Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूकंप....!

P — psajid, Wed, 11/13/2013 - 06:44
आज खूप दिसांनी पुन्हा त्या वास्तूत आलु, पडक्या पांढरीच्या इटा बघून काळूखात त्या हरवून गेलू !! माती सारता हातांनी डोळं उघडं निर्जीव धूड, नवलाईत सगळं डोळं वासं झोपल्याचं त्यात गूढ !! वाटतंय राहून राहून मना माती कृतघ्न नसावी झाली, आखीरपर्यंत आसंल थरथरली जरी शेजाऱ्यांनी मान ढाळली !! या मातीतच वलावा उभारा त्यावर निर्धास्त सोडला पसारा, दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !! दैव घालाच तिथं वास्तूचं काय ? बायको मुलांसंगती कारभारी जाय, पर मी आकारल्या मातीला वाटलं असावं समद्यासोबत माझा हात धरायचा नाय !! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर पांढरी माय चमकत हुती, पाणी साचल्या डवंग्यात मातुर पानकणसं तुरयात हुती !! येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा ओकू कि पिवू त्याला आता, धैर्य बळ वृधत्वाशी विरघळता कंप सुटे उभे राहता !! श्री. साजीद यासीन पठाण

प्रतिक्रिया द्या
1528 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
जेपी Wed, 11/13/2013 - 08:12 नवीन
***
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 11/13/2013 - 08:12 नवीन
***
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/13/2013 - 08:15 नवीन
साजिद भाई, (तुमच्या दुसर्‍या कवितेच्या तुमच्याच प्रतिसादाला इथं उत्तर देतोय.) प्रतिसादांची काळजी न करता लिहीत रहा. तुमच्याकडून इतर लेखांवर सुद्धा थोडे प्रतिसाद पण देत चला. कधीकधी त्यानं मला प्रतिसाद दिला नाही मग मी का देऊ असं असतं 'आमच्याकडं' ;) लेखन भिडणारं असलं तर आपसुकच प्रतिसाद मिळतो. कधी नेमकं काय लिहायचं ते समजत नाही म्हणून देखील प्रतिसाद मिळत नाहीत. प्रसंगानुरुप कधी ताज्या गोष्टींबद्दलच्या लिखाणाला मार्केट पटकन मिळतं. त्यामुळं लिहीत राहा. :)
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Wed, 11/13/2013 - 08:34 नवीन
अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं, मळक धोतर, टोपी, कोपरी, वाढलेली दाढीची खुट, पाठीत वाकेला, पाठ पोट एक झलेला मळक्या अंगाचा, हातात माती घेऊन भरल्या डोळ्यांनी घराकड पाहत असणारं कोणी, समोर दिसतंय. येतोय हुंदका तेंव्हाचाच एकदा ओकू कि पिवू त्याला आता, मुक्याने मार खाऊन गप्प उभा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/15/2013 - 07:58 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
श
शैलेन्द्र Fri, 11/15/2013 - 08:01 नवीन
काळजातुन हलवणारी कविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
A
arunjoshi123 Fri, 11/15/2013 - 07:22 नवीन
दोन चिमुकली फळे संसारा झोपली गार ओढून ढिगारा !!
हृद्य
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Fri, 11/15/2013 - 07:23 नवीन
हृद्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा