Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गूज

अ — अमेय६३७७, Mon, 11/25/2013 - 03:17
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय

प्रतिक्रिया द्या
4059 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
स्पंदना Tue, 11/26/2013 - 04:33 नवीन
बोरकरांची आठवण का येतेय?
  • Log in or register to post comments
न
निवांत पोपट गुरुवार, 11/28/2013 - 10:36 नवीन
<<बोरकरांची आठवण का येतेय?>> ....की मर्ढेकर ? कवितेची बांधणी मर्ढेकरांची आठवण करून देणारी आहे.. :) कविता आवडली अमेयदा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ज
जेनी... Tue, 11/26/2013 - 04:54 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/26/2013 - 19:18 नवीन
तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे या ओळी खूप आवडल्यात! पु.ले.शु. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/27/2013 - 03:18 नवीन
गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई स्सही रे स्सही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 11/27/2013 - 06:45 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/27/2013 - 07:01 नवीन
कसं जमतं राव अस लिहायला. आवडली कविता
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 11/27/2013 - 07:02 नवीन
आवडेश्स
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/27/2013 - 07:02 नवीन
कविता मस्तच आहे. आवडली आणि भावलीही.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/27/2013 - 07:17 नवीन
उत्तम !!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/27/2013 - 21:59 नवीन
>>>शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! मस्तच! नेमक्या शब्दात भावना पोचवण्याचं सामर्थ्य लाभलेल्या मोजक्या कवितांपैकी एक. मिका नंतर एक समर्थ कवी मिसळपावला लाभलेला आहे. बहोत खूब!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/28/2013 - 06:24 नवीन
सुंदर कविता, अर्थ छान आणि वृत्तात बांधूनही कारागिरी वाटत नाही हे अजूनच छान!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/28/2013 - 10:16 नवीन
कूल!!!! आवडलीय राव.. जाम आवडलीय... आहा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा