Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मडकी

स — सोनल कर्णिक वायकुळ, Wed, 11/27/2013 - 13:27
आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर काही घडली,काही मोडली दोन हात तिम्बत राहिले त्यांना मनाजोगता आकार येईपर्यंत भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते 'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं… वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.' ऐकता ऐकता शोधत राहिली आपल आभाळ आपल्याच आतल्या अंध-या पोकळीत पुन्हा पुन्हा 'एक दिवस फुटून जेव्हा माती होऊ तेव्हाच भेटेल जमीन आणि आभाळ देखील' अस म्हणत मांडत राहिली स्वतःला दुकानात पुन्हा पुन्हा

प्रतिक्रिया द्या
2334 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
कवितानागेश Wed, 11/27/2013 - 13:45 नवीन
आशयगर्भ. अतिशय आवडली रचना.
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Wed, 11/27/2013 - 14:01 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 11/27/2013 - 14:04 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Wed, 11/27/2013 - 14:30 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/27/2013 - 14:39 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 11/27/2013 - 14:40 नवीन
पुकशु (पुढील कवितेला...)
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Wed, 11/27/2013 - 14:41 नवीन
खुप छान रचना.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 11/27/2013 - 14:47 नवीन
****
  • Log in or register to post comments
र
राही Wed, 11/27/2013 - 18:53 नवीन
कविता अतिशय आवडली. वेगळी वाटली. मडक्यांचे रूपक छान जमले आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा