Welcome to misalpav.com
लेखक: सूड | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हम्म्....माझ्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं असतस तर असं झालं नसतं. आता पुन्हा ते स्थळ आलं तर जा की बघायला, मुलगी तर बघून ये. ;) बरेचदा अशी लग्नं जमतात बरं का, आमचा अनुभव आहे.:)

कोणीही नोंदवू शकतात. ;) आता काये अजूनपर्यंत एकानंही नोंदवलेलं नाहीये ती गोष्ट वेगळी. झायरात तरी किती करायची म्हणते मी! अवांतर: माझे ववसूमं खरेखुरे नाही हो. ही सगळी चेष्टा चाललीये.

>>>ही सगळी चेष्टा चाललीये. काय सांगता? डॅम इट! आता आमच्या १...२...३...४....५...६...७.५, ८.१५, १०, ११.०५, १२ मिपाकर मुलं (हो मोजलीत मी) नि १...२...३...४...५ मुलींची (ह्यात २ ड्यु आयडी पण) लग्नं रखडली की! -प्यारेश कोठारे

तो एक वेगळाच विषय आहे. ;) समाजात आंतरजालावर असलेल्या मुली, त्यात वाचनाची आवड असलेल्या मुली, त्यात मिपावर येणार्‍या मुली असं ते व्यस्त होत जातंय. मुलांनो धीर सोडू नये. मिलेगा. सबको मिलेगा! जल्द या देरी से ही सही... -प्यारेबाबा

@बबडी रॉक्>>> =)) बालिका आणी पिशी अबोली चे परस्पर प्रतिसाद पाहून हम पांच मधल्या त्या स्विटी आणी तिला गुरुमैय्या हाक मारणार्‍या खोड-गोळीची अठवण झाली! =))

चला. आणखी एक सदस्य लायनीत आला. हार्दिक शुभेच्छा! टीपः लग्नानंतर बायकोबरोबर एखादं स्थळ 'डिस्कस' कर. 'मजा' येईल बघ. :) बाकी चेपु चेपु खेळताना (कदाचित ऑर्कुट असेल. आम्ही जुन्या काळातले) साधारण आगेमागे सगळ्यांचे ग्रॅजुएशनचे, मग नोकरी मिळाल्याचे/ बाहेर ट्रीप कुठं तरी, घर/गाडी मग हळूच एंगेजमेंटचे, मग लग्न (घर/लग्न थोडं मागे पुढे अस्तं) त्यानंतर दोन एक वर्षात 'मी आणि माझा' असं टप्प्याटप्प्यात सुरु असतं... चार सहा महिन्याच्या फरकानं हे सगळ्यांचं सुरु असतं.

हं! अस सगळीकडे चाचपत सुटायच, इकडचा होकार आला तर तिकडच्याला नकार, तिकडचा नकार आला तर इकडच्याला होकार! तोवर आणी दोन ठिकाणी गळ टाकलेलेच!! सगळ्याची तयारी ठेवा! तरीही त्याने घेतलेला निर्णय आवडला. शेवटच अन महत्वाच...या गाठी देवाने बांधलेल्या असतात, जी असेल ती येइलच आयुष्यात. (रेवाक्काकडे नाव नोंदवा. झटकन काम, अत्यल्प दाम!)

कथानायकाने थोडे हलके घेतले असते तरी चालले असते. या ठिकाणी स्थळ अगदी ओळखीतुन आले होते हा प्लसपाॅइंट होता. अगदी खात्री असल्याशिवाय कुणी सुचवणार नाही. काही चुकले तर जन्मभर दोन्हीकडुन शिव्या. आणि नकार द्यायचाच होता तर प्रेमाने देता आला असता. मामी तोवर नीट वागत आल्या होत्या ना. कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे ??? ;-)

>>>कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे ??? पूर्ण वाक्य 'मी करतो तसं' कथानायकाने पुढील वेळेस फोन आणि सुत्रे वडीलधार्यांकडे दिले तर कसे- असं आहे का रे विमे? ;)

अरेरे मुलीने दिलेला नकार लवकर पचत नै मुलाना , पण एव्ढं चिडण्यासारखं त्यात काहिच नव्हतं ... प्रत्येक व्यक्तिचे विचार वेगळे , प्रत्येकाने आपल्यासारखच वागावं असा अट्टहास नसावा . मांडलय बाकि छान .

अरेरे मुलीने दिलेला नकार लवकर पचत नै मुलाना ,
पूजा ? येथे मुलीने किंवा मुलाने नकार दिलाय का? मुद्दा समजलेला दिसत नाही आहे. आअल्या बहिणीच्या मुलीच लग्न ठरवताना; नवर्‍याच्या बहिणीचा मुलगा एक बाहुलं म्हणुन वापरण्याचा प्रकार झालाय येथे. असली मन दुखावणारी 'राजकारणं' बायकाच जाणे. :( वर आणी आपण जे काही करतो आहोत ते घरच्या कुणाला कळु नये अशी काळजी घेतली जातेय मुलाला घरात कोणाला सांगु नको अस सांगुन. लग्नाच वय झालेल्या मुला मुलींना बाजारात भाज्या पसंत नापसंत कराव्या इतक्या सहजतेने हाताळल जातय, हा मुद्दा आहे. जरा पुढे जाउन बघु नाहीतर हा/ही ठिक आहे. त्यात आणी आईबाप जरा मुलांचा विचार करतात पण हे असले बातेवाईक (हो ना नाही बा च) अथवा मध्यस्थ कधीकधी फार नुकसान अन नको तो कडवटपणा निर्माण करुन जातात.

हॅ हॅ चला ओपनिंग म्याच तरी धडक्यात सुरु झाली क्रमशः राहिलंय का? पुढील भागाच्या प्रतीक्षेत ;)

टेंशन न‍ई लेने का रे बाबा, ऐसाइच होता हय. जबतक शादी नहि होता तबतक ऐसे बहोत अनुभव मिलेंगे तुझको. माझ्या एका मित्राच्या लग्नाचे जमवताना तोंडावर पडलो होतो तो प्रसंग आठवला. मुलगा मुलगी दोघांनी सगळ्यां समोर होकार दिला, त्यानंतर दोन बैठका झाल्या. साखरपुड्याच्या तारखा काढून मुलीच्या घरी गेलो त्यावेळी, मला एकट्याला बाजूला घेउन, तिच्या वडिलांनी सांगीतले, मुलीला अजून शिकायचे आहे, सध्या तिचा लग्नाचा विचार नाही. जोडा मारल्या सारखे थोबाड घेउन मित्राच्या घरी गेलो. मित्राला, त्याच्या घरच्यांना कोणत्या तोंडाने सांगायचे हा मोठा प्रश्र्ण माझ्या पुढे होता. आता तो मित्र दोन मुलांचा बाप आहे, त्याचे व्यवस्थीत चालले आहे. त्याच्याशी माझे अजूनही चांगले संमंध आहेत. त्या मुलीची शैक्षणीक पात्रता वाढल्याचे ऐकीवात नाही, पण नंतर तिचेही सुस्थळी लग्न झाले.

चालायचेच रे सूड. असले अनुभव आल्याशिवाय लग्नाला मजा येत नाही. मग हे असले अनुभव बायकोबरोबर रंगवुन रंगवुन डिस्कस करायचे असतात. मजा येते. ;) बाकी खरे सांगायचे तर तु एक खुप चांगला चांस घालवलास. तुझ्या मनाला जर एवढे लागले होते तर नकार देताना मुलगी नाही पसंत पडली असे सांगायला पाहिजे होतेस. जिथे फुले वेचली तिथे गवर्‍या वेचायला लागल्यागत अवस्था झाली असती त्यांची

माझ्या बाबतीत थोड्या फरकाने असेच झाले होते. दोघांच्या पत्रिका जुळल्या, बघण्याचा कार्यक्रम आटोपला. दोघांची पसन्ति. मधी माघ का कुठला महिना आला, मुलीकडचे म्हणले महिना संपला कि पुढचे ठरवू. महिना संपल्यावर दोन वेळा फोन करून माझ्याबद्दल सगळे परत विचारून घेतले, आणि दोनतीन दिवसांनी फोन केला तर म्हणे मुलागीची नोकरी पुण्यात सगळे मित्र पुण्यात, त्यमुळे पुणे सोडून जायला मुलगी तयार नाही. आता काय बोलणार,काही बोलू शकलो नाही, जावू दे म्हणून पुढचे स्थळ नक्की करून टाकले. हाय काय आन नाय काय

शैलेन्द्र ना +११११ बाकी हसायला येतं खरं पण हा अत्यंत गंभीर विषय व्हायला लागलाय. मुलीचे आईवडील मुलीला ठामपणं सांगू शकत नाहीत किंबहुना मुलीच्या पगारावर बर्‍याच गोष्टी अवलंबून झाल्यानं तिला दुखावणं देखील पटेनासं सॉरी झेपेनासं झालं असावं. त्यापुढची गोष्ट म्हणजे मुलीच्या संसाराला मदत ह्या नावाखाली, मुलीच्या मुलांना सांभाळणं ही गरज म्हणून काहीही कारणानं मुलगी माहेरी, माहेरच्या परिघात, पर्यायानं जावई सुद्धा तिथेच असं चित्र दिसायला लागलंय. कदाचित दलित दलितेतर सारखा हा ही काळाने उगवलेला सूड असावा. (कालचक्र उलटं) 'मुलाचे' आईवडील दोघे(च)एकमेकांना समजावताना दिसतात. :(

खरंय. परिस्थिती अगदी १८० अंशांतून बदलतेय. मुलाच्या आईवडिलांना हातावर हात धरून किंवा हात चोळत बसण्यापलीकडे कामच उरलेलं नाही. आपल्याची ती मदत आणि 'दुसर्‍याचा' तो इंटरफिअरन्स असं झालंय खरं. सूर्याचे की कोणाचे ध्रुव बदलत असल्याचा परिणाम असावा.

त्यापुढची गोष्ट म्हणजे मुलीच्या संसाराला मदत ह्या नावाखाली, मुलीच्या मुलांना सांभाळणं ही गरज म्हणून काहीही कारणानं मुलगी माहेरी, माहेरच्या परिघात, पर्यायानं जावई सुद्धा तिथेच असं चित्र दिसायला लागलंय.
हरकत काय आहे नक्की? हेच मुलगा माहेरच्या परिघात आणि मुलगी सासरच्या असं असेल तर वरचा मुद्दा आला असता का मनात?

पारडं झुकायलाच हवं का कुठल्यातरी 'एकाच' बाजूनं? तारतम्य आवश्यक आहे एवढंच. मुलीच्या आईवडलांचं 'प्रेमानं' होतं नि मुलाच्या आईवडलांचं 'कर्तव्य' म्हणून. एकाच घरातली ही दोन चित्रं आहेत. बाकी हा सनातन विषय आहे. लग्नापूर्वीच सूडच्या 'बाल'मनावर वाईट परिणाम नको. ;)

झुकायला नको असलं तरी ते झुकतच.. अनेक वर्ष ते मुलाच्याच आई वडीलांच्या बाजुने झुकायच.. आणि त्या बद्दल चर्चा झालेली पाहीली नाही. पण आज काल मुलीच्या बाजुने झुकायला लागलय तर लगेच "काय होणार आता ह्या जगाचं" टाईप चर्चा कशाला? बाकी मुलीच्या मुलांना सांभाळुन कंटाळलेले आजी आजोबाही पाहिले आहेत..आणि "आमचा नातु तुमच्या घरात नाही रमत" हे मुला कडच्या आजी आजोबांनी नातवाच्या आजोळी गेल्यावर मुलीकडच्या आजी आजोबांना ऐकवलेलंही ऐकलं आहे. त्यामुळे एक प्रेमानी आणि एक कर्तव्य म्हणुन असच असेल असं काही नाही.त्यालाही परत अनेक बाजु असतात. बाकी विषय सनातन आहे हे मान्य.. आणि त्यावर आता इथे चर्चा नको हे ही मान्य.. !

>>>अनेक वर्ष ते मुलाच्याच आई वडीलांच्या बाजुने झुकायच.. आणि त्या बद्दल चर्चा झालेली पाहीली नाही. पण आज काल मुलीच्या बाजुने झुकायला लागलय तर लगेच "काय होणार आता ह्या जगाचं" टाईप चर्चा कशाला? आता हे विषय निघण्याचं कारणः मुलीने मु लाकडं लग्नानंतर राहायला जाणं ही समाजमान्य रुढी होती हे वास्तव आहे. पूर्वीच्या अनेक (४-५-६) मुलं असण्याच्या काळात 'आईवडील कुणाकडं' हा विषय येण्याचा संबंध नव्हता. एकानं नाही सांभाळलं दुसरा सांभाळेल हे होतं. मुलीच्या आईवडलांना नि मुलीच्या आईवडीलांनाही असा विचार करण्याची गरज नव्हती. एकानं येणंजाणं टाकलं तरी खुपण्याइतकं मॅग्निफायिंग नव्हतं. आता काय झालंय? एक मुलगा एक मुलगी डोक्यावरुन पाणी. ऑप्शन आहेत का शिल्लक? दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या संधींमुळे स्त्रियांचं विस्तारलेलं क्षेत्र. पूर्वी हा प्रकार सरासरीत मुळातच फार कमी होता. तेव्हा झकत, चरफडत, प्रेमानं घरातली सून नवर्‍याचं ऐकायची, कमावत नसल्यानं तिच्या आईवडीलांना सुद्धा भारच होती. असे बरेच पैलू आहेत. असो. बाकी एकूणात पोरं बैलच हो! एक तर आई(वडीलांचा)चा नाहीतर बायकोचा. ;)

बर मग नक्की म्हणयचय काय? मुलीने तिच्या आई वडीलांच्या जवळ रहाणे, त्यांनी मुली कडे येणे- जाणे- रहाणे वाढले आहे, हे चांगले की वाईट?
आता काय झालंय? एक मुलगा एक मुलगी डोक्यावरुन पाणी. ऑप्शन आहेत का शिल्लक?
तेच ना मग? मुलीच्या आई वडीलांनाही ऑप्शन्स नाहीत ना? मग मुलाचे आई वडील ह्यांचा अगदी घरातल्या निर्णयांमध्ये सुद्धा प्रभाव असणे योग्य आणि मुलीच्या आई वडीलांनी मात्र तसे केले तर ते अयोग्य का? माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे परिस्थिती वर अवलंबुन आहेत. त्यात मुलगा मुलगी असा भेद नको...

माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे परिस्थिती वर अवलंबुन असावेत. मात्र माझा मुद्दा एवढाच आहे की आई वडीलांनी (कुणाच्याही) मुलांच्या संसारात कितपत लक्ष घालावे, किती जवळ राहवे वगैरे मुद्दे व्यक्तिंवर अवलंबुन आहेत. हिअर आय कन्क्लुड माय लॉर्ड! ए बास आता. :) सूडच्या धाग्याचं शतक का आपणच करायचं का काय? पार्टी घेणारे बाकीचे नि कष्ट आपण? ये ना चॉलबे

तिच्या आई वडीलांच्या जवळ रहाणे, त्यांनी मुली कडे येणे- जाणे- रहाणे वाढले आहे, हे चांगले की वाईट? नि:संशय चांगले. पण समस्त विवाहित पुरुषवर्ग नाकारुच शकत नाही की बायकोने माहेरी जाणे हे सोने पे सुहागा असतय. केवळ या एकाच कारणास्तव तरी किमान बायकोचे माहेर घरापासुन किमान २५० किमी दूर असावे. नेण्याआणण्यासाठी नवरा पेस्शल ट्याक्सी करेल वाटल्यास ;)

आहो मित्र मैत्रिणी असे लिहायचे होते … प्रकाशित करा वर टिचकी मारली आणि पहिला विचार हाच आला की कोणीतरी नक्कीच एव्हढाच भाग अधोरेखित… आम्हाला कुण्या दुसर्याकडून अपेक्षा होती……… जावूदे ………;-)

किस्सा रंजक वाटला. सविस्तर नंतर लिहितो.(शिंचं नेट दिवसबह्रात उणं पुरं अर्धा एक तासच मिळतं.)

रोचक! आजकाल असे अनुभव शक्य आहेत. आणि अजून एक, मुली जे दाखवण्यासाठी फोटो काढतात, त्या फोटोंवरूनतर अजिबात काही अंदाज बांधू नका, निराशा होण्याची शक्यता असते.

अगदी सहमत... नुकताच मित्राबरोबर एका पहाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आम्ही बिचारे मुलगी बाहेर आल्यावरसुद्धा मिनीटभर "फोटोमधली मुलगी अजून यायची आहे" अशी समजूत घालून घेत होतो. :)

मला वाट्त या झालेल्या प्रकारात मुलीचा काही दोष नव्हता, मेल डायरेक्ट डीलीट न करता किमान मुलीचा फोटो तरी पाहुन घ्यायचा न जाणो क्लिक झाली असती तर ;)

तोटा तरी झाला नसता ना काही....हाय काय अन् नाय काय. *LOL* ईमेल होता समोर तर पहायला हवा होता ब्वा!

अग पुजा बै नसती झाली "च्लिक" तर सांगता आले असते "यंदा कर्तव्य नाही " तसेही लग्नाळु मुला-मुलींनी अन त्यांच्या पालकांनी बरीच "विविध "कारणे शोधुन ठेवलेली असतात ;)