Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खळबळ

अ — अज्ञातकुल, Tue, 11/26/2013 - 05:04
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील......... मळभ खळे ना श्वास दाटले मेघांनी,…. खळबळले, ढवळल्या कथा पुनवेस उसवल्या लाटांनी अंदाज कसे चुकले बावरले ऋतू कोंडल्या वाऱ्यांनी आभाळ कडे कोसळले कढ झेलले पोरक्या हातांनी कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, … मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी थरथरले नभ सहवास नि माया मूढ जाहली काया धावले जीव परतले रिते भिजवीत चंदनी छाया …………………… अज्ञात

प्रतिक्रिया द्या
3023 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 11/27/2013 - 06:16 नवीन
आदरांजली!!
कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, … मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी
शेवटी हेच खरं!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Wed, 11/27/2013 - 07:21 नवीन
आदराजली !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/27/2013 - 07:56 नवीन
आदरांजली!! तुम्ही खरोखर भाग्यवान आहात आणि तुमचे वडिल सुध्दा
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/27/2013 - 21:55 नवीन
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि.... श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/28/2013 - 10:05 नवीन
_/\_..............
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/28/2013 - 10:23 नवीन
अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. ह्या सर्वातून एकेकाळी गेलो आहे. तुमची भावना, विशेषतः आयुष्यात अचानक निर्माण होणारी पोकळी अनुभवली आहे. आज गेली १७ वर्ष मनांत गाडलेली ,पितृछत्र हरपल्याची, भावना तुमच्या हळूवार शब्दांनी पुन्हा चाळवली गेली. ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 11/28/2013 - 10:34 नवीन
ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 11/28/2013 - 14:00 नवीन
आदरांजली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/28/2013 - 14:01 नवीन
अज्ञातकुल, तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. वडिलांचे छत्र हरपण्याचे दु:ख काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे :(
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला गुरुवार, 11/28/2013 - 15:17 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा