Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद भागवत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सोन्यात गुतंवणुक माझ्यामते ***पणा आहे . शेवटी तो एक धातु आहे . आयातीवर सरकारचे परकीय चलन खर्ची पडते . आणी वेळ आल्सास हि लोक सोन मोडत नाहित . कारण इज्जतीचा सवाल असतो .

http://www.24hgold.com/english/news-gold-silver-india-planning-gold-confiscation-and-gold-market-interventions-.aspx?article=5033875414H11690&redirect=false&contributor=Bron+Suchecki&mk=1/ http://www.forbes.com/sites/jessecolombo/2013/12/19/breaking-gold-may-be-on-the-verge-of-a-waterfall-style-decline/

इथे तर गळ्यात सोन्याचे साखळदंड आणी सोन्याने मढवलेले शर्ट घालणारे लोक पण गाळात गेलेत.....तर सर्वसामान्य लोकांची काय बात :)

सोन्याचे दागिने लग्नात एकदा आणि मुलाच्या मुंजीत एकदा सगळे घातले होते. एरवी बँकेच्या लॉकरचं भाडं फुकटचं भरते आहे. त्यामुळे नवीन सोनं कमॉडिटी मार्केटचं सुद्धा घेत नाही! सांगली पुण्यासारख्या शहरात तर ५ ग्रॅमचं मंगळसूत्र सुद्धा घालायची सोय राहिली नाही म्हणे! सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे! बाकी मंदी आणि भावनिश्चितीबद्दलचे विवेचन आवडले.

>>सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे! तस नाही वाटत सोन म्हणल की बायका यड्या होतात. सोनच अस नाही कि खरेदी म्हणल कि बायका यड्या होतात. आजच गुरुपुष्यामृत मुहुर्तावर सोन खरेदी बाबत य.ना वालावलकर यांचे एक पत्र मटा ला आले आहे. गुरुपुनर्वसू योगावर सोनेखरेदी २० डिसेंबरला सकाळी ६ वा. ५९ मिनिटे ते ७ वा. ८ मिनिटे असा केवळ नऊ मिनिटे गुरुपुष्यामृत योग होता. त्या काळात कोणी सोने खरीदण्याचा संभव नाही. म्हणून १९ डिसेंबरच्या गुरुवारी सर्व सुवर्णखरेदी गुरुपुनर्वसू योगावर झाली हे निश्चित. अर्थात मुहूर्त ही एक निरर्थक कल्पना आहे. सोने कधीही घेतले तरी सारखेच. पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा. य.ना.वालावलकर महाराष्ट्र टाईम्स, २४.१२.१३ ( टंकलेखन सौजन्य संजोपराव)

>>>पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. यनावालावरकरांसारख्या मनुष्याने सोन्याची किंमत जाणू नये हे दुर्देव. सोन्याचा हव्यास नसावा मात्र सोनं हे अत्यंत उपयुक्त तसेच मनाला आधार असणारा धातु आहे. आजुबाजुला सर्वत्र महागाई वाढत असतांना, शेअर बाजार किंवा तत्सम गुंतवणूक कधीही घाट्यात येण्याची शक्यता असलेल्या वातावरणात सोनं हीच काय ती दिलासा देणारी गुंतवणूक आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटले आणि त्यांनी मुहूर्ताचा किंवा कसलाही आधार घेऊन ते खरेदी केले तर त्यात त्रागा करण्यासारखे काय आहे?

सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे ते. आणि जर बँकेत लॉकरमध्ये ठेवायचे तर गहाण ठेवा आणि आलेल्या पैशाचे पुन्हा सोने घ्या. व्याज जरी गेले तरी बराच काळ गुंतवणूक केल्यास बराच फायदा होतो. मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.) घेतले सोने तेव्हा भाव ८०००/- कर्जावर हफ्ता (फक्त व्याज भरावे लागत असल्याने) महिना १% कर्ज ९०% ऑफ द गोल्ड प्राईज in मार्केट (तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)

>>>(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.) हे भारीच... :)

पटले नाही. साहेब माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी(१९८८ मध्ये) मी आईला २५ ग्राम सोन्याचा हार घेतला होता तेंव्हा सोन्याची किंमत ३२०० रुपये होती. तेंव्हा तेच पैसे जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ठेवले असते तर पहिली १० वर्षे १२ टक्क्याने आणि नंतरची १५ वर्षे ९ टक्क्याने व्याज गृहीत धरून किंमत ३९८०० होते. शिवाय माझा ९६० रुपये( प्रती ग्राम कर वाचला असता) म्हणजे २२४० रुपयांचे ३९००० झाले असते. शिवाय हरवणे चोरीला जाणे लॉकरचे भाडे हे त्यात धरलेले नाही. हौसेला मोल नाही. तोच हार यावर्षी आईने अतिशय समाधानाने लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी घातला होता त्याचे मोल कसे करणार. हौसेसाठी घेतलेले सोने आणि गुंतवणूक या गोष्टी वेगळ्या ठेवाव्या अशी माझी विचारसरणी आहे. हा वैयक्तिक सत्य अनुभव आहे. तेंव्हा आपले म्हणणे पटले नाही.

तुम्ही माझा मूळ प्रतिसाद संपूर्ण वाचला नाही. तसेच ३२०० रुपये (प्रती १० ग्रामप्रमाणे)सोन्याच्या भावाचा २५ ग्रामचा हार रु.२२४० ला कसा ते काही कळले नाही. असो. पण माझे गणित असे आहे कि तर....१९८८ साली ३२०० प्रमाणे घेतलेले सोने (रु. ३२०० प्रती १० ग्राम )रु. ८०००/- ला हातात आले.( जे दागिन्याच्या रूपाने म्हणजे सोने कमीच. पण तो मुद्दा नाही.) आज सोने ३०००० प्रती १० ग्राम प्रमाणे जरी विचार केला तरी त्याची किंमत ७५००० रुपये होते. हा झाला ढोबळ गणिताचा भाग. पण जर मी म्हणतो त्याप्रमाणे त्याकाळी सोने गहाण (लॉकर मध्ये नाही ) ठेवून नवीन सोने ट्रेड केले असते जसे मी वर नमूद केले आहे तर तुमचे किती हार आज तुम्ही विकत घेऊ शकला असता , व्याज देऊनहि , त्याचे गणित जाणकार मांडतीलच. कारण
(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)
कदाचित २ वर्षात १ नवीन हार हि आईला घेऊन देऊ शकला असतात म्हणजे ओरिजिनल एक आणि नवीन एक असे दोन हार झाले असते. मी दिलेला ट्रेड खालीलप्रमाणे : (डॉक्टर साहेब ट्रेड ....ट्रेड अतिशय महत्वाचा भाग आहे इथे.)
मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
पी पी एफ मधील तुमची रुपये ८००० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.

आणि

जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २२४० रुपयाची तुमची हारातली गुंतवणूक पी पी एफ मध्ये असती तर एकूण 27६२२/- देते.

सोन्यात तुम्हाला एकदाच रु. ८०००/-( किंवा तुम्ही अदा केलेली रक्कम रु. २२४० /- )भांडवल म्हणून गुंतवावे लागले असते. पी पी एफ ला तुम्हाला दर वर्षी केवळ खाते सुरु राहावे म्हणून किमान १०० रुपये प्रमाणे २५ वर्षासाठी २५०० /- रुपये वाढीव भांडवल गुंतवावे लागले असते.(आता रु ५०० किमान गुंतवणूक करावी लागते असे ऐकून आहे.) मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले. (ते मी कितीही वेळा करू शकतो.कारण जितके जास्तवेळा खाते बंद उघड होईल तेव्हढे पैसे मला जास्त मिळतात कारण भाव वाढलेला असतो.)

>> मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले. हे म्हणजे स्टॉकचे मार्जिन अकाऊंट उघडण्यासारखे झाले. असो, या बाबतीत मी डॉ. खरे यांच्याशी सहमत आहे. २०११ च्या रिपोर्टमध्ये वॉरन बफेने सोन्याबद्दल काय म्हटले आहे, ते इच्छुकांनी जरूर वाचावे. The second major category of investments involves assets that will never produce anything, but that purchased in the buyer’s hope that someone else – who also knows that the assets will be forever unproductive – will pay more for them in the future. Tulips, of all things, briefly became a favorite of such buyers in the 17th century. This type of investment requires an expanding pool of buyers, who, in turn, are enticed because they believe the buying pool will expand still further. Owners are not inspired by what the asset itself can produce – it will remain lifeless forever – but rather by the belief that others will desire it even more avidly in the future. The major asset in this category is gold, currently a huge favorite of investors who fear almost all other assets, especially paper money (of whose value, as noted, they are right to be fearful). Gold, however, has two significant shortcomings, being neither of much use nor procreative. True, gold has some industrial and decorative utility, but the demand for these purposes is both limited and incapable of soaking up new production. Meanwhile, if you own one ounce of gold for an eternity, you will still own one ounce at its end. What motivates most gold purchasers is their belief that the ranks of the fearful will grow. During the past decade that belief has proved correct. Beyond that, the rising price has on its own generated additional buying enthusiasm, attracting purchasers who see the rise as validating an investment thesis. As “bandwagon” investors join any party, they create their own truth – for a while. Over the past 15 years, both Internet stocks and houses have demonstrated the extraordinary excesses that can be created by combining an initially sensible thesis with well-publicized rising prices. In these bubbles, an army of originally skeptical investors succumbed to the “proof” delivered by the market, and the pool of buyers – for a time – expanded sufficiently to keep the bandwagon rolling. But bubbles blown large enough inevitably pop. And then the old proverb is confirmed once again: “What the wise man does in the beginning, the fool does in the end.” Today the world’s gold stock is about 170,000 metric tons. If all of this gold were melded together, it would form a cube of about 68 feet per side. (Picture it fitting comfortably within a baseball infield.) At $1,750 per ounce – gold’s price as I write this – its value would be $9.6 trillion. Call this cube pile A. Let’s now create a pile B costing an equal amount. For that, we could buy all U.S. cropland (400 million acres with output of about $200 billion annually), plus 16 Exxon Mobils (the world’s most profitable company, one earning more than $40 billion annually). After these purchases, we would have about $1 trillion left over for walking-around money (no sense feeling strapped after this buying binge). Can you imagine an investor with $9.6 trillion selecting pile A over pile B? Beyond the staggering valuation given the existing stock of gold, current prices make today’s annual production of gold command about $160 billion. Buyers – whether jewelry and industrial users, frightened individuals, or speculators – must continually absorb this additional supply to merely maintain an equilibrium at present prices. A century from now the 400 million acres of farmland will have produced staggering amounts of corn, wheat, cotton, and other crops – and will continue to produce that valuable bounty, whatever the currency may be. Exxon Mobil will probably have delivered trillions of dollars in dividends to its owners and will also hold assets worth many more trillions (and, remember, you get 16 Exxons). The 170,000 tons of gold will be unchanged in size and still incapable of producing anything. You can fondle the cube, but it will not respond. Admittedly, when people a century from now are fearful, it’s likely many will still rush to gold. I’m confident, however, that the $9.6 trillion current valuation of pile A will compound over the century at a rate far inferior to that achieved by pile B.

लिमिटेशन्स आहेत भाव पडला तर लगेच ब्रोकर पैसे मागतो.किंबहुना मार्जिन म्हणजे जुगारच असावा. इथे नुसते नियमाने व्याज भरले कि झाले सोन्याचा भाव वाढला कि पुन्हा सोने TOP UP करायचे आणि पैसे नाही "युनिट्स" वाढवायचे. पण इथे सर्वजण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत मी ट्रेडिंग म्हणून पाहतो आहे. तसेच सोने, शेअर्स,सदनिका काहीही खरेदीची वेळ हि आदल्या उच्चतम पातळीखाली जेव्हा येते तेव्हा असते तसे ट्रेड भरपूर मिळतात पण पारंपारिक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे आणि एकदम जुगार म्हणून पाहणारे असे दोन तट मला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसून आले ते त्या तत्वांना कन्व्हिन्स आहेत मी माझ्या तत्वाला कन्व्हिन्स आहे. असो...

(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
हा भाव जेव्हा - जेव्हा सोने सोडवले तेव्हाचा आहे.

सोन हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे हे मान्यच. गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांबरोबर सोनेही समाविष्ट असावे. परंतु ही गुंतवणूक सोन्याची बिस्किटे अथवा नाणी घेऊन करता येते. सोन्याच्या दागिन्यांचा सोस अनाकलनीय आहे. दागिने खरेदी करताना तसेच प्रसंगी ते मोडताना घडणावळ, घसारा इत्यादी कारणांसाठी होणारा खर्च निरर्थक ठरत नाही का? दागिन्यांचा हा सोस अकारण संपत्तीच्या प्रदर्शनाकडे आणि त्यातून अहमहमीकेकडे झुकतो आणि त्यातून गुंतवणूकीचा मूळ उद्देश कितपत साध्य होतो?

आपली हिशेबात गल्लत झाली आहे. १) मी प्रती ग्राम प्रमाणे स्वच्छ हिशेब दिला आहे त्यात ३२००/ रुपये / दहा ग्राम आहे या सर्व हिशेबाला आपण २. ५ ने गुण म्हणजे आपल्याला हिशेब नीट लक्षात येईल २) आपल्या करपात्र उत्पन्नातून ३० टक्के वजावट मिळते म्हणजे प्रती दहा ग्राम रुपये ९६०/- म्हणजे ८००० पैकी २४०० रुपये वजावट म्हणजे ५६०० रुपये नक्त गुंतवावे लागतात ३) पी पी एफ मधील तुमची रुपये ५६०० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.आणि हे २४०० रुपये (कराचे वाचलेले )सुद्धा त्यात गुंतवले तर तीच रक्कम १,५८,०००/ - होतात तीच सोन्यातील गुंतवणूक ८ हजार रुपयावर ७५००० देते. आपणच हिशेब करून पहा काय जास्त फायदेशीर आहे ४) दर वर्षी १०० रुपये आपल्याला तसेच बारा टक्के व्याज सुद्धा देतात. ५) पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही) ६) सोन्याची किंमत आपण म्हणता तशी पूर्वी वाढलेली नव्हती हि गेल्या पाच वर्षातील वाढ (२००७ ते २०१२) आहे मागच्या वर्षानंतर हि वाढ परत थांबली आहे. (http://zeenews.india.com/business/bullion/bullion-news/gold-price-india-in-last-88-years_74354.html)तेंव्हा आपण त्या कालावधीत सोने घेतले तर भरपूर फायदा झाला त्यागोदर नाही आणि कदाचित लगेच पुढच्या पाच वर्षात होईल असे नाही. सोने फक्त ७३-७४, त्यानंतर ७७-८० आणि शेवटी २००७ ते २०१२ या कालावधीत भरभर वाढले होते आणि बाकी इतकी वर्षे ५-६ % या दरानेच वाढले आहे ७)सोने गेल्या ८८ वर्षात ८.५ टक्के दरानेच वाढलेले आहे यात एक महायुद्ध, असंख्य युद्धे भयानक जागतिक मंदी इ अनेक करणे असून सुद्धा. (२०१२ साली २९००० आणि आता ३०००० म्हणजे जेमतेम ३ % म्हणजे आता आपण जर १२ टक्के व्याजाने पैसे घेतले तर नक्त ९ % नुकसान होते ) . ८) आपल्या हिशेबात १२ % व्याज (सोन्याच्या कर्जाचे) गृहीत धरलेले नाही. ९) वरील विदा मध्ये कोणत्या वर्षात सोने १२ टक्क्यापेक्षा वाढले तेवढीच वर्षे आपल्याला नफा होईल आणि इतर वर्षी नुकसान होईल. सोने वाढेल कि कमी होईल याचा अंदाज बांधणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही. १०) सोन्याच्या व्यापारातून मिळवलेला नफा हा परत करपात्र आहे म्हणजे ३० % त्यातून आयकर कपात केली तर प्रत्यक्ष फायदा किती होईल ते पहा. ८८ वर्षात ८.५% दराने वाढलेल्या सोन्यावर ३० टक्के आय कर लावल्यास नक्त परतावा ५.८ टक्के होतो. ११) पी पी एफ मधील गुंतवणूक हि पूर्णपणे कर् माफ आहे १२) सोन्यातील हा ट्रेड सर्व सामान्य माणसा ला सहज जमणारा नाही. पण वर्षात एकदा सरकारी खात्यात पैसे भरणे कोणाही माणसाला सहज जमणारे आहे. सबब आपले म्हणणे अजिबातच पटणारे नाही.

प्रथम इथे गेल्या ४१ वर्षातीलसोन्याचे भाव दिलेले आहेत. म्हणजे सोन्याची वाढ हि गेल्या पाच वर्षातील वाढ आहे का ? त्याचे उत्तर मिळेल. सोन्याचे अनेक ट्रेड आहेत जे तुम्हाला इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा चांगले आणि सुरक्षित पैसे मिळवून देतातच. पण तुम्ही फार ढोबळ पणाने पी. पी. एफ आणि सोने हि सांगड घालता आहात. मी २००६ पासून ह्या प्रकारात ट्रेड करत आहे. कॅडबरी किंवा बिस्कुट ह्या प्रकारात सोने घेतो आहे त्यामुळे ते विकताना घट कधीच आली नाही. माझा ट्रेड खालील प्रमाणे : १० ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक : ८४०० ०९ ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक :७५६० (हे पैसे बँकेने वरील १० ग्राम सोने गहाण ठेऊन दिले आहेत.)म्हणजे ७५६० भागिले ८४० रुपये प्रती ग्राम प्रमाणे ९ ग्राम प्रथम गहाण ठेवलेले सोने सोडवले २००८ साली तेव्हा भाव होता १२५०० आता मी ९ ग्राम सोने विकले आणि आलेले पैसे बँकेत भरून उरलेले १० ग्राम सोडवून घेतले आणि तेही सोने विकले. १९ ग्राम सोन्याची विक्रीतून आलेले पैसे : २३७५० (१९ * १२५०) वजा बँकेचे कर्ज : ७५६० १२% व्याज रुपये ९०७.२० दर साल : २७२२ प्रमाणे रुपये (९०७.२०* ३ = २७२१.६०) एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक आता तुम्ही म्हणाल म्हणजे फिक्स डीपोझीट एवढाच झाला कि तर सकृत दर्शनी तुम्हाला ट्रेड कळावा म्हणून दिलेली पद्धत आहे ती. वास्तवात मी पुन्हा ५०६८ रुपयाचे सोने विकत घेतले असे करत करत आज माझ्याकडे नक्त ३० ग्रांम सोने, म्हणजे एकूण ४० ग्राम सोने, बिस्कुट रुपात जमा आहे. (फक्त ८ वर्षात...२५ नाही कि १५ नाही )पण त्यासाठी मला १० वेळा बँक ते सोनार धावाधाव करावी लागते जी पी पी एफ मध्ये पूर्णपणे वाचते कारण आता ओन लाईन पैसे भरण्याची सोय हि आहे. पण हा झाला माझा ट्रेड. ह्याचे अनेक कंगोरे आहेत जे मला भांडवलवृद्धी देतात ती हि युनीट्सच्या रुपात. आता तुम्ही गणित करा २००६ ला माझी गुंतवणूक ८४०० आणि आज माझे भांडवल (जो माझा नफा हि आहे.) ३० ग्राम * ३००० प्रती ग्राम = रु. ९००००/- कोण फायद्यात आहे ते.(मुळ १० ग्राम मी लक्षातच घेत नाहीये.) आता टेक्स : कर भरताना माझ्या एकूण उत्पन्नातून ३०% कर भरावा लागतो त्यात माझ्या करबचत योजनामधील गुंतवणूक माझ्या कामी येते आणि गम्मत म्हणजे त्या कर बचत योजनाही व्याज देतात. माझा ट्रेड सर्वांना कळला का ? मी काही लपवतो आहे असे वाटत असेल तर जरूर विचारा. --------------------------------------------------------------------------------- प्रथम, आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. तुम्ही सोने खरेदीतून सरसकट ३०% कर वजा कसा केलात ते मला समजले नाही. कुणी मिपाकर जर सी ए असतील तर त्यांनी प्रकाश टाकावा. मला जाणून घ्यायला आवडेल.कारण त्याने माझे नफ्याचे प्रमाण भरपूरच वाढेल. म्हणजे आजचे ३०००० रुपयाचे सोने कर वजवटीमुळे मला २१००० रुपयात बाजारात मिळेल असा अर्थ निघतो का? तुम्ही पहिल्या प्रतिसादात काढलेला नफा रु. ३९००० होता जो पुढच्या प्रतीसादापार्यंत १५८००० झाला ते हि गणित इथे उदाहरणासहीत मांडा मोघम आकडेवारी नको कारण त्याने मी बावचळतो. कारण जर तुम्ही खालील प्रमाणे गुंतवणूक पी पी एफ मध्ये केलीत अगदी वर्षाला १०० रुपये भरून तरीही पूर्वी १२% आणि आता ९% प्रमाणे गणित खाली दिले आहे. (कुणाला खालील गणिताची एक्सेल हवी असल्यास अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येईल ....मोबदला : मिपा.) १) रुपये 2२40 अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ३७७८९/- २) रुपये ५६०० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ७९२२२/- ३) रुपये ८००० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये १०८८१७/- असे पैसे मिळतात. सकृत दर्शनी हे पैसे सोन्यापेक्षा जास्तच आहेत. पण... १) सोन्याला जी रोखता आहे (लिक्विडीटी) ती पीपीएफ ला नाही. १५ वर्षापर्यंत पी पी एफ ची संपूर्ण रक्कम काढता येत नाही. २) १२% व्याज दर ९% (१ एप्रिल २०१३ पासून ८.७०%) आलेला आहेच तो अजून हि खाली येऊ शकतो ३) योग्य तो कर सरकारकडे भरून जर मला हवे तेव्हडे कमावण्याची मुभा असेल तर मी जितक्या संधी मला उपलब्ध होतील तितके पैसे जास्त मिळवत राहीन असा विचार आपण का करू नये? सरकारला कर द्यावा लागेल म्हणून निष्क्रिय बसून राहणे म्हणजे चलनातून पैसा वाढतो ह्या नियमालाच खीळ घालणे होईल. आणि सरकारला कर देऊ नये का? प्रत्येक गुंतवणुकीचे निकष हे वय, तुम्हाला लागणारी भविष्यातली गरज हे लक्षात घेऊनच करतात म्हणजे गुतंवणूक रोखता हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. सोन्याचे युनिट्स जर बँकेच्या पैश्यात वाढवत राहिले तर तो फायदा किती आणि कसा होतो ते सोन्याच्या भावावरून दिसतेच.पी पी एफ चे युनिट्स तसे वाढवता येत नाहीत. जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. तसेच २०१२ साली 31७९९ आणि २०१३ साली ३४५०० इतका होता म्हणजे ८.५०% (मी जे १२% व्याज देणार त्यापेक्षा कमीच ओ !!!) "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" ह्या पद्धतीने पी पी एफ जे देईल तेच तुम्हाला घ्यावे लागेल म्हणजे खेळाचे नियम पी पी एफ्चे तर ते बरोबर नाही खेळाचे नियम माझ्या हातात हवे म्हणजे मी मला हवे तेवढे कमवू शकतोच. आता मुद्दा सामान्य माणूस, मराठी माणूस (वास्तविक द्विरुक्ती आहे.) हे लेबल लाऊन किती दिवस जगणार हो. सोन्याच्या दुकानात आणि बँकेत गर्दी दिसते सोन्याचे भाव कितीही वाढले तरीही. आणि सामान्य कुणी नाही (कोट्यवधींची स्पर्धा ज्याने आईच्या पोटातच जिंकली तो सामन्य नाहीच...) ज्याला जरा जास्त पैसे देणारे कुणी दिसले तर तो त्या माणसाच्या मागे धावत सुटतो कारण तो सामान्य नाही "माठ" आहे म्हणून. थोडक्यात कुणीतरी कमावून द्यावे मी मेहनत (??) सोर्री झंझट करणार नाही हि वृत्तीच सामान्य करतेय आपल्याला. पी पी एफ वाईट नाही माझे हि खाते आहेच कि पण पी पी एफ मध्ये पैसे मी सोन्यातून ट्रेड करून भरतो इतकाच फरक आहे. थोडक्यात गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालून आर्थिक वृद्धीचा प्रयत्न सतत करणे कि वेगवेगळ्या योजनांमधून पैसे अडकवून वाट पाहत बसणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. @वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?

एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक
माझी एकूण गुंतवणूक ८४०० +२७२२ = १११२२ आणि नफा ५०६८ /- म्हणजे जवळ जवळ ४५.५० % कारण मी व्याज आणि पहिले भांडवल रु. ८४०० म्हणजे १५.६०% मी म्हंटलेच आहे.

वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?
त्यांनी चांदी घेतली, सोने नाही. चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते. ती सोन्या सारखी नुस्ती पडुन रहात नाही.

@ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन उगाच व्याज वाया घालवत आहात. त्यापेक्षा हे करुन बघा. ( तुम्ही स्टॉक्स मधे काम करता म्हणुन तुम्हाला उपयोगी आहे ). तुम्हाला माहीती असेलच, तरी पण. १. सोने घेण्यापेक्षा त्याचे ETF घ्या ( तेव्हड्याच किमती चे ). उदा. १,००,००० २. ते Pledge करा, तुम्हाला ८५,००० चे Margin मिळेल ( Without any Cost ). ३. ह्या मार्जीन चा उपयोग करुन तुम्ही F&O मधे काम करु शकता. ४. जर सोन्याचा भाव वाढला तर तुम्ही ते pledge काढुन, विकू शकता.

आणी सोन्याचा भाव उतरला तर ? गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते. साध्या सोन्याला उतरती कळा लागलेली आहे तेनव्हा पुढच्य दोन ते तिन वर्षात सोने प्रत्यक्ष किंवा गोल्ड फंड मध्ये घेऊ नये असे मला वाटते. F & O हा सुद्धा सट्टा आहे ज्याचे जळते त्याचे ओले ही जळते आणी नाहि त्याचे सुकेही जळत नाहि.ज्याने कमित कमी पाच वर्षे शेअरबाजारात घालविली आहेत त्यानेच याचा विचार करावा. नाहीतर यात हात भाजून घेतलेले लोक मिपावर सुद्धा कमी नाहित असे पुर्वीच्या चिखलफेकी वरून जाणवते.

डॉक्टर साहेब - माझा सल्ला फक्त ज्ञानव यांना होता. ते सोने गहाण ठेवून महीना १% व्याज उगाचच वाया घालवत आहेत, म्हणुन त्यांना ह दुसरा उपाय सांगितला. त्यांचे वर्षाचे १२ % व्याज वाचेल.

तुम्ही वाढवलेले युनिट्स कामाला येतातच. हा सट्टा तर अजिबात नाही कारण सोने हे बराच काळ स्थिर असते असा अनुभव आहे. ते रातोरात पडत नाही कि चढत नाही आणि सोने चढायला लागल्यावरच ट्रेड केले पडायला लागल्यावर वाढवले तरी आज मी बराच पुढे आहे. रु. १९३ सोन्याचा भाव रु. ३४००० पर्यंत पोहचला हाही इतिहासच आहे. आणि सोने जर इतके नुकसान कारक आहे तर लोकांनी विकायला काढावे कि... दागिन्यांची झीज होते तरीही आम्ही नव नवीन दागिने ३४००० रुपयाने हि विकत घेतोच आहोत. मग ते का हौस म्हणून ? म्हणजे "सामान्य माणसाकडे" ३४००० रुपयाची हौस करायला पैसा आहे? आणि ट्रेड करून तो वाढवायला सांगितला तर तो जुगार आहे? हे विसंगत आहे. लहान मुलांचे भवितव्य घडावा सांगणाऱ्या म्युचअल फंदात पैसे बुडले तरी लोक हु कि चू करत नाहीत पण जो सोन्याचा ट्रेड ८४०० चे ९०००० फक्त ८ वर्षात करून देतो तो जुगार? मग मी स्वतःला कृतीशील अडाणी म्हणतो ते तरी पटते का?

(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.)
८८ वर्षात ८.५ जर भाव वाढत असेल तर पुष्कळ आहे कि. वाईट काय आहे ते लिहा

पण १) मी जुगार कधीच खेळत नाही (F&O) च्या संदर्भात बोलतोय. २) प्रत्यक्ष गोल्ड मला अनेक कारणांनी बरे पडते. सोनार आता घरातलाच असल्यासारखा झाला आहे. त्यामुळे फोनवर काम होते.बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत. ३) ब्रोकर्सवर तेवढा विश्वास नाही कारण खूप पहिले भोगले आहे. ४) CONSERVATIVE थिंकिंग असल्याने बँकच बरी पडते. व्याज आणि कर भरून हि स्लो बट स्टेडी मी युनिट्स वाढवतो आहेच. एकतर धंदा आहे थोडी मेहनत घ्यावी आणि थोडे प्रत्यक्ष सोने हातात घेऊन बघण्याची नशा काही औरच आहे. पण सल्ला पटला आवडला तरी तत्व आड येतात म्हणून सॉरी. तसेच धन्यवादसुद्धा

सन २०४० "सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे." जर सव्वीस वर्षात गुंतवणूक तिप्पट झाली तर दर काय मिळतो ४.२४ टक्के वर त्या व्याजावर आपल्याला आयकर भरावा लागतो ३० % प्रमाणे म्हणजे शंभर रुपयचे सोने घेतले तर ते ३०० रुपयचे होणार विकलेल्या नफ्यावर (२०० रुपयावर ६० रुपये आपण कर भरणार)म्हणजे आपला परतावा फक्त ३.४ टक्के होतो. मग सोन्यात गुंतवणूक का करायची हे आपणच सांगा.

म्हणूनच ट्रेड करायचा सल्ला देतोय २००६ साली १० ग्राम घेतलेले सोने आजे २०१३ मध्ये(८ वर्षात) १०+३० =४० ग्राम पर्यंत वाढवले त्याचा फायदा मला होतोच आहे. मी फक्त ८४०० आणि दरवर्षीचे व्याजच गुंतवतो बाकी पैसे बँक भरते. ३४००० रुपयाला हि सोने घेतले आहे. आणि आता २०००० येईल तेव्हाही घेणारच आहे. सोने हे दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे हे तुम्हीही जाणता पण म्हणून ते घेऊन नुसतेच बसून राहिलात तर कदाचित तितकी भांडवल वृद्धी मिळणार नाही कारण लोक सोन्याची रोखता लक्षात घेऊन पैसे गुंतवत जातात भांडवल वृद्धी हा त्यांचा उद्देश नसतो मी बाजारात उपलब्ध साहित्य म्हणजे सोने, बँकेकडे गहाण ठेवण्याची सोय, एक उत्तम सोनार आणि माझी अल्प बुद्धी वापरून एक सिस्टीम चालवतो ज्या द्वारे मला एक नियमित उत्पन्न मिळते ते मी पुन्हा सोन्यात गुंतवतो आणि माझी

"युनिट्स"

लक्षात घ्या

"युनिट्स"

वाढवत राहतो. माझे हि नियम तुमच्या सारखे साधेच आहेत की सोने हि दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. आणि व्याज, कर काहीही ना चुकवता संपूर्ण कायदेशीर...उलट आमच्याच धंद्यात सगळे व्हाईट मध्ये व्यवहार होतात.....पद्धतीने करतो. पण तुम्ही म्हणता ती "बुद्धिवादी चर्चा किंवा गणिते" मला समजत नाहीत मी खरोखर एक अडाणी आहे जो संधी घट्ट धरून ठेवतो कारण सगळ्या प्राण्यांना शेपूट मागे असते "संधी" ह्या प्राण्याला शेपूट डोक्यावर असते ती येताना दिसली कि धरावी नाहीतर ती गेली कि गेली. सोने गहाण ठेवा हि जाहिरात हा माझा क्ल्यू होता मी म्हंटले सगळ्या बँकांना एकदम कसे वेड लागले कि त्या सोने गहाण ठेऊन पैसे देऊ लागल्या? मग थोडी बाजारत फेरी मारली आणि केले सुरु...आता २००६ साली मी हे सुरु केले तर तो योगायोग नाही कारण बँकाही तेव्हाच सोन्यावर कर्ज देऊ लागल्या आणि गम्मत अशी कि किसान विकास पत्र किंवा तत्सम गोष्टी गहाण ठेऊन मी ट्रेड करतच होतो तरी एवढी अक्कल नव्हती की सोनेपण ठेवावे.... असो कदाचित तुम्हाला ते समजाणार नाही कारण प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव नाही पण बँक जर बरोबर असेल आणि एक किंमती वस्तू माझ्याकडे असेल तर त्याला वेग कसा द्यायचा हे मी पूर्ण जाणतो..

>> बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत. समजा, तुम्ही १ वर्षापूर्वी ३०,००० रुपयांनी १० ग्रॅम सोने घेतले. ते कर्ज ठेऊन ९५% लोन घेतले (२८,५००). मग त्या २८,५०० चे ९.५ ग्रॅम सोने घेतले. म्हणजे तुमच्याकदे १९.५० ग्रॅम सोने आहे आणि २८,५०० कर्ज आहे. १ वर्षानी सोन्याचा भाव ३०,००० वरून २५,००० वर आला. बँकेच्या हिशोबाने तुम्हाला सध्याच्या २५,००० रेटच्या ९५% लोन (= २३,७५०) बँकेने द्यायला पाहिजे, पण तुमचे लोन तर २८,५०० आहे. अशा वेळी बँक तुम्हाला ४७५० चा (२८,५०० - २३,७५०) मार्जिन कॉल देणार का?

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००. सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २८,५०० म्हणजे मिळणार २०,२५० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी? ३) जर तुम्हाला मार्जिन कॉल भरायचा नाही, मग सोने विकावे लागेल. त्याचे मिळतील ४८,७५० (२५,०००/१० x १९.५) तुम्ही बँकेला देणार २८,५०० (कर्ज) + ३४५० (व्याज) = ३१,९५० म्हणजे हातात उरले ४८,७५० - ३१,९५० = १६,८०० म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या ३०,००० चे झाले १६,८००. leverage असा घातक ठरतो. पटतोय का हिशोब?

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००. सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २३,७५० (४७५० भरल्यामुळे कमी झालेले कर्ज) म्हणजे मिळणार २५,००० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी?

पण मी वर प्रतिसादात एक वाक्य दिले आहे.
(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)
म्हणजे २५००० नंतर मी थांबलोय.. नुसतेच आकड्याचे खेळ नाहीत हे. मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेऊन तयार केलेली सिस्टीम आहे हि. २५000 नंतर मी थांबलोय.(फक्त एकदाच ३४०००ला एकदा सोडवून थोडे सोने घेतले आहे.) तुम्ही मध्येच एकदम समजा ३०००० ला घेतले तर असे आकडे मांडून लॉस नक्क्कीच दाखवू शकता कारण गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. बँक मला मार्जिन ट्रेडिंग करू देईल असे तुम्हाला वाटते का? पण मी २००६ पासून

"युनिट्स"

गोळा करतो आहे.त्यामुळे माझ्याकडचे सोन्याचा भाव अवरेज करून वेगवेगळा झाला आहे. माझा ब्रेक इव्हन पोइंत येऊन गेला आहे. मी एक पद्धत मांडली जी फूल प्रुफच आहे कारण वेळेत घेतलेला निर्णय कमावून देतोच. पण आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल पण माझ्याकडे युनिट्स वाढल्याने मी मात्र मला हवा तसा ट्रेड करू शकतो. (व्याजाचे भान ठेऊन निर्णय घेत घेत.) बाकी तुमचा हिशोब बरोबर ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? कदाचित माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.

बाकी तुमचा हिशोब बरोबर. ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? leverage किती घातक ठरू शकतो, एव्हडेच मला इतरांना उदाहरणाने पटवून द्यायचे होते. माझा हिशोब बरोबर आहे, हे सांगितल्याबद्दल आभारी आहे. भाव ८,००० वरून १२,००० नंतर २५,००० आणि नंतर ३४,००० झाला, त्यामुळे तुमचे अ‍ॅव्हरेज कॉस्ट कमीच असणार. त्यामुळे ही सिस्टीम फूलप्रूफ आहे, असे तुम्हाला वाटणे सहाजिक आहे. माझ्या मते हा भ्रम आहे. (fallacy). जर ८००० किमतीवरून १२,००० जाण्याऐवजी किंमत ६५०० वर गेली असती, तर वर म्हटल्याप्रमाणे नुकसान झालेच असते. आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल तुमच्या सिस्टीमप्रमाणे २५,०००ला (च) का थांबलात किंवा १८-२०,०० पर्यंत का थांबायचे, ते जरा स्पष्ट करू शकाल का? गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. तुमच्या मते, तुमची सिस्टीम हा गुंतवणूकीचा प्रकार आहे की ट्रेडिंगचा?

हा निव्वळ ट्रेड आहे. आणि त्यातून जनरेट होणारे रेवेन्यु गुंतवणुकीत लावतो म्हणजे सोनेच किंवा एफ डी किंवा पी पी एफ बाकी भाव केव्हा खाली जाईल ते आणि वर जाईल ती समज आता डेव्हलप झाली आहे. भाव २०००० किंवा १८००० का येईल त्याला कारण शेअर मार्केट आहे. प्रत्येक मार्केटची ट्रेड सायकल असते रियल इस्टेट आता स्थिरावले आहे. बराच माल पडून आहे. हिरा मार्केट संपल्यात जमा आहे. गोल्ड मध्ये कमावून झाले आहेत. जेव्हा एखाद्या माध्यमात (रियल इस्टेट, शेअर,गोल्ड )भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते जनरली ते ५०% कोसळते आपल्या उच्चतम पातळी पासून म्हणजे सोने ३४००० - १७००० असा विचार करता १८ ते २० पर्यंत त्यात पुन्हा जोरात खरेदी सुरु होईल पण एकदा २२-२३000 ची पातळी त्यांने दाखवली आहे तेही विसरता कामा नये. मी जे तुम्हला भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते म्हणतो त्याबाबत तुम्ही कुठलाही शेअर, कमोडीटी किंवा अगदी आय टी किंवा तत्सम क्षेत्रातल्या नोकर्यासुद्धा पाहा तुम्हाला जाणवेल. शब्दात मांडणे कदाचित मला जमत नाहीये कारण वासावरून चव ओळखण्याचे कसब शब्दात बसवता येत नाही. त्यामुळे ८००० भावाला जेव्हा वेग आला तेव्हा मी १२००० पातळी आधीच मनात धरली होती ८०००+४००० असे गणित करून आणि माझ्याकडे येणारी ग्राहक मंडळी मला हसत होती. (खुप वाईट वाटले तेव्हा मला आज तेच माझ्या मागे असतात कुठे पैसे लाऊ विचारत ......तेव्हाही वाईटच वाटते.) मार्केटचा मी भक्त आहे कारण नावातच "पेठ"कर आहे. असो. अभ्यास नसेल तर नुसत्या पद्धतीला काही अर्थ नसतो आणि गुंतवणूक प्रगल्भता लक्षात ना घेता एखाद्य्ला विरोध म्हणून विरोध असे असेल तर काय बोलणार??? कदाचित तुम्हाला कळले असेल मला काय म्हणायचे आहे ते.

CONSERVATIVE थिंकिंग असल्याने
@ज्ञानव - तुम्ही ट्रेडिन्ग करता आहात, त्यात सुद्धा गहाण ठेवुन, त्यावर व्याज भरुन अजुन पोझिशन तयार करता आहात. तरीही स्वताला Conservative म्हणता आहात. हा विरोधाभास आहे.

डॉक्टर साहेब - तुमचे एकदम बरोबर आहे. सोन्याचे भाव मधल्या ४-५ वर्षात खुप वाढले म्हणुन त्यात १०% तरी ROI दिसतो आहे. ह्या भाववाढीची कारणे ही वेगळी होती. आता पुन्हा तशी भाववाढ दिसणार नाही.

सोन्याचा भाव भारतीय रुपयात देण्यापेक्षा गेल्या शंभर वर्षांचा विदा डॉलर्स मधे आहे त्याचा एकदा अभ्यास केला तर एकंदर तुमचे गणित फेल जाते असे दिसेल. येत्या काही दिवसांत सोने ८०० डॉलर्स पर्यंत खाली येण्याचा अंदाज इनसायडर सांगत आहेत. टेक केअर ... गार्निअर.

सोन्याचा भाव खाली जवळ जवळ २२००० ते १८००० पर्यंत येईल असा अंदाज आहे. आणि मला तेच हवे आहे. कारण प्रत्येक गुंतवणुकीची एक ट्रेड सायकल असतेच फक्त ती पकडता आली पाहिजे. बाकी माहितीबद्दल धन्यवाद.

"सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. मी तर स्वतःच (बायकोने विचारायच्या आधीच) तिला म्हणतो "अग, जरा सोने घेतो तुझ्यासाठी." पण नवर्‍यावर "पूर्ण विश्वास" असल्याने तिला लगेच शंका येते, मग तीच म्हणते "जाऊ दे, मी कुठे वापरते कधी. नाहीतरी बँकेतच पडून राहाणार ना". मी लगेच आज्ञाधारकपणे "बरं" म्हणतो. याला म्हणतात "साप भी मरे और लाठी भी ना टूटे". ती इथे मिपावर येत नाही, म्हणून बरे, नाहीतर काही खैर नाही. :)

एक महत्वाची गोष्ट : (अ) पी पी एफ् चे मुद्दल व परतावा यांची हमी सरकारने हमी दिलेली असते. त्यामुळे (१) मुद्दल बुडण्याची शक्यता नाही. आणि (२) व्याजदर फार खाली जाण्याची शक्यता नगण्य. (मागच्या वेळी पी पी एफ् चा व्याजदर अर्धापाव टक्का कमी करण्यावरून सरकारला पाठीबा देणार्‍या आणि विरोधी पक्षांच्या केवढ्या नाकादुर्‍या काढाव्या लागल्या होत्या हे लक्षात असेलच) म्हणजे एकूण परताव्याच्या साधारण आज केलेल्या आकडेमोडीएवढीच रकमेएवढी रक्कम मिळण्याची हमी असते. याउलट (ब) सोने किंवा इतर कोणत्याही कमॉडिटित केलेल्या गुंतवणूकीचा परतावा हा केवळ एक अंदाज असतो. याबद्दल कोणीही कोणतिही हमी देवू शकत नाही. जर भाव वर गेले तर आजच्या आकडेमोडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो पण भाव पडले तर मूळ मुद्दलातही घट होउ शकते. भाव सतत वर जाणे हे भाव वर जाण्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात होते आणि भाव कोसळण्याची शक्यता भाव खूप वर असण्याच्या स्थितिला जास्त असते... आता सोन्याचे भाव बहुधा भाव त्यांच्या उच्च पातळीला आहेत (बबल / फुगवटा ?) असा अंदाज आहे. थोडक्यात... ज्यांना निर्धोक आणि खात्रीचा परतावा पाहिजे असेल त्यांनी पी पी एफ् मध्ये गुंतवणूक करणे योग्य. ज्यांच्याकडे अशी शिल्लक आहे की जास्त परताव्यासाठी ती धोका पत्करून गुंतवायला त्यांची हरकत नाही, त्यांनी कमॉडिटी अथवा कलाकृती इ च्या गुंतवणूकीचा अभ्यास करून त्यांत गुंतवण्याचा निर्णय घ्यावा.