जगणं
महाग जगणं
कलंकी पदवी,
बंबाळ चिरंजीव
अश्वथामा !!!!
मिळतात गळा
घालून माळा,
कापतात नरडी
माघारी !!!!
नेसतात सोवळे
घालतात डाका,
डोमकावळे
रातंदिन !!!!
भेटते यश
नाहीत पैसं,
उघडी मांडी
टीचभर !!!!
महाग मरण
नाही सरण,
गटारी भरल्या
मूडद्यान्ही !!!!
श्री. साजीद यासीन पठाण
💬 प्रतिसाद
(1)
व
वैभवकुमारन
Tue, 12/03/2013 - 08:58
नवीन
छान
- Log in or register to post comments