आहे हि.
साधारण पुढच्या
मार्च-एप्रिल पर्यंत वाचून होईल
संपुर्ण. मग सविस्तर
प्रतिक्रिया देईन!
ता. क. ३१ वाचने?
लोकं काय स्पीड ने
वाचतात, कमाल
आहे बुवा :-))
सुंदर आहे कथा. (कदाचित आत्मकथन असेल).
मध्ये जरा संथपणा आला होता पण बाकी कथानक बर्यापैकी धावते आहे.
प्रत्येक दोन ओळीत जागा सोडल्याने वाचायला फार अवघड वाटतं.
कथेतील :
यु लव्ह इच् अदर.."
" माई प्लीज .. सुनिताचं
काही ऐकू नका. तिचं आयुष्य .."
ह्या मजकुरातील सुनिता कोण? कदाचित रजनी ऐवजी चुकून टंकलय का?
पण कथानायक आल्यावर पेशंटची गर्दी वाढणे वगैरे योगायोग शक्य असतात. माझा एक मित्र आहे. तो आला की माझ्या उपहारगृहाची गिर्हाईके वाढायची. एवढेच काय पण कधी गिर्हाईक नसले आणि उपहारगृह सुने सुने वाटत असताना कधी नुसता त्याचा फोन आला तरी गिर्हाईकांची वर्दळ सुरु व्हायची. ह्या योगायोगावर आम्ही अनेकदा बोललो आहोत, आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण ही वास्तवता होती.
कथेचा सुरवातीचा भाग वाचल्यावर ही एखादी गूढकथा असावी अश्या उत्सुकतेने वाचली पण कथेचा मध्यभाग मात्र फार सविस्तर झाला आहे. भराभर स्क्रोल करुन शेवटच्या काही ओळी वाचल्या पण "कांत्याला ही मॅग्नेटिझमची सिध्दी कशी प्राप्त झाली?" वा "तो त्याला ती सिध्दी आहे हे माहीती असूनही त्याबद्दल इतका गंभीर का नाही?" ह्याचे काहीच उत्तर कथेत मिळाले नाही.वर प्रपे म्हणतात त्याप्रमाणे ही कथा अनुभवावर आधारित असल्यामुळे कदाचित तुम्हाला तिच्यातल्या घटनांना प्रामाणिकपणे सांगावे लागले असावे.
कथा आवडली. अखेरीस अर्धवट संपवल्यासारखी वाटली, म्हणजे वरती 'कानडाऊ योगेशु' म्हणतात त्याप्रमाणे "कांत्याला ही मॅग्नेटिझमची सिध्दी कशी प्राप्त झाली?" वा "तो त्याला ती सिध्दी आहे हे माहीती असूनही त्याबद्दल इतका गंभीर का नाही?" ह्याचे काहीच उत्तर कथेत मिळाले नाही.
आय सी यू मधील वैद्यकीय डिटेल्स छान दिले आहेत त्यामुळे कथा मला तरी परिणामकारक वाटली. तुमचं आणखी लिखाण वाचायला आवडेल.
विजुभाऊ,
माझ्या मित्राच्या अनुभवावरून सांगतो ही सिद्धी (सिद्धीच म्हणायचे झाल्यास) जन्मजात असते. 'असे का?' ह्या प्रश्नाला कांहीच उत्तर नाहीये. जसे एखादी नविन जागा आपल्याला उगीचच ओळखिची वाटते, एखादी घटना अगदी अशीच ह्या पूर्वी घडली आहे असे वाटते तसेंच कांहीसे ह्या 'योगायोगाचे' असते असे म्हणावे लागेल.
फक्त कथेच्या पुर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा संबंध बादरायण वाटतो. डॉ. श्रीकांतच्या येण्याने पेशंटांची रीघ लागणे आणि रजनीच्या आयुष्यातून निघून गेलेला आशिष डॉ. श्रीकांत तिच्या घरी येतो म्हणून पुन्हा येणे आणि लग्न जुळुन येणे ह्या दोन घटनांचा मेळ बसत नाही.
जनरली लव्ह स्टोरी बोर मारते आपल्याला. पण या कथेला लव्ह स्टोरीचा फक्त बेस आहे. मॅग्नेटिझम वगैरे फॅण्टसी असो वा सखोल प्रेमाच्या जाणिवा असोत, शेवटी आपल्याला नेमकं काय (करयला) हवं हे सुस्पष्ट कळणं व त्यानुसार वागणं यात मनाचा मोठेपण आहे. वन हॅज टु दिस कॉल. कथा या वळणावर संपली हे बरं झालं.
@ भाकरी, तथास्तु ,खटपट्या,शिद ,अर्जुन, मस्त,मितान, लीमाउजे, शैलेन्द्र, प्रभाकर पेठकर,संजय क्षीरसागर ,कानडाऊ योगेशु,मुक्त विहारी,बहुगुणी,विजुभाऊ ,अर्धवटराव,आतिवास,रेवती
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
'सुनिता' हे नाव चुकून टाईप झाले आहे. ते रजनी असे आहे. असे योगायोग आसपास घडताना दिसतात, मात्र त्यांच्या कार्यकारणभावाची संगती लागत नाही. कांत्यात असलेल्या मॅग्नेटिझमबद्दल खुद्द कांत्या फारसा गंभीर नव्हता, कारण तो एक बुद्धिवादी, डॉक्टर मनुष्य आहे. मात्र रजनीसंदर्भातील स्वतःच्या अनुभवाने तो त्याकडे थोडा गांभीर्याने पाहू लागतो; आणि म्हणूनच आपल्या मित्रांना ही कहाणी त्याला सांगावीशी वाटते.
पेशंटस् ची रीघ लागणे, किंवा हॉटेलात गर्दी होणे याचा अर्थ एवढाच आहे की कांत्याच्या नुसत्या असण्याने एक पोझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आशिष संदर्भात थोडी द्विधा मनस्थितीत असलेली रजनी जेव्हा कांत्याला तिच्या घरी नेते , तेव्हा आशिषसंदर्भातील तिची आशा संपुष्टात आलेली असते. आयुष्याबद्दल एक ठोस निर्णय घ्यावा,कांत्या आणि तिच्या प्रेमाबद्दल माईंना कल्पना द्यावी असा तिचा उद्देश असतो. कांत्यातल्या त्या एनर्जीने तिचे आयुष्य सुखी होईल, किंबहुना कांत्यामुळे तिच्या आयुष्याचे जे काय होईल ते चांगलेच होईल, अशी तिला खात्री वाटत असते. आशिष, ज्याला ती आता विसरून गेली आहे, नेमका तोच अचानक तिला बघायला येणार आहे याची तिला पुसटशी कल्पना सुद्धा नसते. त्यानंतर घडत गेलेल्या घटनांचा ती नाईलाजाने स्वीकार करते.
कुणाला काही एक्सप्लनेशन देण्याची गरज नाही. कथा हे लेखकाचं स्वातंत्र्य आहे. फक्त वाक्याचं स्पेसिंग व्यवस्थित करून पुन्हा अपलोड करा. अशी (म्हणजे सलग वाचता येईल आणि कथेची लांबी कमी होईल) :
मी' त्याला पहिल्यांदा भेटलो ते डॉ. प्रशांत च्या क्लिनिकमध्ये. बाहेर दोन चार पेशंटस् आणि तो केबिनमध्ये खुर्चीत बसलेला. एक गुडघा टेबलाच्या कोपऱ्याला टेकवून . हातात वर्तमानपत्र. खूप एकाग्रतेने काही वाचत असावा. चेहऱ्यावर एक गूढ गंभीर भाव. नजर वर्तमानपत्राच्या पानांवर , पण कदाचित त्या पलीकडे जाणारी.. त्याला डिस्टर्ब करावसं वाटेना. पण आत गेलो तरी त्याला माझ्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती.
"नमस्ते डॉक्टर "
त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले. कदाचित पूर्वीच्या कसल्यातरी गूढात तो अजून बुडालेला. कदाचित त्याला टोकलेले आवडले नसावे. पण पुढच्याच क्षणी तो स्वच्छ हसला
'आपण ?'
'मी डॉ.समीर. आपण डॉ. श्रीकांत ना ? प्रशांतकडून बऱ्याचदा ऐकलय तुमच्याबद्दल '
'' हो. मी प्रशांतकडून ऐकलय तुमचं नाव एकदोनदा' त्याने वर्तमानपत्र व्यवस्थित घडी करून टेबलवर ठेवलं. पुढे म्हणाला ' प्रशांत व्हिजिटला गेलाय. येईलच आता; तुम्ही बसा'.
'आपण कुठे असता?' मी संभाषण रेटत विचारले.
' दत्त मंदिरला क्लिनिक आहे.'
आता स्वतःची ओपीडी सोडून हा बाबा इकडे काय करतोय, असा विचार मनात आला.
' आता निघतोय तिकडे. प्रशांतचा आग्रह होता, म्हणून थांबलो होतो.प्रशांतला फोन करेन नंतर ' तो म्हणाला आणि मी दचकलोच. जणू माझा विचार ऐकूनच त्याने हे वाक्य उच्चारले होते.
'अच्छा..'
इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली ' हं, आलोच दहा मिनिटांत 'नंतर मला म्हणाला 'मी चलतो आता, तुम्ही
थांबा. मी करेन फोन प्रशांतला '
माझ्या उत्तराची वाट न पाहता तो घाईघाईने निघूनही गेला. क्षणभर वाटलं हा विक्षिप्त मनुष्य असावा.
कथा आवडली .. सहसा कथा वाचत नाही ,पण तुमची एका दमात वाचून संपवली .
लेखन मूल्य म्हणून कथा उच्च आहे असे म्हणेन ! शेवट्पर्यंत खिळवून ठेवते . वरिल काही प्रतिसादाप्रमाणे मला विसंगती जाणवली नाही .. !
तुमचा व्यवसाय बाकी 'नोबल"! संकटातील माणसाला धीराचे दोन शब्द अधिकाराने देणे यापरता भाग्य नाही . पिताश्री आजारी असताना आय सी यु मधील सारे वातावरण अनुभवले आहे... तुम्ही ते सारे छान उभे केले आहे..
आता तुम्ही वापरलेला शब्द -
कांत्याच्या नुसत्या असण्याने एक पोझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते
माझा याच्यावर विश्वास आहे पण मेडिकल सायन्स चे यावर काय उत्तर आहे ? असे काही असते का ? षट चक्रे असतात यावर तुमची अॅनाटॉमी काय म्हणते ? "औरा" किंवा "तेजोवलय" याबद्दल मेडिकल सायन्स काय म्हणतेय ?
डॉक्टर अहिरराव यांची उत्तरे अपेक्षित आहेत , श्री अहिरराव यांची नव्हे.
माझ्या ह्या प्रतिसादाची लिंक मी माझ्या प्रतिसादातील 'त्या' मित्राला दुबईत पाठवली. त्यावर त्याचा मला आलेला एस.एम.एस. जशाच्या तसा सर्वांच्या माहितीकरीता खाली देत आहे.
"Friend of mine took me to a bar. Near to his house on a working day so We can talk in peace. We're the only two for 15 mints n in 30 minutes each table was filled n the bar was filled with noises, my friend asked waiter what's special today? his answer. 'No idea. Never happened before on a working day.'
I shared my past exp with my friend that day. Today I cd recall it after. Reading same damn thing.
आता मी एक प्रयोग करून पाहणार आहे. जेंव्हा कधी माझ्या उपहारगृहाला गर्दी नसेल तेंव्हा त्याला मला फोन करायला सांगणार आहे. पाहूया काय होते ते.
@इरसाल, विटेकर, स्वलेकर, प्रभाकर पेटकर ,
खूप खूप आभारी आहे.
@विटेकर सर,
मॉडर्न मेडिसिन मधील aura वगैरे जे प्रकार शारीरिक किंवा मानसिक पातळीवर जाणवतात, त्यांचे महत्व फक्त एखाद्या आजारापुरते मर्यादित असते. प्रत्यक्षात अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आसपास पाहतो, अनुभवतो, पण आपण त्यांना एखादे परिमाण लावू शकत नाही. उदा. मंदिरात शांत वाटणे , स्मशानात भकास वाटणे वगैरे ही शांती किंवा भकास वाटणे हा मानसिक पातळीवरील वैयक्तिक अनुभव असतो. मात्र आपण तो मोजू शकत नाही.
पूर्वसूचना या अशाच मानसिक पातळीवर जाणवतात. या संदर्भात खूप पूर्वी वाचलेला एक किस्सा आठवतो. एक मराठी अभिनेत्री (बहुदा जयश्री गडकर ) बसने प्रवास करत होत्या. त्यांचा स्टोप येण्याच्या दोन तीन मिनिट आधी त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी कंडक्टरला 'बस थांबवा' म्हणून सांगितले. 'बस अशी अधेमधे थांबणार नाही' असे सांगूनही त्या ऐकेनात म्हणून नाईलाजाने कंडक्टरने बस थांबवली. त्या उतरल्या आणि बस पुढे निघून गेली. काही क्षणातच त्या बसला मोठा अपघात झाला, आणि काही माणसे दगावली.
या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांना फक्त त्या क्षणी 'आताच्याआता बसमधून बाहेर पडावे' असेच फक्त वाटत होते. अशा गोष्टींचा कार्यकारणभाव ते अनुभवणारी व्यक्तीसुद्धा सांगू शकत नाही.
षटचक्रांचे साम्य nervous plexuses आहे. असे असले तरी त्यांची कार्ये वेगवेगळी आहेत. plexuses चे महत्व फक्त शारीरिकदृष्ट्याच केवळ आहे कारण आधुनिक विज्ञान आत्मा हा प्रकार मानत नाही.
कथा अगडबंब मोठी आहे. दमलो वाचुन वाचुन. शिवाय कथेच्या पहिल्या भागाचा आणि दुसर्या भागाचा काही संबंध नाही. पहिला भाग वाचताना उत्सुकता होती की कांत्या बद्दल नंतर काय स्पष्टीकरण मिळणार. ते न मिळताच लव्ह ष्टोरी निघाल्याने अपेक्षाभंग झाला.
अजुन एक गंमत म्हणजे कांत्याच्या नुसत्या येण्याने किंवा असण्याने पेशंट्सची रांग लागत असेल आणि असलेले क्रिटिकल होत असतील तर ती पोझिटिव्ह एनर्जी कशी. ती तर निगेटिव्ह एनर्जी झाली. फायदा एका डॉक्टरला. ताप २५ पेशंट्सना.
@ मृत्यून्जय, असे सुद्धा असू शकते ना की इतर ठिकाणी जाणारे पेशंटस् त्या हॉस्पिटलकडे कांत्याच्या प्रेझेन्समुळे वळले असतील ! :) "अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंती"
आधी मला हे वाक्य तुमच्या प्रोफाईलचे घोषवाक्य असावे, असे वाटले होते. पण तो टिप्पणीचा भाग असल्याचे समजले.
सदर कथेला आपण इतिहास किंवा खऱ्या घटनेवर आधारित वगैरे समजत आहात, असे वाटते. या कथेतील कांत्या कुठेही "पेशंटसची रांग लावून देणारा डॉक्टर उपलब्ध आहे" अशी जाहिरात करताना दिसत नाही. कृपया कथेकडे निव्वळ कथा म्हणून पहावे, ही नम्र विनंती. प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
"अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंती"
आधी मला हे वाक्य तुमच्या प्रोफाईलचे घोषवाक्य असावे, असे वाटले होते. पण तो टिप्पणीचा भाग असल्याचे समजले.
नाही हो ते घोषवाक्यच आहे. माझ्या सगळ्याच प्रतिसादांखाली दिसेल ते. अक्कल गहाण ठेउन प्रतिसाद देणार्या काही महाभागांसाठी आहे तो. तुमच्यासाठी नाही. तुमच्या लेखाला उद्देशुन नव्हते. ही कथा आहे एवढे कळते हो मला.
बाकी लेख ओघवत्या शैलीत लिहिला आहे खुप मोठा झाला असल्याने तो पकड घेत नाही एवढेच. जर २ भागात टाकला असतात तर कदाचित अजुन चांगला वाटला असता पणा आधी म्हटल्याप्रमाणे पहिल्या अर्ध्या भागाचा आणि दुसर्या अर्ध्या भागाचा मेळ नीट जमत नाही त्यामुळे कदाचित विस्कळीतही वाटु शकला असता.
प्रतिक्रिया
आयला, सर्वात लांब गोष्ट
आयला सर्वात लान्ब कथा आहे हि
आयला सर्वात लान्ब कथा आहे हितुम्हि मकले चि समर्पण वाचलि नाय का ?*****
मानल बुवा
वरुन खाली स्क्रोल करुनच दम
योगायोग.
अप्रतिम !!
मस्त...
कथा आवडली.
कथेचा सुरवातीचा भाग वाचल्यावर
+१
"कांत्याला ही मॅग्नेटिझमची सिध्दी कशी प्राप्त झाली?" वा "तो त्याला ती सिध्दी आहे हे माहीती असूनही त्याबद्दल इतका गंभीर का नाही?" ह्याचे काहीच उत्तर कथेत मिळाले नाही.आय सी यू मधील वैद्यकीय डिटेल्स छान दिले आहेत त्यामुळे कथा मला तरी परिणामकारक वाटली. तुमचं आणखी लिखाण वाचायला आवडेल.+१
कथा आवडली...
अत्यंत ग्रेट कथा आणि उत्तम लेखनशैली
छान लिहीली आहे कथा.
सिद्धी??
कथा आवडली.
कथा आवडली. मध्येच सुनिता नाव
मस्त ! एकदम मस्त !
दोन कथा एकत्र झाल्यात का?
@ भाकरी, तथास्तु ,खटपट्या,शिद
तुम्ही लिहा हो बिनधास्त
चान कथा
डॉक्टरसाहेब
कांत्याच्या नुसत्या असण्याने एक पोझिटिव्ह एनर्जी क्रिएट होतेमाझा याच्यावर विश्वास आहे पण मेडिकल सायन्स चे यावर काय उत्तर आहे ? असे काही असते का ? षट चक्रे असतात यावर तुमची अॅनाटॉमी काय म्हणते ? "औरा" किंवा "तेजोवलय" याबद्दल मेडिकल सायन्स काय म्हणतेय ? डॉक्टर अहिरराव यांची उत्तरे अपेक्षित आहेत , श्री अहिरराव यांची नव्हे.जाम आवडल . सुरुवातीपासुन शेवट
योगायोग अजून चालू आहे.
@इरसाल, विटेकर, स्वलेकर,
कथा अगडबंब मोठी आहे. दमलो
@ मृत्यून्जय, असे सुद्धा असू
"अक्कल गहाण ठेवली असल्यास
चालायचेच, धन्यवाद
कथा खरंच आवडली, खुप मस्त
कथा चांगली आहे पण योगायोग अन
@ मन्द्या ,संजय क्षीरसागर,
कथा आवडली