Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुकुशिमानो तोत्तोचान

न — नगरीनिरंजन, Sun, 12/15/2013 - 05:25
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही काय होणार पुढे तिला विचार करवत नाही गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही ओजिइसान रोजचा वेळ शांतपणे घालवतात ऐंशी वय झालं तरी मजेत सायकल चालवतात तोत्तोचानला आवडतात ते मनापासून जरी न सांगताच थोडं आयुष्य तिचं घेतलंय तरी
tottochan sunflower
शब्दार्थः फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु: फुकुशिमाची तोत्तो गोंडस व सुंदर आहे. ओतोओसान: वडील ओकाआसान: आई ओजिइसान: आजोबा जिसात्सु शिता: आत्महत्या केली.

प्रतिक्रिया द्या
1884 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मुक्त विहारि Sun, 12/15/2013 - 05:27 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 12/15/2013 - 05:56 नवीन
वेगळीच कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/15/2013 - 07:28 नवीन
तोत्तोचान आणून ठेवलंय. अजून वाचलं नाही. त्यामुळे त्यातले संदर्भ असतील ते कळले नाहीत. पण
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू
हे आवडलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा