वसा संस्कृतीचा
वसा संस्कृतीचा
ऋण सावकारीच फेडण्या
कुणब्याला दुष्काळाचा शाप
रात्रंदिन कष्ट करायचा
नाही थांबला कधी बाप
उठून पहाटे रोज माय
सारवते दुःखाच्या भिंती
सोसत चटके दारिद्र्याचे
दिस रोज मावळती
राणी डुलणाऱ्या पिकामंधी
दिसू लागे साखर गोड
जल्म गेला मातीत अवघा
तळहाताला आले किती फोड
गाई गुरांच्या हंबरात
वाढे संसार शेणामातीचा
सुख नांदावे घरीदारी
वसा जपतो संस्कृतीचा
थकलेला चार घास खाऊन
जाई तृप्त होऊन वाटसरू
जिच्यावर जगतो आम्ही त्या
काळ्या आईला कसं विसरू
संतोष बोंगाळे
💬 प्रतिसाद
(5)
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 11/30/2013 - 15:49
नवीन
@राणी डुलणाऱ्या पिकामंधी
दिसू लागे साखर गोड
जल्म गेला मातीत अवघा
तळहाताला आले किती फोड>>> __/\__
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/30/2013 - 15:53
नवीन
कवितेतील आशय भावला....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 12/01/2013 - 06:46
नवीन
कवितेचं शीर्षक पाहून बराच वेळ उघडली नव्हती, पण चांगली रचना आहे!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 12/01/2013 - 23:25
नवीन
सच्ची भावना जाणवतेय कवितेतून.
छान रचना.
- Log in or register to post comments
P
psajid
Tue, 12/03/2013 - 10:39
नवीन
जिच्यावर जगतो आम्ही त्या
काळ्या आईला कसं विसरू
ही काळ्या आई विषयीची कृतज्ञता मनास भावली
- Log in or register to post comments