तू उत्तर नाही दिलंस मला
तू उत्तर नाही दिलंस मला
मी एक प्रश्न विचारला
का तुझ्यातल्या नव-याने
आज माझ्यावर हात उगारला?
तू उत्तर नाही दिलंस मला
हवं तर पुन्हा विचारते
तुझ्या चुकांचं खापर मी
का डोक्यावर माझ्या मारते?
तू उत्तर नाही दिलंस मला
मी केव्हाची वाट पाहत्येय
संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय
आणि मीही त्यात वाहत्येय
तू उत्तर नाही दिलंस मला
उलटून बोलतोयस तू फक्त
तुझ्यासारखाच मीही जाब विचारला
तर का खवळतंय तुझं रक्त?
तू उत्तर नाही दिलंस मला
आता वाट पाहून मी थकले
तुझा विश्वास मिळालाच नाही
आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले
💬 प्रतिसाद
(4)
प
पैसा
Sun, 11/03/2013 - 18:15
नवीन
कविता आवडली. नवर्याचं टिपिकल पुरुषी (समजलं गेलेले) व्यक्तिमत्व जर लपवून ठेवलेलं असेल तर बायकोने असा चुकून कधी एखादा प्रश्न विचारल्यावर सत्य बाह्र पडतं आणि मग ती न दिलेली उत्तरं पचवणं त्या बायकोला कठीण जातं.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 11/06/2013 - 02:43
नवीन
__/\__!!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 11/06/2013 - 03:44
नवीन
उत्तम
- Log in or register to post comments
P
psajid
गुरुवार, 11/07/2013 - 08:13
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments