ऐक सखे
कशाला उसासे हवे आर्जवांचे
नवी वागण्याची तर्हा ही कशी
उगा श्वास श्वासांस जाळीत येतो
फिरे जो तुझा हात देहानिशी
तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या
मनासारखे चांदणे शिंपुदे
रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे
जरासे निखारे विखारास दे
प्रिये खेळ आहे खरा संयमाचा
कसे आवरावे कळेना तुला
अगे मंद चालीतली रागदारी
असे ही नव्हे हा स्वरांचा झुला
जसे मोगर्याने फुलावे सुखाने
तसे वाढवूया निशेला सखी
हळू माधुरीचे भरू देत प्याले
उधाणास येऊ नको सारखी
-- अमेय
💬 प्रतिसाद
(17)
ज
जेनी...
गुरुवार, 11/28/2013 - 17:58
नवीन
:)
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 11/28/2013 - 18:00
नवीन
लाजलेली स्मायली कुणाकडे असेल तर द्याना ...:)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/28/2013 - 18:49
नवीन
लयीचं सुरेख भान आणि समर्पक शब्द योजना आहे. अनुभवानं अजून आषयघन करता येईल.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 11/28/2013 - 19:41
नवीन
नक्की कोणत्या अनुभवाने आशय सघन होईल?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/28/2013 - 20:29
नवीन
तरलता आशय सघन करत नेते. मग कविता मिस्टीकल होते.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 11/28/2013 - 19:41
नवीन
सुंदर रचना, आवडली.. :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 11/28/2013 - 20:32
नवीन
आहा
सुरेख
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 11/29/2013 - 10:37
नवीन
__/\__!!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 11/29/2013 - 10:43
नवीन
मस्त प्रणयकविता!
बाकी हा प्रियकर 'एवढा समजूतदार' कसा काय ब्वा? ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/29/2013 - 12:38
नवीन
छान !! पण तुमच्या करुण रसाच्या कविता वाचताना जसं आपसूकच 'वाह !!' येतं तसं नाही वाटलं.
बाकी करुण असो वा शृंगारीक, लयबद्धता वाखाणण्यासारखी आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 11/29/2013 - 15:32
नवीन
काय लिवलय...काय लिवलय...! वाक्या..वाक्याला मनातूनच सलाम ग्येला ना राव! ___/\___
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 12/01/2013 - 10:33
नवीन
सुंदर लिहिलंय!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 12/01/2013 - 10:44
नवीन
सुंदर !!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 12/01/2013 - 11:18
नवीन
पुन्हा एकदा वाचली! :)
जसे मोगर्याने फुलावे सुखाने
तसे वाढवूया निशेला सखी
हळू माधुरीचे भरू देत प्याले
उधाणास येऊ नको सारखी >>> सलाम हाय राव सलाम! __/\__
- Log in or register to post comments
र
राघव
Sun, 12/01/2013 - 15:45
नवीन
छान लिहिलंय! :)
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 01/15/2018 - 09:26
नवीन
वाह... सुंदर !
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Tue, 01/16/2018 - 02:01
नवीन
क्या बात!
- Log in or register to post comments