Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चीत्कला

अ — अज्ञातकुल, Mon, 10/28/2013 - 14:24
चीत्कला चपळ चमके गगनी स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी थरकापे अवनी तपोवनी डोळ्यात आंसवे विद्ध मनी काळीज तळी अवखळ पाणी जळ खळाळे विकल होवोनी अस्वस्थ मेघ धावे कोणी चातक चोचीत शुष्क रमणी वेदना सखी मिरवे अंगी श्रम दाह शमे ना एकांगी शिडकावा तनभर भावुकसा व्हावा अमृतमय शतरंगी ……………. अज्ञात

प्रतिक्रिया द्या
4647 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/30/2013 - 09:07 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Wed, 10/30/2013 - 09:51 नवीन
.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 10/30/2013 - 09:53 नवीन
यानिमित्ताने चित्कला मुक्ताईची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/30/2013 - 10:07 नवीन
+१ मस्तच! चित्कला म्हणजे वीज हे ठाऊक होतं. मुक्ताबाईचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. पार्थिव नाही. माऊलीच्या समाधीनंतर तिघे कुठल्यातरी यात्रेत जाताना पाऊस आला, वीज कडाडली नि मुक्ताबाई गायब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Wed, 10/30/2013 - 10:27 नवीन
ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी का काय म्हणतात ती घेतली होती, त्यामुळे समाधीत त्यांचे पार्थिव असेल तर मॉडर्न तंत्रज्ञानाने त्यांचा चेहरा रीकन्स्ट्रक्ट करता येऊही शकेल. पण मग भावना दुखावतील नेहमीप्रमाणेच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 10/30/2013 - 17:10 नवीन
चेहरा रिकन्स्ट्रक्ट केला, ते कसे दिसत होते हे ही पाहिलं. पुढं? मी म्हणतो त्यांना आज आधी चैतन्यरुपात होते तसं जिवंत करता आलं, पुढं? ऑलरेडी 'मागिलिया जन्मा मुक्त झालो' म्हणालेत. टास्क घेऊन आलेले, केला, चालले गेले (हे नासिकचं मराठी कधी कधी लई उपयोगी पडतं) आपण बसलोय करत जयजयकार! तेही कमी नाही म्हणा, पण ज्यु के जी तलं दप्तर बदलूया की कधी! लिहावाचायला कधी शिकायचं ? ते वापरायला कधी शिकायचं? का नुसताच डबा खायचा, शि शु करायची, खेळायचं नि झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धन्या Wed, 10/30/2013 - 18:07 नवीन
अहो त्यांनी कुतुहलापोटी विचारलं असेल. लगेच काही बारीला उभं राहून किर्तन दयायला नको ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 10/30/2013 - 21:36 नवीन
:( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
क
किसन शिंदे गुरुवार, 10/31/2013 - 04:24 नवीन
अहो त्यांनी कुतुहलापोटी विचारलं असेल. लगेच काही बारीला उभं राहून किर्तन दयायला नको
हा धन्या मेला एक चान्सही सोडत नाही त्या बिचार्‍या प्यारेला बोलायचा. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Fri, 11/01/2013 - 10:58 नवीन
पुढं काहीच नाही. आम्ही म्हणतो दोन्ही महत्त्वाचं आहे! कुठल्या प्रकारच्या उत्सुकतेला प्राधान्य दिलं पाहिजे हे कोण ठरवणार? ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाबद्दल साधकबाधक विचार करणे हा एक प्रकार झाला, त्याचे महत्त्व कोण नाकारतंय इथं? पण म्हणून या इतक्याशा निरुपद्रवी प्रस्तावाविरुद्धची तीव्र रिअ‍ॅक्शन रोचक वाटली. कुणाला असे कुतूहल असेल तर ते बिनकामाचे हे तुम्ही का ठरवता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Fri, 11/01/2013 - 11:14 नवीन
क्षमस्व. चूकच झाली खरंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ध
धन्या Wed, 10/30/2013 - 18:05 नवीन
त्यामुळे समाधीत त्यांचे पार्थिव असेल तर मॉडर्न तंत्रज्ञानाने त्यांचा चेहरा रीकन्स्ट्रक्ट करता येऊही शकेल.
माणूस गेला की त्याचा देह पंचमहाभूतांत विलीन होतो. अगदी आप, तेज, वायू वगैरेंमध्ये गेला नाही तर मृतदेहाचे विघटन होते. त्यामुळे समाधीत पार्थिव असेल म्हणणे बरोबर आहे असं वाटत नाही. जवळपास आठशे वर्षांनतरही तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/01/2013 - 10:54 नवीन
ते आहेच रे. इजिप्तसारखी ममी नसेलच तिथे-अझ्यूमिंग की तिथे तसं काही होतं. कातडी-मांस सगळे नष्टले असेलच. पण हाडाच्या सापळ्यावरूनही काही अंशी प्रयत्न करता येतो आणि तसा प्रयत्न काही ठिकाणी ठयशस्वी झालेलाही आहे. म्हणून म्हणालो इतकेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
स्पंदना गुरुवार, 10/31/2013 - 00:53 नवीन
>>पण मग भावना दुखावतील नेहमीप्रमाणेच.>> काय आहे, पदर धरुन मोठा झालो म्हणुन पदराची जर खरी का खोटी याचा उहापोह केल्यासारख होइल ते. माऊली म्हणतात त्यांना, तेथे तू खरी आई का दत्तक अस विचारुन जेनेटीक टेस्ट करायचा आग्रह धरल्यासारख होइल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/01/2013 - 11:01 नवीन
आजिबात विचार न करता दिलेला प्रतिसाद आहे हा. या अनावश्यक भावनाबंबाळपणाला आवर घालून मी काय म्हणतो ते पाहिलं तर माझी उत्सुकता किती निरुपद्रवी आहे ते लक्षात येईल.
तेथे तू खरी आई का दत्तक अस विचारुन जेनेटीक टेस्ट करायचा आग्रह धरल्यासारख होइल ते.
काय वाट्टेल ते. ज्ञानेश्वरांबद्दलचा माझ्या मनातला आदर मी तुम्हाला किंवा अजून कुणाला दाखवून श्रद्धावंत असल्याचे सर्टिफिकेट मिळवायची गरज नाहीये मला. त्यामुळे मूर्तिभञ्जकाचा निषेध केल्याच्या थाटातला हा प्रतिसाद खटकला इतकेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ब
बॅटमॅन Wed, 10/30/2013 - 09:54 नवीन
शब्दयोजना विशेष आवडली. शीर्षक वाचून कच्चा माल असल्याची शंका आली होती (चीत्कलाया इ.इ.) पण कविता तशी नाही हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/31/2013 - 00:51 नवीन
अज्ञातांच्या कवितात कच्चा माल शोधायचा कधीहे प्रय्तन करु नको बॅटॅ. त्यांच एक बेट आहे कवितांच. वेगळच, अद्भुत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/31/2013 - 01:14 नवीन
त्यांच एक बेट आहे कवितांच. वेगळच, अद्भुत!>>> +++१११ अज्ञाता'चा फ्यान~ आत्मू! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ब
बॅटमॅन Fri, 11/01/2013 - 10:52 नवीन
आयमाय स्वारी. आलेली शङ्का साङ्गितली फक्त. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
सार्थबोध Wed, 10/30/2013 - 10:19 नवीन
खुप भारि
  • Log in or register to post comments
म
म्हैस Fri, 11/01/2013 - 10:03 नवीन
@प्यारे १ नंबर प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा