्दल अभ्यास नाही पण वाचायला मजा वाटली.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 11/02/2013 - 02:26
नवीन
लेखन नेहमीप्रमाणेच झक्कास.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Sat, 11/02/2013 - 18:57
नवीन
विषयच सद्ध्याचा हॉट आहे एकदम. आणि तुम्ही मांडलात मस्त. गुड. बघूच कोण येतंय.... नमो नमः! देशाचं चांगलं होउ दे हीच इच्छा आहे.
- Log in or register to post comments
स
सुधीर मुतालीक
Sun, 11/03/2013 - 17:04
नवीन
एकदम भारी. चर्चेचा आणि त्यानिमिताने डोक्यात येणा-या विचारांचा धुम्माकुळ !! खुप छान.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 11/06/2013 - 02:10
नवीन
नापास गाडग्या!!!
:))
कस भारी वाटलं वाचताना.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sun, 11/10/2013 - 06:33
नवीन
खमंग लेख! वादावादी चांगली पकडली आहे.
एकदाची ती निवडणूक होऊन हे दोन्ही ताबूत थंडे झाल्या शिवाय ही फटाकेबाजी संपणार नाही.
- Log in or register to post comments