आलेख
अक्षर अक्षर ओघळताना झुळझुळणारे शब्द कवीता
हृदयाचा आकार मनातील सुप्त सुकोमल भाव कवीता
आशय गर्भित गूढ कथानक विश्लेषक तळ ठाव कवीता
कळणारी न कळणारीही अंतरातली धाव कवीता
कोण कुणाचा कधी न होता होता नव्हता डाव कवीता
आस जनाची कणव जगाची गाभाऱ्यातील घाव कवीता
मेघजळातिल गुदमरलेल्या सहवासाची हाव कवीता
विलय पावलेल्या पर्वातील हळवा क्षणगुंजारव कविता
सखी सोयरी जन्म तारिणी दु:ख हारिणी सरिता कविता
दाहक पावक श्रावक वाहक बखर जन्म जन्मांची कविता
आले गेले मुक्त जाहले मुक्त मौक्तिकांचीही कविता
एकांतातील एकांताचा, द्वैताचा आलेख कवीता
……………………. अज्ञात
💬 प्रतिसाद
(3)
अ
अभ्या..
Mon, 12/16/2013 - 07:29
नवीन
छान हो. सुरेखच.
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Tue, 12/17/2013 - 03:56
नवीन
कवितेच्या देवीची आरती असावी अशी सुरेख कविता. तुमच्या नेहमीच्या कवितांपेक्षा कळायला सहज सोपी. यमकांची लयलूट आणि शब्दझ-यासारखी ओघवती...
- Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल
Tue, 12/17/2013 - 04:50
नवीन
तुमच्या नेहमीच्या कवितांपेक्षा कळायला सहज सोपी. ........... :)
- Log in or register to post comments