Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बरं झालं मी नोकरी करतो

च — चाणक्य, Sun, 11/17/2013 - 13:13
बरं झालं मी नोकरी करतो नाहीतर, लोक म्हणाले असतेच की कविता करून काय पोट भरतं का किंवा हसले असते काहीजण कुचेष्टेने मला... मग मी ही दाढी वगैरे वाढवून कवितेने पोट भरायच्या मागे लागलो असतो धडपडत राहीलो असतो नसलेलं काहीतरी सिद्ध करून दाखवायला आणि भेटत राहीलो असतो जगाला एक तकलादू स्वाभिमान खिशात घेवून माझ्या शबनम मधून काढून काढून आल्या गेल्याला दाखवला असता मी माझ्यातला एक 'उपेक्षित कलाकार'.... अगदी मला टाळेपर्यंत ऐकवल्या असत्या लोकांना मी माझ्या कविता आणि गझला आयताकृती घडी केलेला कुठलातरी साप्ताहिक किंवा दिवाळी अंक बनला असता मग माझ्या कवी असण्याचा पुरावा.... पण आज? आज कसंय ना, की माझी नोकरी हाच पुरावा आहे जणू मला लिहिता वगैरे येतं याचा मी लिहिलेलं कुठे काही छापून यायलाच हवं असं काही नाही शिवाय, काहीतरी कमवत असल्यामुळे एक चांगली सोय झालीये; 'कामाच्या रगाड्यात लिहायला वेळ मिळत नाही' असं मी म्हणू शकतो सतत दांभिकपणे .........'ताठ' मानेने आणि ऐकणारेही म्हणू शकतात 'खरंय रे, तुझी लाईन चुकलीच' बरं झालं मी नोकरी करतो.... - चाणक्य १७/११/२०१३

प्रतिक्रिया द्या
3550 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ज
जेपी Sun, 11/17/2013 - 13:19 नवीन
आवडल
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 11/17/2013 - 13:21 नवीन
अरेरे, एका महाकवीला जग मुकले. तेरी दो टकियाकी नोकरी...
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 11/17/2013 - 13:22 नवीन
__/\__!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 11/17/2013 - 13:39 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/17/2013 - 13:51 नवीन
एकदा एकजण, प्रातःर्विधीची तक्रार घेऊ, डॉक्टरांकडे जातो. 'डॉक्टर, सक्काळी सक्काळी अर्धा अर्धा तास बसतो पण कांही होत नाही.' त्याला कांही गोळ्या देत डॉक्टर म्हणतो,' काळजी करू नका. ह्या गोळ्या घ्या उद्या होईल.' दुसर्‍या दिवशी तो परत येतो. डॉक्टरांच्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देत म्हणतो, 'नाही, आजही नाही झाली.' डॉक्टर डोस वाढवून देतो. 'ह्या गोळ्या घ्या ह्या जास्त स्ट्राँग आहेत. ह्याने नक्की होईल.' पुन्हा दूसर्‍या दिवशी तेच. 'नाही, डॉक्टर नाही झाली.' तिसर्‍या दिवशी डॉक्टर औषध बदलून देतो. म्हणतो, 'ह्या सगळ्यात स्ट्राँग गोळ्या आहेत ह्याने व्हायलाच पाहिजे.' पण पुन्हा तो पेशंट जेंव्हा निराश मनाने येतो आणि म्हणतो, 'नाही. डॉक्टर ह्या गोळ्यांचाही कांही उपयोग झाला नाही.' तेंव्हा मात्र डॉक्टरही चक्राऊन जातो. सहज बोलता बोलता डॉक्टर विचारतो. 'तुमचा व्यवसाय काय आहे?' तो म्हणतो, 'मी कवी आहे. कविता करतो.' डॉक्टर शांतपणे खिशातून आपले पाकिट काढून त्याला २०० रुपये काढून देतो आणि सांगतो, 'समोर एक चांगली खाणावळ आहे. तिथे जाऊन पोटभर जेऊन घ्या. जा काळजी करू नका, होईल उद्या.'
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 11/20/2013 - 21:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मारवा Sun, 11/17/2013 - 14:39 नवीन
मनाला भिडली !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 11/17/2013 - 18:16 नवीन
अगदी मनातून उतरलेत शब्द.....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/17/2013 - 18:39 नवीन
बहोत खूब! Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 11/18/2013 - 01:12 नवीन
हं!
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Mon, 11/18/2013 - 01:46 नवीन
मस्त लिहीलीय...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/18/2013 - 02:39 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Mon, 11/18/2013 - 14:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Mon, 11/18/2013 - 14:27 नवीन
भारी !!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 11/20/2013 - 21:06 नवीन
कवितेतल्या भावनांशी सहमत .. आवड्ली कविता :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 11/21/2013 - 07:39 नवीन
वा! छानच! टोकदार भाष्य.. अगदी आवडले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा