"यमाची वरात"
"यमाची वरात"
पाहिला मी तयास डोकावुनी दारात
उंब-यापाशी होती यमाची वरात
मंदावली मज बुबुळांची वळणे
भयाची कळ आली हऴव्या उरात
जरी शांतता होती चोहोबाजूंनी
रेड्याचे हंबरने झाले कर्कश सुरात
जाता कटाक्ष माझा देवघराकडे
पणतीचे फडफडणे झाले उगी जोरात
अजुनही उचलला नव्हत माझा देह
त्याची पाऊले फिरत होती घराघरात
आठवूनी आल्या मज मागच्या स्मृती
पुरता वाहून गेलो मी अश्रूंच्या पुरात
जाता शून्य नजर समोरच्या भिंतीकडे
माझाच फोटो मज दिसला हारात
येता समीप समय जाण्याचा तो
यमाचे तांडव झाले मोठ्या भारात
मंदावता आता हृदयाची धडधड
शरीर लुळे पडले एका क्षणात
गिळता कडवट आवंढा शेवटचा तो
माझाच प्राण गेला माझ्या घरात
💬 प्रतिसाद
(11)
ज
जेनी...
गुरुवार, 12/05/2013 - 04:32
नवीन
R.I.P.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/05/2013 - 05:20
नवीन
मग कविता केंव्हा केली?
- Log in or register to post comments
व
वैभवकुमारन
गुरुवार, 12/05/2013 - 09:30
नवीन
जेव्हा प्रान होता मझ्या उरात
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 12/05/2013 - 09:49
नवीन
आणि बाय द वे, रोज "कविता केल्याशिवाय अंघोळ करणार नाही" असं व्रत घेतलायं का?
- Log in or register to post comments
व
वैभवकुमारन
गुरुवार, 12/05/2013 - 10:10
नवीन
संजय क्षीरसागर - तसही चालेल / कसही चालेल....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/05/2013 - 05:26
नवीन
मिपावरच्या बाबुराव यांची वैकुंठ ही कविता आठवून गेली.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 06:36
नवीन
(लिलाध्रा.. ये रे ये.. तुझा मर्मबांधव आहे बघ हा! =)) )
वरात
उरात
सुरात
जोरात
घराघरात
पुरात
हारात
भारात
क्षणात
घरात
.................. इतके एकाच रंगाचे झेंडू घेऊन,आपण सदर काव्य ओवले आहे! =)) तस्मात आंम्हाला त्याचा परत एक "यमकारी हार" ओवावा,अशी "कळ" मघापासून येत आहे! =))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 06:45
नवीन
घरातल्या नातेवैकाचे काय ते प्रेम हो.
अजुन रेड्याचे आगमन नाही तोपर्यंत एक फ़ोटो काढुन फ्रेम करून हार बीर घालून ठेवलाय. वा वा. भलतीच घाइ पोहोचवायाची.
- Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ
गुरुवार, 12/05/2013 - 06:48
नवीन
हाहाहा
मस्त कल्पना. पण असल्या कल्पना जगता तुम्हि ? :ऑ
- Log in or register to post comments
व
वैभवकुमारन
गुरुवार, 12/05/2013 - 10:08
नवीन
व्हय व्ह्य :)
जो जगतो तोच लिहतो
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 10:12
नवीन
काय तयारी आहे वाह!!!
- Log in or register to post comments