Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अतृप्ती-एक चिरंतना

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 12/04/2013 - 20:53
अतृप्त असावे सारे मन तृप्तीतूनच पाही तृप्ती'ही असते क्षणिका अतृप्ती चिरंतना'ही मानवास जन्मी एका नीज सांगे ति ही काही मन क्षणात चाखे तिजला अन् क्षणात काही नाही सारा हा जन्म तरिही का धावे तिच्याच पाठी मरणाही भेटी येता अतृप्ती उरते गाठी ऐश्या या अतृप्ती'ला मी देतो एक सलाम मन तृप्तीचे ना वैरी अतृप्तीचे न गुलाम ==०==०==०==० ************* अत्रुप्त ************* https://lh5.googleusercontent.com/-jahNQ2N2XGE/TqQt3Ev4zAI/AAAAAAAABD4/l0WHSRpPc8c/s600/PB050640.JPG (फोटो-अं.जा.साभार.)

प्रतिक्रिया द्या
9279 वाचन

💬 प्रतिसाद (29)
अ
अग्निकोल्हा Wed, 12/04/2013 - 22:40 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 12/04/2013 - 23:00 नवीन
खुपच सुरेख आत्मुस.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 12/05/2013 - 00:12 नवीन
(शीर्षक वाचून तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोविषयी लिहिलं आहे की काय असा संशय आला होता ;) ) क्षणिका-चिरंतना हा भेद आवडला. जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत मैहबूबा है अपने साथ लेकर जायेगी या भेदासारखा. मात्र टायटलमुळे किंचित गोंधळलो. उभा जन्म आपण अतृप्तीला संगे घेऊन तृप्तीच्या मागे लागतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात तृप्तीविषयी लिहिलं आहे हे पटकन लक्षात आलं नाही. शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/05/2013 - 00:48 नवीन
@ शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.>>> @मन तृप्तीचे ना वैरी अतृप्तीचे न गुलाम >>> आहे त्या स्थितीचा,आहे तसा स्वीकार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चौकटराजा गुरुवार, 12/05/2013 - 01:38 नवीन
बुवा, एक सो एक कविता ! मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ? स्मायलीवाले बाबाकी जय हो ! काही असो बुवा मेंदूत प्रतिभेचा वास नक्की आहे !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/05/2013 - 06:38 नवीन
@ मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ? >>> =)) गेलो होतो खरा! त्यातल्याच एका पारंबीनी गळा गच्च अवळला आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रचेतस गुरुवार, 12/05/2013 - 06:54 नवीन
कुठली म्हणे ही पारंबी?? बाकी पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/05/2013 - 07:03 नवीन
@पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे>>> Image removed. अवघड आहे रे भगवंता! Image removed. प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/05/2013 - 07:08 नवीन
प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!
अरे हो, खरंच की. कवीला काही कल्पनास्वातंत्र्य असू असते ते मी पामर पार विसरूनच गेलो होतो. म्हणतात ना जे न देखे रवी....ते ते देखे कवी जरी वृक्ष असो पिंपळ, तयास फुटो पारंबी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/05/2013 - 08:25 नवीन
असोच! :p :p :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/05/2013 - 03:52 नवीन
"सारा हा जन्म तरिही का धावे तिच्याच पाठी मरणाही भेटी येता अतृप्ती उरते गाठी" हे जबराच
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/05/2013 - 04:41 नवीन
अप्रतिम. अतिशय सरस कविता रचायलेत बुवा आजकाल.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/05/2013 - 05:13 नवीन
बुवा, आवडली तुमची चिरंतन अतृप्ती.. :)
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 12/05/2013 - 05:27 नवीन
आवडली .
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 12/05/2013 - 07:08 नवीन
चिरंतना.......... आहाहा ! आहा हा! क्य बात ! काय मस्त लिहिलंयत ! वाह! जबरदस्त...
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 12/05/2013 - 09:39 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
य
युगन्धरा@मिसलपाव गुरुवार, 12/05/2013 - 09:51 नवीन
मन तृप्त झाले तुमची कविता वाचुन. खुप आवडली कविता..............
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/08/2013 - 08:19 नवीन
कविता आवडली! (जाता जाता: तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/08/2013 - 18:37 नवीन
@तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे>>> हायला! :D मी गुगलबाबाला, "पणती" असा सर्च दिल्यावर तो फोटू मला मिळालावता! पण आता Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 12/08/2013 - 10:10 नवीन
बुवा, सगळ आहे खर असच. बरोब्बर शब्दात पकडलत.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 12/08/2013 - 14:04 नवीन
ही वाचायचीच राहिली. छान लिहिलय. :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 12/09/2013 - 12:10 नवीन
क्या बात है !
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 12/13/2013 - 17:44 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Fri, 12/13/2013 - 20:25 नवीन
मन तृप्तीचे ना वैरी >>> सुंदर ओळ आहे. संपूर्ण कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 12/15/2017 - 04:39 नवीन
फारच सुंदर!!!
  • Log in or register to post comments
स
सचिन चौगुले Fri, 12/15/2017 - 05:43 नवीन
खरच छान खुप आवडली कविता................
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/15/2017 - 19:43 नवीन
@असंका , सचिन चौगुले ››› धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन चौगुले
ए
एस Sun, 12/17/2017 - 01:54 नवीन
कविता आवडली. मोजक्या शब्दांत बरेच काही सांगून जाणारी. अतृप्ती येते ती अपूर्णतेच्या अथांगतेच्या जाणिवेतून. पूर्णत्व म्हणजे ज्याने-त्याने आपापल्या परीने आपापल्या अपूर्णतेला घेतलेला छेद म्हणता येईल. तो गाठला की तृप्ती मिळाली असे त्या क्षणापुरते भासते. एकूणच तृप्ती-अतृप्तीचा लपंडाव हा चिरंतन आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/17/2017 - 14:58 नवीन
वॉव.... दिल का राज खोल दिया मेरे... थांकू सो मच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा