Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवा आणि ती

अ — अमेय६३७७, Wed, 12/11/2013 - 11:45
सजतानाही थिजलेली ती  रोज मनाचे द्वंद्व मनाशी  भिंतीवरती बापुडवाणा  दिवा एकटा जळे स्वतःशी  बोथटलेली जुनी वेदना  जशी काजळी दिसे दिव्याची जळता अवचित विझून जाणे  हीच वंचना जन्मभराची  अशा तमातुन प्रकाश कोठे  कुणी कुणाचा ना कैवारी दिवा जळो वा शील, सुखाचे    मोल सारखे त्या बाजारी  तिजला ठावे दैव स्वतःचे  आयुष्याच्या सरत्या वाती   जोवर आहे तेल वाहते  दाह सोसणे उरले हाती  -- अमेय

प्रतिक्रिया द्या
2754 वाचन

💬 प्रतिसाद (14)
क
कवितानागेश Wed, 12/11/2013 - 12:21 नवीन
नेमक्या शब्दातली अभिव्यक्ती. .... बोचतेय. :(
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Fri, 12/13/2013 - 20:23 नवीन
+१ आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
र
राघव Wed, 12/11/2013 - 15:15 नवीन
खूप सुंदर लेखन. येऊ देत अजून. अवांतरः छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील? तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/12/2013 - 10:14 नवीन
राघवाशी पूर्ण सहमत! @छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील? तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! Smile >>> तंतोतंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सूड Wed, 12/11/2013 - 15:31 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख आणि लयबद्ध!!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 12/12/2013 - 08:05 नवीन
काय छान कविता!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास गुरुवार, 12/12/2013 - 10:22 नवीन
हळवा मूड आणि जगण्याची अपरिहार्यता अचूक व्यक्त करणारे शब्द ....
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/12/2013 - 17:18 नवीन
जबरदस्त! भावना थेट काळजात नेऊन भिडवतो हा माणूस. टोपी काढली आहे.
  • Log in or register to post comments
म
म्हैस Fri, 12/13/2013 - 11:06 नवीन
लीमाउजेट शी संपूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/13/2013 - 11:29 नवीन
अमेयराव , सुंदर कविता लिहित आहात आपण !! अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/13/2013 - 13:08 नवीन
कमी शब्दात कमाल आशय व्यक्त केलायंस!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 12/13/2013 - 17:46 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/13/2013 - 17:56 नवीन
अचूक शब्दात व्यक्त केलेलं दाहक वास्तव!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/13/2013 - 18:17 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा