Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुढच्यासाठी

अ — अमेय६३७७, Wed, 12/18/2013 - 11:46
कुणास ठाउक बाग कुणाची कुणी शिंपली हिरवी झाडे तारुण्याचे मोल, कुणाच्या हाडांची अन झाली काडे हिरवळ दिसते, पानोपानी मंजुळ किलबिल मंद स्वरांची जागोजागी खूण सापडे चराचरातिल अद्वैताची विश्वाचा हा जरी कोपरा कोप-यातले विश्व सुखाचे भय- क्रोधाला इथे न थारा इथे न वाढे तण्य फुकाचे आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे -- अमेय

प्रतिक्रिया द्या
11538 वाचन

💬 प्रतिसाद (37)
प
प्रभाकर पेठकर Wed, 12/18/2013 - 11:48 नवीन
सुंदर..
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 12/19/2013 - 08:31 नवीन
नेहेमीप्रमाणेच लयबद्ध!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/19/2013 - 08:35 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/19/2013 - 09:01 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 12/19/2013 - 09:03 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 12/19/2013 - 10:13 नवीन
सुंदर रचना...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 12/19/2013 - 10:33 नवीन
आहा! फार सुंदर रचना. तुमच्या कविता अगदी लयबद्ध असतात.
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ गुरुवार, 12/19/2013 - 10:40 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/19/2013 - 10:54 नवीन
आहा! एक आक्खा लेख जे काम करु शकत नाही ते काम तुमच्या कविता करत आहेत.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 12/19/2013 - 12:11 नवीन
एक बदल सुचवु काय? >>आपसूक मग सुचेल तुजला>> मग ऐवजी नंतर वापरले तर मीटरमध्ये बसेल. अवांतर--इथे न वाढे तण्य फुकाचे--तण्य असा शब्द कधी ऐकला नव्हता.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/19/2013 - 12:43 नवीन
तण्य हा शब्द विशेषण म्हणुन शिकला होता. (ताणले जाण्याची क्षमता.), पण कविने तो "तन" या अर्थाने वापरलाय, ज्यात काही चूक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
अ
अमेय६३७७ गुरुवार, 12/19/2013 - 17:36 नवीन
वृत्तानुसार 'नंतर' नाही चालायचा. पण लयीत नाही असं का वाटतेय? "आपसूक मग.. सुचेल तुजला" असा पादाकुलकाच्या नेहमीच्या लयीनुसार (८ + ८) वाचनक्रम आहे. तण्य हा शब्द मी माझ्या आजोबांकडून (ज्यांना बागकाम आवडायचे) वारंवार ऐकलाय. चुकीचा असेल अशी शन्का नव्हती. आता तुम्ही काढलेल्या शंकेमुळे शोध घेतो. तण याच अर्थाने वापरलाय. चुकीचा असेल तर बदलेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 12/20/2013 - 12:25 नवीन
अमेयजी ,माझा काही वृत्त मात्रा वगैरेचा फार अभ्यास नाही,सहज वाटले ते सांगितले. अवांतर..नंतर ऐवजी "आणिक" "मागुन" चालेल काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय६३७७
प
पैसा गुरुवार, 12/19/2013 - 14:29 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/19/2013 - 18:45 नवीन
आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही >>> मर्मावर घाव! ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे>>> आहाहा... नतमस्तक! __/\__
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 12/19/2013 - 18:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन गुरुवार, 12/19/2013 - 19:26 नवीन
Farach chan kavita :)
  • Log in or register to post comments
च
चैत्रबन गुरुवार, 12/19/2013 - 19:29 नवीन
farach sundar kavita asa mhanaych hota... :)
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Fri, 12/20/2013 - 03:16 नवीन
फारच साध्या सोप्या .. कळणार्या भाषेत लिहितो ब्वा तु मित्रा .. ऊगाचा शब्दांचा ना रुपकांचा .. कसलाच सौंदर्यफुफाटा (शरदीनी फेम) नाहि .. मस्त !
  • Log in or register to post comments
म
म्हैस Fri, 12/20/2013 - 07:49 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/20/2013 - 08:11 नवीन
छान! आपल्या आयुष्यातला प्रचंड विरोधाभास अधोरेखित करणारी लयबद्ध कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 12/20/2013 - 12:18 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 12/20/2013 - 13:41 नवीन
एकदम लयबद्ध झाली आहे. आवडली
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 12/20/2013 - 14:44 नवीन
कविता लयबद्ध आहे - नेहमीच असतात तुमच्या कविता. पण ... असे बरेच 'पण' डोक्यात आले वाचताना - ते अप्रस्तुत ठरतील इथं म्हणून लिहित नाही :-)
  • Log in or register to post comments
अ
अमेय६३७७ Fri, 12/20/2013 - 15:27 नवीन
कवितेविषयी काही 'पण' असतील तर नक्कीच वाचायला आवडतील. अर्थात या कवितेच्या अनुषंगाने कवितेव्यतिरिक्त काही विचार आले असतील आणि इथे मांडणे अप्रस्तुत वाटत असेल, तर संवादाचे इतर मार्गही आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
स
सूड Fri, 12/20/2013 - 15:02 नवीन
अप्रतिम!! लयबद्ध तर आहेच हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
प
पंडित मयुरेश न… Fri, 12/20/2013 - 15:53 नवीन
काय म्हणु सांग मित्रा........खुपच खास......कवितेच्या सुरवातीची दोन कडवी वाचतो तेव्हा नेहमीची साधी कविता वाटते..... तिसरे कडवे कविता म्हणुन खुपच खास.........तर शेवटची दोन कडवी कवितेला खुपच उंचावर नेतात....... पुर्वीचे संत कसे साध्या सोप्या अभंगातुन खुप मोथे काहितरी सांगुन जायचे........अगदी तसच काहीतरी......
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 12/20/2013 - 23:55 नवीन
अतिशय आवडली. तुमची कविता निराळी आहे हे नक्की. अत्यंत साध्या सोप्या, नेहेमीच्या वापरातल्या शब्दांतून काव्य फुलते आणि मनाचा ठाव घेते. कोणतेही जडजंबाळ शब्द, उपमा अलंकार यांची खैरात न करताही उत्तम कविता कशी असावी याचा वस्तुपाठच. (विश्वाचा हा जरी कोपरा - कोप-यातले विश्व सुखाचे सारख्या ओळीतून मर्ढेकरांची आठवण व्हावी..) -चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/21/2013 - 04:57 नवीन
सुंदर अतिशय सुंदर रचना, साधी सोपी तरी मनाला भावलेली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 12/23/2013 - 23:17 नवीन
+१ सुंदर कविता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सुधीर Sat, 12/21/2013 - 05:09 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Sat, 12/21/2013 - 05:19 नवीन
वा! साध्या सोप्या शब्दांचा वापर करुन मनाचा ठाव घेणारी कविता!
  • Log in or register to post comments
इ
इंद्रधनुष्य Sat, 12/21/2013 - 05:31 नवीन
खुप छान
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/21/2013 - 05:35 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/23/2013 - 14:17 नवीन
प्रतिसाद द्यायला भाग पाडणारी, सरळ, साधी, सोपी अन् तरीही आशयगर्भ कविता. खूप आवडली. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/24/2013 - 09:42 नवीन
ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे सुरेख...
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Fri, 10/16/2020 - 10:26 नवीन
अमेय शेठ ची कविता खूप दिवसांत वाचली नव्हती. ही काढून वाचली आणि शेवटचे कडवे परत एकदा भिडून गेले. _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा