Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"वेडी"

अ — अमेय६३७७, Sat, 11/09/2013 - 06:31
येताजाता शिव्या सारख्या गाड्यांवरती दगड मारते जरतारीच्या आवेशाने लक्तर दैवी ती सावरते केस पांढरे - जटाच भारी मिचमिच डोळे लुकलुकताना तोंड चालते हातांसोबत तारस्वराने ओरडताना येणारा अन् जाणाराही वाट वाकडी दुरून करतो मधमाश्यांच्या मोहोळाशी कोण कशाला उगाच भिडतो? हसते वेडी सदा मुखाने आनंदी परि कधी न दिसते मूल पाहुनी कुणी गोजिरे तळमळताना अश्रू पुसते स्थळकाळाशी तुटले नाते एकच आठव गतकाळाचे रहदारीने ठोकरलेल्या शिशुदेहाच्या कलेवराचे प्रेत टांगुनी वेशीवरती कुणी चौकशी, कुणी सांत्वना दुःखामागे धिंडवड्यांच्या नको जाहल्या उरी यातना वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगता, झिजता कणाकणाने तेव्हापासुन मरे 'शहाणी' … -- अमेय

प्रतिक्रिया द्या
5611 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ज
जेपी Sat, 11/09/2013 - 06:59 नवीन
*****
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 11/09/2013 - 07:05 नवीन
उत्कृष्ठ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 11/09/2013 - 07:34 नवीन
अतिशय चित्रदर्शी आणि प्रभावी!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 11/09/2013 - 07:53 नवीन
बाप रे! सत्य घटनेवर आधारीत आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Tue, 11/12/2013 - 06:22 नवीन
हुबेहूब कोणा एका वेडीला समोर ठेऊन असे नाही पण अनुभवलेल्या दोन तीन घटनांची आपसूक सरमिसळ झाली आहे ही कविता लिहिताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
व
वडापाव Sat, 11/09/2013 - 09:50 नवीन
कविता आवडली!! डोळ्यांसमोर वेडी उभी राहिली.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 11/09/2013 - 21:42 नवीन
चटका लावून गेली तुमची ही रचना
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/09/2013 - 22:26 नवीन
ओ नका ओ! :( किती चित्रदर्शी लिहीताय!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 11/10/2013 - 08:41 नवीन
यापूर्वीच्या कवितेप्रमाणेच प्रभावोत्पादक कविता. तुम्ही एकादे महाकाव्य लिहायला घ्या राव. मोठे आव्हान घ्या अंगावर.
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Sun, 11/10/2013 - 09:55 नवीन
महाकाव्य ... बाप रे. नित्याचे व्यवहार सांभाळून -- केवळ आवड म्हणून-- हे असलं लिहिणं वेगळं आणि महाकाव्य वेगळं. त्यासाठी प्रदीर्घ चिंतन, अभ्यास आणि वेळ हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sun, 11/10/2013 - 13:05 नवीन
केवळ आवड म्हणून-- त्यासाठी प्रदीर्घ चिंतन, अभ्यास आणि वेळ हवा.
म्हणूनच लिहिलं, मोठं आव्हान घ्या अंगावर. सुरुवात करून बघा, जीवनाचा एक वेगळाच अर्थ उलगडू लागेल. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय६३७७
स
सुधीर Sun, 11/10/2013 - 09:49 नवीन
कटू सत्य!
  • Log in or register to post comments
P
psajid Mon, 11/11/2013 - 08:01 नवीन
अस्वस्थ करुन जाणारी कविता !
  • Log in or register to post comments
ज
जयनीत Mon, 11/11/2013 - 12:04 नवीन
<<<वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगता, झिजता कणाकणाने तेव्हापासुन मरे 'शहाणी'>>>
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 11/11/2013 - 12:09 नवीन
नेक्स टाइम असा टिपिकल विषय नका निवडू....
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Mon, 11/11/2013 - 12:29 नवीन
अस्वस्थ करून गेली ही कविता. बर्याच वेळा माणसं कुठल्याश्या आठवणी विसरू पाहतात, काही आठवणी खरच विसरायच्या असतात तर काही आठवणी जगण्याचा एक भाग बनून जातात. काही लोक आपलं शहाणपण टिकून ते वेडपण दडून ठेवतात तर काही हे करू शकत नाही. काही आठवणी ह्या पाण्यातल्या भोवर्यासारख्या असतात, बरेचजण त्यातून बाहेर पडून पुढे जातात, काही अडकतात आणि त्यात गुंतून राहतात. अशांनाच आपण वेडे म्हणून प्रवाहातून वेगळे पाहतो. "वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगता, झिजता कणाकणाने तेव्हापासुन मरे 'शहाणी' …" जबरद्स्त...
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Mon, 11/11/2013 - 12:41 नवीन
कविता आवडली.... उत्कृष्ट लिखाण..... शाळेत असतांना एका कवितेत म्हटले होते कि जे मनी आहे ते पूर्णतः कवितेत उतरत नाही.... तुमची हि कविता त्यास अपवाद
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/11/2013 - 20:41 नवीन
शेवटचा चटका...सहन न होणारा! :-(
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/26/2013 - 19:22 नवीन
नि:शब्द.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 11/26/2013 - 21:55 नवीन
अप्रतिम . कवितुन विषय मांडणं कठिण् पण यु आर ग्रेट
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/27/2013 - 05:24 नवीन
तुमच्या सगळ्या कविता वाचतोय एक एक करून
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 11/27/2013 - 12:01 नवीन
कविता छान आहे पण "बाई गेली" इतकी नाही आवडली. सध्या करुण रसावर भर दिसतोय तुमचा!
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Wed, 11/27/2013 - 18:19 नवीन
मुद्दाम करुणरस म्हणून नाही पण या काही कविता अश्या झाल्या आहेत खर्‍या. बाई गेली किंवा इतर कवितेशी वाचक म्हणून केलेली तुलना समजू शकतो पण कवी म्हणून अभिव्यक्तीत थोडा फरक आहे. बाई गेलीमध्ये निव्वळ त्रयस्थपणे काहीश्या चिडीच्या सुरात विषय मांडलाय पण या कवितेत वेडामागील कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. असो. पुढची नर्म- शृंगाराची रचना जरूर वाचून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
सूड Wed, 11/27/2013 - 12:18 नवीन
चित्रदर्शी रचना. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Wed, 11/27/2013 - 12:25 नवीन
निशब्द ! घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मतिमंद ते खेद मानी वियोगे
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Wed, 11/27/2013 - 18:20 नवीन
आवर्जून दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ गुरुवार, 11/28/2013 - 12:35 नवीन
अस्वस्थ. आणि हेल्प लेस करुन गेली कवित. सुन्दर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा