Welcome to misalpav.com
लेखक: सुहास.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाश्याचं लिखाण म्हणजे भिडणारं वास्तव, कानाखाली काहीतरी उमटणारची खात्री नि त्याबरोबरच मनात हमखास उमटणारा 'च्च्च्च्च' चा सूर! जगू दे की बाबा. का छळतो? :(

Exactly! हे सुहासराव लिहितातच का असं वाट्तं (त्यांनी लिहिलेलं वाचल्याशिवाय राहवत नाही, आणि वाचलं की 'वाचलं नसतं तर बरं झालं असतं' असा सुन्नपणा असतो...) असो, व्यक्तिचित्रणाला सलाम!

खूप छान लिहिलं आहे, असं तरी कसं बोलू? वाचून सुन्न झालो. मी कंस्ट्रक्शन साईटवर काम करायचो, तेव्हा तिथली १ कामगार बाई संध्याकाळी पगार झाला की लहान मूल कडेवर घेऊन मारवाड्याच्या दुकानात जायची आणि जेवण करायला ५ रुपयाची भाजी, ५ रुपयाचा मसाला, ५ रुपयाचे तेल, ५ रुपयाचे तांदूळ इ. घ्यायची आणि त्या लहान मुलासाठी १ छोटा कप दूध घ्यायची, ते दिवस आठवले. हे लिहिताना पण डोळ्यात पाणी आलंय, पण काय करणार? डोळे पुसून आपल्या कामाला लागणार. (नेहमीचचं !!)

खरं तर याला काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही. सत्य परीस्थिती अगदी सहज शब्दात मांडलीये. या दिवाळीला आलो होतो तेव्हाही असे बरेच कामकरी कुटुंब पाहायला मिळाले. पण त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो कि नाही तो प्रश्नच रहिला. किवा माझीच वांझोटी झालेली इच्छा.

नेहमीचंच असलं तरी चटका लावणारं! आजूबाजूला इतकं दैन्य असूनही त्याकडे पाहणारे विरळाच. त्या कुटुंबाच्या वाईट परिस्थितीला आशेची झालर लावल्याने परिस्थितीची भीषणताच आणखी उठून दिसते. आशा फार वाईट. आशा त्या माणसाला आयुष्यभर खपायला लावेल, त्या बाईला मजुरी करायला लावेल, इतर माणसं त्यांना जी आणि जशी वागणूक देतील ती सहन करायला लावेल, सगळी माणसं सारखीच आहेत आणि येनकेन प्रकारे बळकावून बसणे हाच इथे श्रीमंत होण्याचा मार्ग आहे हे संस्कृतीच्या बुरख्याआडचं सत्य कधीही पाहू देणार नाही. असो. हे लोक कसे माजलेले असतात आणि गरिबाने आपली गरिबी हा आपला कमीपणा आहे हे निमूट स्वीकार करून नम्रतेने वागले पाहिजे अशा अर्थाच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.

भारताचा डिस्पॅरीटी इन्डेक्स वाढतंच चालला आहे ..तुमचा लेख त्याची प्रकर्षाने जाणीव करुन देतो.. मध्यंतरि कुठेतरी बातमी वाचली होती डिस्पॅरीटी इन्डेक्स बद्दल .. महाराष्ट्र त्या मानाने या इन्डेक्स वर त्या मानाने बराच खाली आहे ..

सुहासचे लेख वाचले की मनात प्रचंड अपराधी पणाची भावना दाटुन येते. दोन पाच मिनिटे त्याने मांडलेल्या विषयावर विचार करायचा आणि नवा धागा उघडायचा हे नेहमिचच आहे.

विद्या नम्रपणे वागणार्‍याला शोभते, पण होत काय त्या विद्येच पैशाशिवाय कारण पैसा हा माज असणार्‍यालाच शोभतो आणि लाभतो पण..

__/\__ सुहास! लेखनाला मनापासून सलाम . काय म्हणावां याला? सुख दु:खाचं कोलाज? जीवन? अर्थात "नेहमीचंच" हेच खरं!!!

जोर का झट्का जोरसेच लगा मन सुन्न होते असे काही ऐकल्यावर, वाचल्यावर....... मागच्या उन्हाळ्यात हायवे वरुन कामावरुन घरी जाताना १ जोडप एका बाळाला घेवुन रस्त्याचे काम करताना दिसायचे. ते बाळ नेहमी समोर असलेल्या कुल्फि वाल्या कडे बघुन रडत असताना बघुन वाइट वाटे. त्या दरम्यानच माझा मुलगा कुल्फि साठी रोज रडायचा १ दिवस त्याला फैमिली पैकच आणुन दिला. माझा मुलगा खुश झाला. तेव्हाच ठरवले त्या बाळाला हि १दा तरी कुल्फि घेवुन द्यायची. १ दिवस हाफ डे घरी जाताना नेहमी प्रमाणे ते बाळ समोर असलेल्या कुल्फि वाल्या कडे बघुन रडत होते. त्या रणरणत्या उन्हात रडुन रडुन ते कासाविस झाले होते. आइ वडिल काम करत होते पण त्याची आइ रडवेलि झाली होती. मी चटकन गाडी थाम्बवून त्याला कुल्फि घेवुन दिली आणि त्याला एका झुडुपाच्या सावलीत नेउन बसवले. त्यावेळी त्या बाळाच्या व त्याच्या आइच्या चेहर्यावरचा आनन्द बघुन मला मझ्या मुलाला फैमिली पैक देता ना झाला होता त्या पेक्शा जास्त आनन्द झाला होता. विशेश म्हणजे त्यानन्तर ते बाळ परत त्या कुल्फि साठी रडताना दिसले नाही. ता. क. माझा मोठेपणा सान्गत नाही फक्त मानसिक समाधान व्यक्त करतेय.

मनाला चटका लावणारे लेखन... पु. ले. प्र.

काहीसं नगरीनिरंजनसारखं म्हणेन. त्या पोराला १० पर्यंत साळा शिकून जेव्हा ना धड कामगार ना पांढरपेशा अशी अवस्था येईल, आणि जगाचे चटके बसतील, तेव्हा येणारी निराशा. तीही नेहमीचीच...

लेखनाची स्टाईल आवडली. बाकी, हा विरोधाभास सर्रास सगळीकडे आढळतो हल्ली आणि पूर्वीही. का कुणास ठाऊक, भावाने मेजवानीला बोलावल्यावर दागिन्यांना घास भरवणारी बहीण आठवली.

>>भावाने मेजवानीला बोलावल्यावर दागिन्यांना घास भरवणारी बहीण आठवली. बर्‍याचदा आमंत्रण तुमच्यापेक्षाही तुमच्या संपत्तीला असतं. एरवी जी लोक तुटक हसल्यासारखं करतात ते तुम्ही स्थिरस्थावर झाल्यावर अगदी घरच्यासारखं असल्याचं दाखवून विचारपूस ते बघून हसावं की रडावं ते कळत नाही.

वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद !

सद्ध्या वाचनाची मनस्थिती नाहिये पण सुहासचा लेखन प्रकार म्हण्जे काहितरी सत्य अनुभवण्याची मेजवानी असण्याची खात्री आहे.. :) सो सॉरी सुहास पण लवकरच वाचण्याची ताकत मिळेल याची देखील खात्री आहेच.. :)

सुहास खुप छान लिहले आहेस नेहमीप्रमाणे,तु मी आपण सगळे एकाच जगात वावरतो आहोत पण तुझे लीखाण वाचल्यावर आजुबाजुला पाहायचा नजरीया बदलतो........

लेख भारीच आहे... पण त्या "नेहेमीचंच" शब्दानी सगळी गोची करून ठेवलीये. शेवटी एक कानफडात मारून जातो. आपला व्हाइट कॉलर दांभिकपणा उघडा पाडतो. सुन्न करणारा लेख! जे.पी.