Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेखमाला मस्तं आहे. तुमची भाषा छान चुरचुरीत आहे. गुंतवणूक 'मनीची' मस्तं.

एच डी एफ सी लाईफ ची यंग स्टार पॉलीसी इत्क्यात च बन्द केली. रू. २४०००/- नुकसानीत. :-( क्रुपया कुणीही यात पडू नका.

हे फार बेसिक होते आहे असे नाही का वाटत? ब्रोकर काय करतो, डीपी म्हणजे काय? मला वाटते हे बर्‍याच लोकांना चांगले माहीती असते. गेल्या १० वर्षात सर्व च individual investers ऑनलाईन व्यवहार करतात ( जर करत नसतील तर करावे ). ज्ञानव जी - ह्याच्या पेक्षा काहीतरी जास्तीची अपेक्षा आहे. तुम्ही दर आठवड्याला एक पोझिशन का नाही सांगत, त्या मागच्या लॉजिक सकट आणि ती कसे करते आहे ते पण बघु. असे केले तर कळेल.

इथे अपेक्षित नाही. कारण मी स्वतःच म्हंटले आहे की इथे अर्थक्षेत्रातील घडामोडी, माहिती अपेक्षित आहे. तुम्ही म्हणताय की वरील सर्व बर्याच लोकांना माहित आहे पण मला वाटते अजूनही काही जण डीपी मध्ये किती पैसे ठेवावे लागतात किंवा डीपी आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म एकच समजणारे हि आजही आजूबाजूला दिसतात मला. (हा रोजचा अनुभव आहे.) पण एकवेळ ते परवडले काही अर्धवट शहाणे आम्हालाच मूर्ख ठरवतही फिरत असतात हा अनुभव जास्त त्रासदायक असतो. आणि मी एक ट्रेडिंग लोजीक मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत.... इथे मांडले आहेच. इथे बर्याच जणांनी आर्थिक विषयांवर काहीतरी सोप्या भाषेत लिहावे असे अपेक्षित आहे. त्यामुळे मी तांत्रिक विश्लेषण किंवा फंडामेंटलबाबत लिहित नाहीये.

माझ्या ब्लॉग वर मी १ जानेवारी पासून पोझिशन्स द्यायला सुरु करणार आहे.