कलादालन
रांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे.
Primary tabs
या वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिपाकरांसाठी देत आहे.
*किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु. :)























मला विशेष आवडलेली रांगोळी :-

याच वरील रांगोळीचा क्लोजअप :-

{हौशी फोटुग्राफर } :)
मदनबाण.....
कॅमेरा :- निकॉन- डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
भारीच रे.... एक से बढकर एक :)
छान!
शेवटच्या रांगोळीला सलाम. :)
असेच म्हणतो.
धन्यवाद बाणा
एक नंबर काम केलंस भावड्या फोटो टाकून. यंदाच्या वर्षी त्यांनी स्त्रीशक्ती हि मुख्य संकल्पना समोर ठेऊन रांगोळी प्रदर्शन भरवलेय. काल संध्याकाळी मी ही गेलो होतो. सर्व रांगोळ्या एकापेक्षा एक आहेत.
ये स्साला इधर ऐसा इच होता है.
इसी लिये तो हन इधर है.
सुंदर रांगोळ्या आणि अतिशय सुंदर फोटो.
ठ्यांकू मदनबाण !
अप्रतिम आहेत सगळ्याच रांगोळ्या. इतक्या प्रवाही माध्यमाला काबूत ठेवणं सोपं काम नाही. कोल्हापूरला श्री विजय टिपुगडे म्हणून कलाकार आहेत. अप्रतिम शब्द थिटा वाटेल अश्या रांगोळ्या काढतात. नंतर काही फोटो टाकेन शोधून.
शेवटची आणि मेधा पाटकरांची विशेष आवडली.
शेवटची रांगोळी अप्रतिम आहे.
मस्त. थीम आवडली आणि रांगोळ्या अप्रतिम आहेत. कलाकारांचं कौतुक वाटलं आणि थोडा हेवाही वाटला.
बाईनं मनात आणलं तर ती जग बदलू शकते
या एका वाक्यावर एक गोखलेला एक अचाट " ती " मिळाली.
अशा फार मोठ्या " ती" इथे जमल्यात. त्याना व कलाकारांना मानाचा मुजरा !
धन्यवाद मंडळी ! :)
वरील सर्व रांगोळ्या एचक्यु ट्रू कलर मधे बघता येतील :- Rangoli 2013
कलर द्वारे चेहर्याचे भाव दाखवणं एकवेळ ठिक पण रांगोळि काढुन ते सजीव असल्यासारखं दिसणं ह्या कलेला खरचं तोड नाहि. बाणा फोटो अजुन असले तर टाक....
सु रे ख!
सुलोचनादिदींची विशेष आवडली.
रांगोळ्या आहेत असे वाटतच नाहीय. शेवटची तर अप्रतिम!
सुलोचना यांची रांगोळी केवळ अप्रतीम. फोटोच वाटतोय तो.
काय कला असते एकेकाच्या हातात!
मी फक्त स्वस्तिकपटू असल्याने वरील रांगोळीकर्त्यांबद्दल कौतुक वाटले.
मदनबाण,
न्यू गर्ल्स स्कूल ठाणे येथे पण दर वर्षी रांगोळी प्रदर्शन भरते. तसेच टेकडी बंगला येथे एका महापालिकेच्या शाळेमध्ये पण रांगोळी प्रदर्शन भरते.
मी स्वतः ह्या रांगोळी प्रदर्शनाला गेलो होतो...५ रुपये प्रवेश फी आकारली गेली तेव्हा वाटलेही नव्हते की इतक्याश्या पैशात अवर्णनीय आनन्द आणि अशक्य कलाकृती पहायला मिळतील..ही कला मानवी नाही,दैवी आहे.....सर्व कलाकारांना मनाचा मुजरा.....फोटो खूपच छान आलेत मदनबाण....
कुठे न्यू इंग्लिश स्कूल मधे आहे का हे ?
याच ठिकाणी गेल्या वर्षी भरलेलं हे रांगोळी प्रदर्शन! :)
@ खटपट्या / वेल्लाभट
हे प्रदर्शन न्यू गर्ल्स स्कूल नौपाडा ठाणे इथेच भरले आहे.
सगळ्याच रांगोळ्या छान आहेत. थीम आवडली. शेवटची फारच खास! मदनबाण धन्यवाद! तुम्ही रांगोळ्यांचे फोटो टाकल्यामुळे प्रत्यक्ष नाही तर निदान असे तरी पाहता आले. :)
यंदाही तू न चुकता हे प्रदर्शन पाहून इथे आमच्यासाठी चित्रे टाकलीस त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
चित्रे क्लासच आहेत. शेवटले सुलोचनाबाईंचेतर लाजवाब! काळ्यापांढर्या रंगातला फोटो जमिनीवर चिकटवला आहे की काय असे वाटावे इतके अप्रतिम आले आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यांमधले आणि चेहेर्यावरचे सोज्ज्वळ भाव पुरेपूर उतरले आहेत. मदर टेरेसा आणि मेधा पाटकरांचीही चित्रे सुरेख आहेत. काय कलाकार मंडळी असतात! टोपी काढली आहे!!
(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का? तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्यांशी सुद्धा ओळख होईल.)
(रांगोळीप्रेमी)रंगा
धन्यवाद रंगासेठ ! :)
(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का? तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्यांशी सुद्धा ओळख होईल.)
माझी या कलाकारांशी कुठलीही वैयक्तिक ओळख नाही, जर ते कलावंत त्यावेळी तिथे असते तर नक्कीच त्यांची इथे ओळख करुन देता आली असती.
कलाकारही प्रदर्शनात हजर असतात म्हणून.
धन्यवाद मबा.
नुसत स्वतःपुरत पाहुन खुष होण्याऐवजी आमची आठवण ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
छान आभार!
मस्तच. :)
शेवटची रांगोळी तर आइशप्पत म्हणायला लावणारी :)
शेवटची रांगोळी खरंच अप्रतिम आहे.