Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असू दे

ग
गवि
Wed, 10/30/2013 - 08:31
💬 44 प्रतिसाद
दिवाळीत फार फार प्रदूषण होतं. पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं.. धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं.. मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्‍या.. म्हणून असूदेत थोडे फटाके..!! .. तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे.. कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच.. आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच.. पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात.. अन मध्यमवर्गाचे हाल पुराव्याने शाबीत होतात. म्हणून असू दे थोडी महागाई..!! ... सगळा फराळ तेलातला..आरोग्याला बाधक म्हणतात.. पण शेजारच्या चकल्या हसतात तेव्हा बायाही हसतात.. विकट का होईना पण हसतात तर.. आईच्या शिकवणीचं आपलं मोहन मात्र कसं कडकडीत आणि बरोब्बर... बाया सुखावतात.. म्हणून असू दे थोडा तळकट फराळ..!! ... दिवाळीच्या संध्याकाळी चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं.. "बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं.. आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा.. पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो.. धुतल्या मनाला दिवाळीच्या दुपारी मनातल्या मनात बांधायला एक तरी किल्ला मिळतो.. म्हणून पुढच्या दिवाळीच्या ओढीसाठी.. असू दे थोडा सुट्ट्यांचा दुष्काळ..!! - गवि

प्रतिक्रिया द्या
39202 वाचन

💬 प्रतिसाद (44)
प
पियुशा Fri, 11/01/2013 - 09:17 नवीन
मस्त ! दिपावलिच्या मंगलमयी शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 11/01/2013 - 09:17 नवीन
व्वा दिवाळी सणाचं छान आणि चपखल वर्णन. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 11/01/2013 - 09:18 नवीन
गविराज, जबरदस्त.. दिवाळी शुभ करणार तुम्ही, नक्कीच.. :-)दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 11/01/2013 - 09:19 नवीन
चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं.. खर आहे राव. बाकी लेख मस्त
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 11/01/2013 - 09:24 नवीन
छानच.. आता आमच्याकडून दिवाळीच्या गवि तुम्हाला व सर्व मिपाकरांना शुभेच्छाही असू दे म्हणतो ;)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 11/01/2013 - 09:31 नवीन
मस्तच गवि... सर्वांना दिपावलिच्या मंगलमयी शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 11/01/2013 - 09:33 नवीन
साधु साधु अगदी असेच वाटते दर दिवाळीला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/01/2013 - 09:42 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 11/01/2013 - 09:49 नवीन
झक्कास! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमयी शुभेच्छा! - (दर दिवाळीत 'दिवाळं' निघणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/01/2013 - 09:49 नवीन
छान मुक्तक!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/01/2013 - 09:58 नवीन
मस्त ! :)
  • Log in or register to post comments
न
नित्य नुतन Fri, 11/01/2013 - 10:15 नवीन
एक नंबर गवि साहेब .... खूपच छान
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/01/2013 - 10:15 नवीन
नेहमीसारखंच!! आमच्या मनातलं.. जे आम्हाला बोलताही येत नाही, ते तुम्ही इथे उतरवलंत...
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 11/01/2013 - 10:28 नवीन
प्रासंगिक आहेच, गवि-टच देखील आहे. "आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो.." हे खासच!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 11/02/2013 - 05:13 नवीन
खास गवि टच ओळी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
म
मेघवेडा Sat, 11/02/2013 - 20:44 नवीन
पेश्शल गविटच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्यारे१ Fri, 11/01/2013 - 10:31 नवीन
मस्तच गवि शेट! याप्पी दिवाली. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 11/01/2013 - 10:33 नवीन
खास गवि'टच' मुक्तक! दुसर्‍याच वाक्याला बालपणातल्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी क्षणात नजरेसमोर आल्या. :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 11/01/2013 - 11:39 नवीन
असेच नेहमीप्रमाणे दिवाळीचे क्षण मस्त असू दे!. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/01/2013 - 12:19 नवीन
तंतोतंत!! "व्हय देवा म्हाराजा!!"
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 11/01/2013 - 12:23 नवीन
दिवाळीचे अगदी जसेच्यातसे वर्णन! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
परिंदा Fri, 11/01/2013 - 12:30 नवीन
मस्तच!! दिवाळी अंक आल्याशिवाय दिवाळी आली असे वाटतच नाही :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 11/01/2013 - 13:08 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/01/2013 - 15:24 नवीन
क्या बात है गवि साहेब.... मस्तच!!!! वाह.
  • Log in or register to post comments
च
चाफा Fri, 11/01/2013 - 18:19 नवीन
मान गये उस्ताद..
"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..
खरयं, एरव्ही बजेट बजेट करताना दिवाळीत बॅलन्सकडे पार दुर्लक्ष होतं :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/01/2013 - 20:10 नवीन
फार आवडली कविता. वाचताना नंतर मनातल्या मनात गप्प बसावसं वाटलं.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 11/01/2013 - 20:42 नवीन
आजच्या जमान्याच्या दिवाळीचे एकदम चपलख वर्णन… सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Fri, 11/01/2013 - 21:24 नवीन
एकदम छान वर्णन.......... सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!!! राघवेंद्र
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 11/02/2013 - 02:27 नवीन
क्या बात है..!!!!! एकदम सुरेख.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 11/02/2013 - 05:12 नवीन
खूपच आवडली. काही काळ काहीच सुचलं नाही. सगळं हातात धरलेल्या वाळूसारखं निसटंत चाल्लंय की काय असं वाटत होत पण "असू दे" असं पुन्हा पुन्हा वाचल्यावर खरंच वाटलं असू दे, सगळीच मजा काही संपलेली नाही. (पुन्हा एकदा आनंदी) रंगा
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 11/02/2013 - 08:02 नवीन
मस्तच...... :) :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिज Sat, 11/02/2013 - 08:29 नवीन
गविशेठ, भारी लिहिता राव !
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 11/02/2013 - 08:30 नवीन
आवडलं. नेमक्या शब्दात व्यतीत झालयं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/02/2013 - 09:45 नवीन
मुक्त केलेला प्रत्येक क अवडला. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 11/02/2013 - 10:14 नवीन
धन्यवाद हो बुवा. पण आमच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमची खर्याखुर्या फुलांनी बनवलेली रांगोळी सर्वार्थाने सुंदर आहे. पहाटे उठून तुम्ही ती ज्या निगुतीने बनवली आहे त्याचा जवाब नाही. एक आकार वेडावाकडा नाही की कुठे अंशभर ढोबळपणा नाही. आणि त्यात मिपाप्रेमाखेरीज लाभ किंवा फळाची काही अपेक्षा नसताना. टोपी काढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/02/2013 - 10:07 नवीन
सरस मुक्तक ! दु:खातही सुख शोधायची प्रवृत्ती भावली... म्हणतात ना की "हवं असलेलं मिळण्यात नाही तर मिळालेलं हवं असण्यात सुख असतं."
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/03/2013 - 09:16 नवीन
मुक्तक आवडलं. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येतं की दिवाळीचा उत्साह अजिबात कमी नाही. थोडी महागाई, थोडा फराळ, थोडे दमट आणि नवे फटाके, आणि असं सर्व सर्व मुक्तातून स्सहीच पोहचलं. >>>> पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो खासच. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर मुतालीक Sun, 11/03/2013 - 16:22 नवीन
मजा आली, छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments
म
मन१ Mon, 11/04/2013 - 11:19 नवीन
बहुत खूब. वर तिमा म्हणतात त्यच्यशि सहमत.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Mon, 11/04/2013 - 15:43 नवीन
झक्कास मुक्तक. सर्वाना दिवाळीच्या शुभेछा.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 11/06/2013 - 01:44 नवीन
असु दे! असु दे! किती मनापासून उतरलय वास्तव अन सणाची ओढ! काय रोजचा कामाचा धबडगा असतोच, पण दिवाळीचा म्हंटल्यावर कसा हाताला जरा वेग येतो. तोच फराळाचा जिन्नस वर्षात कधी केलातरी असा चविला लागत नाही. चारच म्हणता म्हणता सहासात पदार्थ अस्सेच बनवले जातात. पैसा नाही म्हणता म्हणता चार कपडे खरेदी होतातच. फार छान लिहीलं गवि!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Fri, 11/08/2013 - 06:53 नवीन
दिवाळीचे वास्तव अगदी तंतोतंत उतरलय लिखानातुन. :)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 11/10/2013 - 20:27 नवीन
पुन्हा वाचलं... :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 11/10/2013 - 21:03 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा