Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शापवाणी

ध — धन्या, Wed, 10/30/2013 - 15:06
झडली तुझी जीभ गेली तुझी वाचा होउ दे रे खाचा डोळ्यांचिया पडतील रे पाने कुणी लावीना शेपूट राहशील असाच राणीविना वेचशील कागद मागशील भीक मारुनिया झाडू राहशील झालं रे वाटोळं तुझा वळला संगाड टोचतील कावळे बसुनिया फळवशील रांडा महारोग होईल पडतील कीडे अंगावरी अशी शापवाणी कानाला सवय वाढले ते वय मन नाही

प्रतिक्रिया द्या
5705 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
प्यारे१ Wed, 10/30/2013 - 15:12 नवीन
>>>वाढले ते वय मन नाही ___/\___ नतमस्तक!
  • Log in or register to post comments
ब
बलि Wed, 10/30/2013 - 15:31 नवीन
कोण्या एका स्त्री ने एखाद्या लंपट पुरुषाला दिलेल्या शिव्या आहेत बहुदा :)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/30/2013 - 15:57 नवीन
शिसारी आली वाचून !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/30/2013 - 17:26 नवीन
काय बे धन्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/30/2013 - 17:41 नवीन
:(
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/30/2013 - 17:45 नवीन
हे काय रे!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 10/30/2013 - 18:58 नवीन
धन्या, थोडे दिवस 'लॉरेल अ‍ॅन्ड हार्डी' बघ बाबा. बरं वाटेल.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 10/30/2013 - 19:17 नवीन
...!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/30/2013 - 19:25 नवीन
व्हाट ह्यापंड माय फ्रेंड? :)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Wed, 10/30/2013 - 19:35 नवीन
पण मित्रा मला तू नेहमिच द्वंद्वामाधे दिसतोस...सगळे असून नसल्यासारखे हे मी अधिसुध्दा म्हटले आहे. पण बास, आता ती वेळ आली आहे मस्त पैकी व्ही आर एस घेउन टाक, करिअर ओरिएंटेड नसलेल्या मुलीशी लग्न कर अन मोकला हो. बस फ़क्त जग. आणि मग ज्यात रस आहे तेच क्षेत्र करिअर म्हणून निवड गरज म्हणून न्हवे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/30/2013 - 19:37 नवीन
वाढले ते वय, मन नाही >> कुठेतरी कैतरी आत जळतंय बहुधा. असो, लिहून मोकळे झालात हे महत्त्वाचं. तेवढंच बरं वाटेल.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 10/30/2013 - 23:29 नवीन
कष्ट! कष्ट!! कष्ट!!! करताना कसं म्हणतात? यश येइल हो! कष्टाचे फळ मिळेल हो! पण संघर्ष काही संपत नाही. कष्टाने जेथवर पोहोचले तेथे तर न कष्टणारेही ठाण मांडुन बसलेत? मग वैचारिक संघर्ष! अर्थात जुनाच...आहे रे अन नाही रे वाल्यांचा! सुटका? विचाराल तर ....नाही! परिणाम? अर्थात मनाविरुद्ध! तरीही मागच्यांनी खाल्लेल्या खस्ता आठवायच्या. स्वतः खाल्लेल्या खस्तासुद्धा आपणच आठवायच्या. वर्तुळाबाहेर तेव्हढच पडायच, जेव्हढ गरजेचे आहे... नाहीतर वर्तुळालाच अखंड पृथ्वी मानून सुखी रहायच. नजर...... आत वळवा... काऽऽही गरज नाही, विशाल दृष्टीकोणाची. आरसा पाहताना स्वतः स्वच्छ आहोत ना एव्हढच बास. जग साफ करुन आलोय का? हे कशाला ? बघा जमल तर.. __/\__!!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/07/2013 - 17:43 नवीन
हे आवडलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
क
किसन शिंदे गुरुवार, 10/31/2013 - 02:43 नवीन
अशी शापवाणी कानाला सवय वाढले ते वय मन नाही
:( कानाला सवय झालीये तर मेल्या लक्ष कशाला देतोस या शापवाणीकडे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 11/03/2013 - 16:09 नवीन
काही आतलं जळत नाही नि काही नाही. कवि मंगेश पाडगावकर व संदीप खरे रे दोघेही नेहमी म्हणतात कविचे खाजगी आयुष्य व त्यांच्या कवितेतील कंटेन्न्ट यांचा काही संबंध नसतो. ( एरवी ढेरेपोटे सुरेश भट " मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे हे का लिहिते झाले असते ?)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sun, 11/03/2013 - 19:51 नवीन
अन आप्त ्स्वकियांच्या अवास्तव अपेक्सा पुर्न न केल्याबद्दलाचे शिव्याशाप यात फरक असतो असे माजे निर्व्याज नसलेले मन ठामपणे सांगते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्यारे१ Sun, 11/03/2013 - 19:58 नवीन
अग्नि, तू का बेशुद्धलेखनाची प्रॅक्टीस करायला का काय ? 'काही विवक्षित' सदस्यांना उत्तर देताना अग्ग्गदी सु...द्द असते की लेखण! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/07/2013 - 19:00 नवीन
@अग्ग्गदी सु...द्द असते की लेखण! >>> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 11/07/2013 - 19:58 नवीन
काही कारणाने गेले काही दिवस निव्वळ मोबैल अक्सेस उपलब्ध (राहणार)आहे सबब शुध्द लेखनाला फाटा दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सुहास.. Sun, 11/10/2013 - 10:41 नवीन
बेक्कार शाप .. इतका राग ??
  • Log in or register to post comments
र
रमताराम Sun, 11/10/2013 - 14:09 नवीन
एकदम शापबिप दिऊन र्‍हायलाय्स? आल इज वेल?
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 11/10/2013 - 16:28 नवीन
वाढले ते वय मन नाही
हे म्हणायला सोपे, परंतु अशी शापवाणी तोंडी येई पर्यंत त्या व्यक्तीने काय भोगले असेल? ते एक देवच जाणे! म्हणतात ना, --- "जावे त्यांच्या वंशा - तेव्हा कळे".
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/26/2013 - 19:41 नवीन
का कुणास ठाऊक.. हे वाचून चर्पटपंजरिकेतला एक श्लोक आठवला - यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/27/2013 - 03:08 नवीन
धन्यासेठ ऑल इज वेल दिसत नाय....! बाकी, रचना वृत्तात थोडी गंडली आहे पण एवढं तेवढं चालायचंच. अभ्यासासाठी आमच्या धोंडोपंताचा देवद्वार छंद (काय हे प्राडॉ. धन्याच्या मनात काय चाल्लंय आणि तुम्ही पेपर तपासताय) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा