अव्यक्तांच्या समिधा
आज ना उद्या
वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल..
तग धरून उभारलेली
अंग चोरून वाळलेली
आज ना उद्या
घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती
काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!
जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी
अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही..
शेजारी उगवूनही जपलेल्या
विरहाची माती व्हायची नाही
जोडी अचेतन झाल्यावर
कुणी पाहीलंच जर.. खणून
तर सापडतील त्यांना
दबलेल्या हुंदक्यांत गुंडाळलेल्या
अव्यक्तांच्या समिधा... !
अवगुंठीत ज्वालामुखीसारख्या
आतल्या आत खदखदणा-या
अनामिक ओढीने एकमेकांत सळसळत गुंतणा-या
चैतन्याच्या समाध्या ...!!
💬 प्रतिसाद
(17)
ज
जेपी
Sun, 11/10/2013 - 15:11
नवीन
*****
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 11/10/2013 - 15:24
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
अ
अमेय६३७७
Sun, 11/10/2013 - 15:58
नवीन
व्वा. तीव्र भावना असूनही भडक किंवा दुर्बोध झालेले नाहे हे विशेष.
<<पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!>> अप्रतिम
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 11/10/2013 - 16:15
नवीन
अनामिक ओढीने एकमेकांत सळसळत गुंतणा-या
चैतन्याच्या समाध्या ...!!>>> नि:शब्द! __/\__
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 11/10/2013 - 19:49
नवीन
एकदम भारी लिहिलय. :)
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Mon, 11/11/2013 - 01:45
नवीन
झालीये कविता.
- Log in or register to post comments
झ
झंम्प्या
Mon, 11/11/2013 - 03:43
नवीन
कविता आवडली. नेहमी माझ्या मनात हा विचार येतो, कविता कुठलीही असो, जेव्हा एखादी भावना कवितेत प्रदर्शित होते, तेव्हा ती भावना कवीने / कवयात्रीने स्वतः अनुभवलेली असते ? विना अनुभवाने ती भावना त्याच तीव्रतेने कवितेत उमटू शकते का ?
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Tue, 11/12/2013 - 13:36
नवीन
मस्त प्रश्न आहे.
कविवर्य भा रा तांबे यांना एक वर्षभर कविता सुचत नव्हती असं म्हणतात आणि जेव्हां कविता आली तीच मधुघट !
याउलट दुसरं उदाहरण म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं. " श्रावणात घननिळा " ही कविता त्यांना एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्यात लोकलच्या घामट डब्यात धक्के खाताना सुचली.
- Log in or register to post comments
इ
इन्दुसुता
Mon, 11/11/2013 - 05:36
नवीन
कविता आवडली...हुरहूर लावून गेली.....
- Log in or register to post comments
P
psajid
Mon, 11/11/2013 - 07:24
नवीन
पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या
तुटता तुटणार नाहीत..
नाग-नागिणीसारख्या मिठ्या
सुटता सुटणार नाहीत
खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या
कितीही खणलं तरी पुरून उरतील..
तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !!
हे खुप तिव्र आणि वेदनांदायक !
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/11/2013 - 10:53
नवीन
सु रे ख!
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Mon, 11/11/2013 - 10:58
नवीन
सुरेख ....
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Tue, 11/12/2013 - 13:32
नवीन
आपल्या सर्वांचे मनापासून आभार. :)
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 11/26/2013 - 19:26
नवीन
म्हटलं तर हसु.. म्हटलं तर आसु! सुंदर.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 11/27/2013 - 04:38
नवीन
खूप छान लिहिलंय
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/27/2013 - 04:48
नवीन
कवयित्री/कवि कोल्हापूरकडचे दिसतात. कारण उभे राहणे ला उभारणे असा प्रयोग कोल्हापूरी रांगड्या मराठीतच बहुतकरुन होतो.
असो. कवितेतले शब्दवैभव छान परंतु सुमार बुद्धीमत्तेमुळे त्यातले अर्थवैभव काही समजू शकले नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 11/27/2013 - 05:57
नवीन
प्रथमदर्शनी प्रेमीयुगुलाची, पति-पत्नीची धाटणी वाटली कवितेची...पण आणखी काहि क्रीप्टीक असेल तर आपल्या टाळक्यात अजाबात घुसली नाय. कुणी माईचा लाल/लाली रसग्रहण लिहील तर काय उलगडा होईल.
- Log in or register to post comments