"पाऊस येईल"
नको फुलवूस श्वास
नको हताश होऊस
तुझ्या अंगणातही रे
आता पडेल पाऊस
येता बरसून धारा
मेघव्यथेला घेऊन
सहवेदनेची दिठी,
डोळा जाईल भरून
जाणीवाही नवनव्या
उरातून वाहतील
जे ना आकळले कधी
माग त्याचा काढतील
असे जगासाठी जुना
तुझा पहिला असेल
कायामन भिजताना
खूप काही गवसेल
नको आकांत जिवाचा
नको पाण्यामध्ये देव
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
-- अमेय
💬 प्रतिसाद
(22)
व
वडापाव
Fri, 12/06/2013 - 08:41
नवीन
मस्तच!!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 12/06/2013 - 09:03
नवीन
सुरेख.
तुमच्या कविता अतिशय दर्जेदार असतात.
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Fri, 12/06/2013 - 09:20
नवीन
सुन्दर कविता. आवडली.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Fri, 12/06/2013 - 09:53
नवीन
छानच झालीये. सहवेदनेची 'दिठी' म्हणजे काय?
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 12/06/2013 - 10:10
नवीन
=दृष्टी,नजर
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 12/06/2013 - 09:56
नवीन
आहा! फार सुंदर लिहिता तुम्ही. :)
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 12/09/2013 - 19:00
नवीन
ही कविताही खूप सुंदर!
शेवटाची ओळ तर खासच! :)
राघव
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/06/2013 - 09:57
नवीन
मस्तच!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 12/06/2013 - 10:12
नवीन
"फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव"
मस्त आहे
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 12/06/2013 - 10:18
नवीन
छानच!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/06/2013 - 11:07
नवीन
क्या बात!! सुंदर रचना..
दीठी शब्दाचा प्रयोग ग्रेसची आठवण देऊन गेला...
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Fri, 12/06/2013 - 11:42
नवीन
छान!
लयबद्ध नि अर्थपूर्ण रचना.
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Fri, 12/06/2013 - 12:40
नवीन
खुप छान कविता
- Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे
Sat, 12/07/2013 - 15:01
नवीन
पूर्ण कविताच सुरेख. खास करून -
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
- Log in or register to post comments
न
निवांत पोपट
Sat, 12/07/2013 - 20:21
नवीन
फार सुंदर लिहिता हो तुम्ही अमेयदा!
'कालचा पाउस आमच्या गावात आलाच नाही' ह्या कवितेतल्या न आलेल्या पावसाचा रोख बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या ह्या कवितेत आहे.त्या 'न आलेल्या पावसा'मधल्या वेदनेला सामाजिक आशयाची किनार होती. तुमच्या कवितेतल्या पावसामध्ये मात्र फक्त दिलासादायक आशेचा निर्मळ शिडकावा आहे.आवडली.. :)
आता फक्त काही तासांनंतर आपण भेटणार आहोतच.तेंव्हा बोलूच.. :)
- Log in or register to post comments
अ
अमेय६३७७
Sun, 12/08/2013 - 04:36
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 12/08/2013 - 07:43
नवीन
बर्याच दिवसानी एक साधी सरळ सुंदर कविता वाचायला मिळाली
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 12/08/2013 - 09:05
नवीन
मस्त पाऊसकविता!
- Log in or register to post comments
A
Atul Thakur
Mon, 12/09/2013 - 17:28
नवीन
फक्त स्वागतासाठी तू
भुई नांगरून ठेव
क्या बात है अमेयराव :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/09/2013 - 17:45
नवीन
आवडली कविता.
दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 12/13/2013 - 17:31
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 12/13/2013 - 20:46
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments