Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उगवलास तू भास्करा

व — वडापाव, Fri, 11/15/2013 - 16:09
पहाटे डोळे खुलले पाहतो जग हे निजले पान निद्रेत गळले पर्ण दवबिंदूंनी भिजले उमलत्या कळ्यांचा मुजरा उमेदीचा नवा चेहरा उजळवितो चराचरा उगवलास तू भास्करा का असा बसलास पाहात? कसा गेलास सोडून साथ? कुठे होतास अवघी रात? का सोडलंस मला नरकात? काल भाच्याने तोंड काळं केलं काळोखात अमावास्येच्या नेलं किती हे मन विषण्ण केलं कुठेतरी भरकटत गेलं पडझड होते जाता तू पण आलायस परत आता तू पृथ्वीचा थोरला भ्राता तू प्रकाशाचा खरा दाता तू दिपेंद्रा कशी रे तुझी लहर दिवस येतोय जरा डोईवर दिसशी तू होताना प्रखर दिनकरा क्रोध हा आवर ममता तुझी जादूयी खरी मावळतीच्या सुखद सरी माया करुनी ही मजवरी माझ्यासमोर गेलास घरी

प्रतिक्रिया द्या
684 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा