'निरोप'
जाहली वेळ समयाने केली खूण
मौनातच वाजे वेदनेतली धून
कालची पोर झाली केव्हा गे मोठी
हक्काचे घरटे सोडुनि जाते पाठी
हातांशी धरली इवली जेव्हा बोटे
'आधार तुझा ही', काळ बोलला खोटे
कंठाने भरल्या कशी म्हणावी गाणी
हसतानाही डोळ्यांतुन झरते पाणी
सोहळ्यातुन हा क्षण नाहीसा व्हावा
'आहे अवधी' हा भासचि फक्त उरावा
आता जाशील तू लांब निमिषार्धात
मी तुटले सांधत असेन हलवित हात
-- अमेय
💬 प्रतिसाद
(2)
ज
जेपी
गुरुवार, 11/14/2013 - 18:26
नवीन
***
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 18:27
नवीन
व्वाहव्वा..अमेयराव...मस्त! __/\__
- Log in or register to post comments