Welcome to misalpav.com
लेखक: क्लिंटन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त कल्पना -- उत्तम प्रकल्प मला यात सामील व्हायला आवडेल. थोडी माहिती शोधणे आणि एक्सेल झिंदाबाद कामात नक्कीच..

उत्तम प्रकल्प! काय मदत पाहिजे सांग. एक्सेलमधे बरेच दिवसात काम केलं नाहीये. मजा येईल.

आम्ही यथामती चर्चेत सहभागी होऊ.प्रकल्पातून सकस आणि विश्लेषण पूर्ण माहीती मिळणार याची खात्री आहेच.

क्लिंटन दादा, आम्हाला पण तुमच्या या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. तुमच्या साठी एक्सेल मधे वाटेल तेवढे तोडफोडीचे काम करायला अतिशय आनंद होईल इतरही काही हमालीचे काम असले तरी जरुर कळवा. ( नाहितरी हापिसात तुंबड्या लावतच बसलेला असतो )

आपल्या आवडीचा पक्ष निवडून येत नसेल तर आकड्यांच्या जंजाळात आपले दु:ख बुडवायचे, दु:ख विसरायचे. हा का ना का!

आकडेवारी आणि त्यावरील भाष्य हे वाचण्याचा आंनद वेगळाच असेल याबद्दल दुमत नसावे. क्लिंटन यांचा आवाका बघता भूतकाळ आणि भविष्यकाळाचा आढावाही यातून मिळेळ याची मला खात्री वाटते. शुभेच्छा.

माझ्या लहानपणी एक मोठा पक्ष , त्यानंतर जनसंघ त्यानंतर समाजवाद्यांचे खंडीभर पक्ष असे स्वरूप होते. काँग्रस ला पर्यायच नव्हता, त्यात शेषनचा उदय झालेला नव्हता सबब सत्तेसाठी सत्तेचा सरळ सरळ वापर हे त्यांचे सूत्र होते. या मोठ्या राष्ट्रीय पक्षाने अकारण दलित व मुस्लीम अनुनय करून हिंदुत्व नावाची अभद्र संकल्पना राजकारणात आणली. त्याने भाजप मोठा होत गेला. पण राजकारण हे विकासावरच करावे लागते हे त्या पक्षालाही आता कळू लागले आहे. भारतात एक दुसरा अभद्र शब्द म्हणजे सेक्युलर फोर्सेस ! अगदी राजकीय तज्ञ सुद्धा प्रादेशिक पक्षाना सरसकट सेक्युलर म्हणतात. भाजपचा जसा दक्षिंणेत चेहरा नाही तसा तो फारसा कॉग्रेसचा ही नाही. हे सत्य आहे.आंध प्रदेश हाच काय तो त्यांचा आधार आहे. गोवा व कर्नाटक प्रमाणे आंध्रातही भाजप पसरू लागला आहे. पण भाजपला खूप पल्ला गाठायचा आहे.

एक्सेलमधे काहीही काम करायला अतिशय आनंद होईल. नाहीतरी आमच्या बँकेच्या संपूर्ण कार्यालयात एक्सेलमधे असणारे कोणतेही काम जलद आणि अचूक करण्यात आमच्याहून पटाईत कोणी नाही. हाहाहा !!!

सर्वांना धन्यवाद.व्य.नि वर नक्की प्रोसेस आताच कळवली आहे. मध्यंतरी मी स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय आणि निवडणुकविषयक इतिहासावर फेसबुकवर १५ भाग लिहिले होते.त्याचे मराठीत भाषांतर करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते सुध्दा इथे लिहायचा इरादा आहे.तेव्हा जानेवारीपासून मिपावर निवडणुकविषयक वातावरण निर्माण करायचे काम माझे :)