Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किनारा

स — सागरलहरी, Wed, 10/30/2013 - 06:36
अज्ञाताचे पन्ख पसरुन काळपक्षी सांद्र क्षितिजे खुणावतो अन अस्वस्थ ललाटरेषा श्रांत चांदण्याचे कवडसे मोजत शोधत रहातात विसावा अन्तराळाच्या कुशीत ... तेव्हा रिकामे रस्तेही ... शोधत सरपटतात उद्याच्या प्रवासाची हरवलेली दिशा अन प्रसववेणा देणारी पहाट शोधू पहाते दिवसाच्या उजाडण्याचे कारण.. आणि आसमंताच्या नि:शब्द कूपात मी चाचपडत असतो आणि शोधत रहातो.. .....फक्त एका कुशीचा किनारा

प्रतिक्रिया द्या
1432 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 10/30/2013 - 07:02 नवीन
व्वाह... क्या बात!!
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Wed, 10/30/2013 - 07:49 नवीन
लै भारी
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Wed, 10/30/2013 - 13:36 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/26/2013 - 19:36 नवीन
चांगलंय. :) अवांतर: मला मुक्तछंदापेक्षा छंदोबद्ध कविता जास्त आवडतात. किंचित गुणगुणता येत असल्या तरी छान. अर्थात्‌ कल्पनेचा प्रभावीपणा कुठेच कमी होत नाही. पण आवड एकेकाची. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा